Home बातम्या Samsung Galaxy S8 ने केली कमाल, 20 लोकांचे वाचवले प्राण

Samsung Galaxy S8 ने केली कमाल, 20 लोकांचे वाचवले प्राण

Samsung Galaxy S8 कंपनीने दोन वर्षांपूर्वी लॉन्च केला होता. पण काही दिवसांपूर्वी हा फोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झाले असे, सॅमसंग Galaxy S8 मुळे 20 लोकांचा जीव वाचवता आला. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी फिलीपींस मधील सेबू येतील मलापसकुआ बेटाजवळ एक जहाज उलटेल होते, पण वॉटर रेसिस्टेंट सॅमसंग एस8 मुळे जहाजातील लोकांचा जीव वाचला.

जहाज पालटल्यानंतर त्यातील सर्वांचे फोन्स बंद पडले होते, पण जिम एम्डी नावाच्या व्यक्तीचा पाण्यात बुडालेला सॅमसंग एस8 फोन चालू होता, ज्यावरून एम्डी कॉल करू शकले. विशेष म्हणजे या फोन मध्ये एसओएस नावाचा फीचर नाही, पण IP68 वॉटर रेसिस्टेंट असल्यामुळे पाण्यात बुडाल्यानंतर पण फोन चालू राहिला.

हि घटना दोन आठवड्यांपूर्वीची आहे, जेव्हा एका जहाज 16 विदेशी आणि चार फिलीपीन्स नागरिकांना एका बेटावर घेऊन जात होते. जहाज पालटल्यानंतर या फोन वरून मदत मागवण्यात आली आणि जीपीएस च्या माध्यमातून लोकेशन शेयर करण्यात आले होते.

एम्डी नावाच्या व्यक्तीने एका रिपोर्ट मध्ये सांगितले कि त्या बिकट प्रसंगी फक्त त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी S8 स्मार्टफोन चालत होता, ज्याच्या मदतीने त्यांनी बचाव दलाशी संपर्क करू शकले आणि ते वाचले.

Samsung 7 ऑगस्टला नोट सीरीजचा आगामी हँडसेट Galaxy Note 10 सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीने या फ्लॅगशिप नोट लॉन्च साठी Unpacked इवेंटचे आयोजन केले आहे. Samsung चा ग्लोबल इवेंट न्यू यॉर्क मध्ये 7 ऑगस्टला होईल. भारतीय यूजर्स याची लाइव स्ट्रीमिंग 8 ऑगस्टला दुपारी 1.30 वाजता बघू शकतील.

तसेच ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आणि फ्लिपकार्टने Galaxy Note 10 च्या लॉन्चचे एक डेडिकेटेड पेज बनवले आहे. याचा अर्थ असा कि ग्लोबल लॉन्च नंतर लगेचच हा भारतात पण सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy Note मध्ये S Pen दिल जाईल ज्यामुळे प्रोडक्टिविटी संबंधित टास्क परफॉर्म करता येतील. तसेच Galaxy Note 10 स्मार्टफोन प्रीमियम स्पेसिफिकेशंस सह येईल. सध्या या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक दिवसांपासून फोन संबंधित अनेक लीक समोर आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस8 वीडियो