Home बातम्या Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री

Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री

साउथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंगच्या फोल्डेबल फोन्सना मिळणारा चांगल्या प्रतिसादामुळे आता कंपनी कमी किंमतीत फोल्डेबल फोन आणण्याची योजना बनवत आहेत. रिपोर्ट समोर आला आहे कि Samsung Galaxy Z Flip Lite नावाचा स्मार्टफोन पुढल्या वर्षी फोल्डेबल डिस्प्ले सह किफायती किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहे, ज्याचे नाव Galaxy Z Flip Lite असू शकतो. मोनिकर वरून समजले आहे कि हा Galaxy Z Flip सारख्या फोर्म फॅक्टर सह येऊ शकतो. सॅमसंगने गॅलेक्सी झेड फ्लिप लाइट स्मार्टफोन बाबत आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

अनॅलिस्ट Ross Young च्या ट्वीटनुसार, Samsung Galaxy Z Flip Lite स्मार्टफोन अल्ट्रा-थीन ग्लास (UTG) सह सादर केला जाऊ शकतो जो फोल्डेबल फोन Samsung Galaxy Z Flip च्या तुलनेत जास्त स्वस्त असेल. तसेच SamMobile च्या रिपोर्टनुसार सॅमसंग कमी यूटीजी प्रोडक्शन कोस्ट सह स्वस्त फोल्डेबल ग्लास वर काम करत आहे. कथित गॅलेक्सी झेड फ्लिप लाइट पुढल्या वर्षी येऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung चा पावरफुल Galaxy S21 Plus वेबसाइट वर लिस्ट, स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट आणि 8 जीबी रॅमचा झाला खुलासा

Samsung Galaxy Z Flip चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galanxy Z Flip च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात प्राइमरी फोल्डेबल डिस्प्ले 6.7-इंचाची आहे. तसेच या फोन मध्ये इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. बाहेरच्या बाजूला 1.1-इंच सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे जो क्लॉक स्पीड 2.95 गीगाहर्ट्ज सह येतो.

फोन मध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. झेड फ्लिप ची इंटरनल स्टोरेज 256 जीबी आहे आणि फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी पाहता सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे आणि सोबत 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा पण मिळतो. फ्रंट पॅनल वर Samsung Galaxy Z Flip मध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तर कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस (ए-जीपीएस) चा समावेश आहे. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सोर्स: 1, 2

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप व्हिडीओ