सॅमसंग ऑगस्टच्या 9 तारखेला अंर्तराष्ट्रीय बाजारात गॅलेक्सी नोट 9 सोबत गॅलेक्सी टॅब एस4 लॉन्च करू शकते. काही दिवसांपूर्वी हा सॅमसंग डिवाईस चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता तिथून फोन च्या लॉन्च ची माहिती मिळाली होती. आता अजून एका लीक मधून गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी टेक वेबसाइट एंडरॉयड हेडलाइंस ने पण या डिवाईस चे फोटोज शेयर केले होते. आधीच्या लीक मधून मिळालेले स्पेसिफिकेशन्स नवीन लीक सोबत भरपूर मिळते जुळते आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये 2560 × 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 10.5-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालेल. कंपनी कडून या डिवाईस मध्ये 4जीबी ची पावरफुल रॅम मेमरी देण्यात येईल.
गॅलेक्सी टॅब एस4 सॅमसंग 64जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात आणू शकते तसेच टॅब ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी टॅब एस4 मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 बद्दल बोलले जात आहे की यात फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर मिळणार नाही पण यात फेस अनलॉक टेक्निक असेल. तसेच या डिवाईस सोबत सॅमसंग चा एस पेन पण मिळेल जो यावेळी ब्लूटूथ कनेक्टिविटी सह येऊ शकतो. नवीन टॅब चा एस पेन आधीपेक्षा जास्त एडवांस असेल आणि अनेक फीचर्स ला सपोर्ट करेल. तसेच कनेक्टिविटी साठी टॅब मध्ये ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि वाईफाई असेल त्याचबरोबर टॅब मध्ये एकेजी टेक्निक वाले स्पीकर्स पण असतील.
गॅलेक्सी टॅब एस4 डेक्स डॉक च्या माध्यमातून मॉनीटर स्क्रीन सोबत पण जोडता येईल. लीक नुसार सॅमसंग हा डिवाईस 7,300एमएएच च्या पावर बॅटरी सह लॉन्च करेल. बर्लिन मध्ये आयोजित आईएफए 2018 मध्ये सॅमसंग हा डिवाईस जगासमोर ठेवेल. कंपनी याला ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते. सॅमसंग कडून या डिवाईस बद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे गॅलेक्सी टॅब एस4 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी आता सॅमसंग च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.
