सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की येत्या 26 जुलैला कंपनीचा अनपॅक्ड इव्हेंट होणार आहे. ह्या इव्हेंटमध्ये सॅमसंगचे Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 लाँच केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे लाँच पूर्वीच ह्या डिवाइसची बरीचशी माहिती लीक झाली आहे. तर आता दोन्ही फोन्सच्या युरोपियन किंमतीचा खुलासा झाला आहे.
Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 किंमत (लीक)
सॅमसंगच्या दोन्ही फोल्ड होणाऱ्या फोन्सची युरोपीयन किंमत Dealabs नं लीक केली आहे. चला जाणून घेऊया.
Samsung Galaxy Z Flip 5 किंमत
- सॅमसंगचा फ्लिप 5 फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.
- ह्यात 256 जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत €1,199 म्हणजे सुमारे 1,08,990 रुपये असू शकते.
- जर 512 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट €1,339 म्हणजे सुमारे 1,21,699 रुपयांचा असू शकतो.
Samsung Galaxy Z Fold 5 किंमत
- Z Fold 5 तीन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये येऊ शकतो आहे.
- फोनच्या 256 जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत €1,899 म्हणजे सुमारे 1,72,507 रुपये असू शकते.
- डिवाइसचा 512 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन €2,039 म्हणजे जवळपास 1,85,098 रुपयांमध्ये मिळू शकतो.
- डिवाइसचा सर्वात मोठा व्हेरिएंट 1TB दंश €2279 म्हणजे सुमारे 2,07,108 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो.
Samsung Galaxy Z Fold 5 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- डिस्प्ले : ह्या फोनमध्ये 7.6 इंचाचा डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 2,176 x 1,812 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच 6.2 इंचाचा कव्हर डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2,316 x 904 पिक्सल रिजॉल्यूशनसह येऊ शकतो.
- प्रोसेसर : हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
- स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत 12GB रॅम + 1TB पर्यंत स्टोरेज दिली जाऊ शकते.
- कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स असू शकते. तसेच फ्रंटला 5-मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा आणि सेकंडरी पॅनलवर 10-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
- कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी डिवाइस एनएफसी, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, यूएसबी-सी 3.2 पोर्ट, नॅनोसिम आणि ईएसआयएम सपोर्टसह येऊ शकतो.
Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)
- डिस्प्ले : Galaxy Z Flip 5 मध्ये 6.7 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिजॉल्यूशन असण्याची शक्यता आहे. डिस्प्लेवर पंच होल कटआउट डिजाइन दिली जाऊ शकते. फोनचा कव्हर डिस्प्ले 3.4 इंचाचा असू शकतो. ह्यात 60हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
- प्रोसेसर : मोबाइलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो. जो 3.36Gहर्ट्झ क्लॉक स्पीडसह येईल.
- स्टोरेज : हा फोन 8GB रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो.
- बॅटरी : ह्यात 3700mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. तसेच 10W वॉयरलैस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
- कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ह्यात 12 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेन्स असू शकते. सेल्फीसाठी देखील 12MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- ओएस : हे दोन्ही मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित One UI 5.1 वर चालू शकतात.
