सॅमसंगनं काल आपल्या वार्षिक Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमधून दोन नवीन Foldable Phone सादर केले आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Samsung नं या इव्हेंटमधून Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 हे दोन मोठे फ्लॅगशिप लाँच केले आहेत, जे गेल्यावर आलेल्या Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 चे अपग्रेडेड व्हर्जन आहेत. Samsung Galaxy Z Fold 4 बद्दल बोलायचे तर हा पहिला फोल्डेबल फोन आहे जो Android 12L सह बाजारात येईल, जो गुगलनं मोठी स्क्रीन असलेल्या डिवाइससाठी डिजाइन केला आहे. या लेखात आपण फोल्ड 4 च्या फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती घेणार आहोत.
Samsung Galaxy Z Fold 4 ची किंमत आणि उपलब्धता
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 ची किंमत 1,799 डॉलर (सुमारे 1,42,000 रुपये) पासून सुरु होते. हा फोल्डेबल फोन भारतात आधीच प्री-रिजर्वेशनसाठी उपलब्ध झाला आहे आणि या महिन्याच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु अजूनतरी कंपनीनं या फोनच्या भारतीय किंमतचा खुलासा केला नाही.
Samsung Galaxy Z Fold 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- 6.2-इंच अॅमोलेड कव्हर डिस्प्ले
- 7.6-इंच डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट
- अँड्रॉइड 12L ओएस
- 50एमपी + 12एमपी + 10एमपी ट्रिपल रियर कॅमेरा
- 4MP + 10MP फ्रंट कॅमेरा सेन्सर
- 4,400mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग
डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड 2एक्स कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2316 x 904 पिक्सल रेजोल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर फोनच्या आतल्या बाजूस 120Hz रिफ्रेश रेटसह 7.6-इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसिंग पावर: फोल्डेबल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे जो एड्रेनो GPU सह मिळून चालतो. Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि शक्तिशाली प्रोसेसर आहे. फोनमध्ये 12GB रॅम 256GB/512GB/1TB स्टोरेज मिळते.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ड्युअल पिक्सल एएफ, ओआयएस आणि एफ/1.8 सह 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 एमपीची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चर व पीडीएएफ सह 10 एमपीचा टेलीफोटो कॅमेरा आहे. तर , फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी f/1.8 अपर्चरसह 4MP चा इन-स्क्रीन कॅमेरा आणि कव्हर डिस्प्लेवर f/2.4 अपर्चरसह 10MP चा सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी देण्यात आला आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 मध्ये 25W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोल्डेबल फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एस पेनला सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
