Home बातम्या 18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन

18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने काही दिवसापूर्वी आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन Samsung W20 लॉन्च केला होता. आता नवीन लीक्स मध्ये समोर येत आहे कि तिसऱ्या फोल्डेबल स्मार्टफोन वर काम करत आहे. टिप्सटर Ice Universe ने माहिती दिली आहे कि सॅमसंग आपला हा फोल्डेबल स्मार्टफोन 18 फेब्रुवारी, 2020 लॉन्च करू शकते. या दिवशी कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस Galaxy S11 लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सॅमसंग दरवर्षी आपली फ्लॅगशिप S-सीरीज मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) ट्रेड शो मध्ये अपग्रेड करून सादर करते. साल 2020 मध्ये MWC इवेंट 24 ते 27 फेब्रुवारी पर्यंत असेल. यावर्षी सॅमसंगने आपली Galaxy S10 सीरीज 20 फेब्रुवारीला लॉन्च केली होती. कंपनीने Galaxy S10 सीरीज सोबत कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold पण सादर केला होता.

Samsung Galaxy S11 संबंधित काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आला आहे कि या फोन मध्ये कंपनी सर्वात पावरफुल कॅमेरा देईल. हा फोन कंपनी दमदार झूम सोबत हाई रेजोल्यूशन आणि जास्त अपर्चर ऑप्शन सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे कि Samsung Galaxy S11 मध्ये लो लाइट फोटोग्राफी साठी ट्रेटासेल टेक्नोलॉजी सह नवीन सेंसर दिले जाऊ शकतात. फोन ट्रिपल अपर्चर लेंस सह सादर केला जाऊ शकतो.

कंपनी यात F1.5 आणि F2.4 मध्ये एक नवीन एफ स्टॉप ऍड करू शकते. यासाठी कंपनी कॅमेऱ्यामध्ये नवीन ToF सेंसर सह सुधारित एचडीआर प्रोसेसिंग जोडू शकते. Galaxy S11 बद्दल लीक मध्ये हेच सांगण्यात आले आहे कि हा फोन कंपनी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह पण बनवेल आणि ग्लोबल मार्केटच्या काही बाजारांत हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल.

कदाचित Galaxy S11 मॉडेल्स सोबतच Exynos 9830 टेक बाजारात येऊ शकतो. विशेष म्हणजे Samsung चा सर्वात पावरफुल फोन Galaxy Note 10 एक्सनॉस 9825 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. म्हणजे Samsung Galaxy S11 मध्ये दिला जाणारा एक्सनॉस 9830 चिपसेट Galaxy Note 10 मधील एक्सनॉस 9825 चिपसेटचा अपग्रेडेड वर्जन असेल.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड वीडियो