Home बातम्या एक नव्हे तर तीन बाजूला घडी होईल सॅमसंगचा अपकमिंग फोल्डेबल फोन, नवीन पेटेंट झाला फाइल

एक नव्हे तर तीन बाजूला घडी होईल सॅमसंगचा अपकमिंग फोल्डेबल फोन, नवीन पेटेंट झाला फाइल

साउथ कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग आपल्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनमुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच रिपोर्ट आला होता कि कंपनी आपला फोल्डेबल फोन 5जी वेरिएंट मध्ये आणेल. पुढील महिन्यात म्हणजे 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड 2019 इवेंट मध्ये गॅलेक्सी ए10 सीरीज सोबत कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनची झलक दिसू शकते. तसेच आता कंपनी अजून एक फोल्डेबल फोनचे पेटेंट वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशनच्या वेबसाइट वर दिसले आहे.

सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल स्क्रीन पेटेंटला सॅमसंग डिस्प्ले सब्सिडरी ने 2017 डिसेंबर मध्ये फाइल केले होते आणि याला 29 जानेवारी 2019 ला मंजूरी मिळाली. स्केच मध्ये दिसत आहे कि डिवाइस एका सिंगल स्क्रीन सह येईल, जो एक किंवा दोन बाजूनी घडी होणार नाही तर तीन बाजूने घडी करता येईल. नव्या पेटेंटची खासियत म्हणजे यात देण्यात आलेला डी-पॅड आणि सहा फिजिकल होम बटण वर्टिकल स्ट्रिप मध्ये राइट साइडला आहेत.

स्केच नुसार फोल्डेबल मोड मध्ये डी-पॅड आणि इतर बटण गेमिंग मध्ये वापरता येतील. तसेच फिजिकल होम बटण उजविकडे दाखवण्यात आला आहे. तसेच पेटेंट मध्ये दुसरं कोणताही सेंसर दिसत नाही. तसेच मागील बाजू पण पेटेंट मध्ये स्पष्ट दिसत नाही.

सॅमसंग ने आपला फोल्डेबल फोन सर्वात आधी गेल्यावर्षी आयोजित डिवेलपर्स कॉन्फ्रेंस मध्ये सादर केला होता. बोलले जात आहे कि सॅमसंग आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी एफ सीरीज नावाने लॉन्च करू शकते.

हा फोन लॉन्च होण्यास अजून वेळ आहे, पण या संबंधित माहिती आणि लीक्सनुसार गॅलेक्सी एफ सीरीज मध्ये 4,400 mAh ची बॅटरी देण्यात येईल. ऑल अबाउट सॅमसंग वेबसाइट नुसार सॅमसंग च्या या अपकमिंग फोल्डेबल फोन मध्ये 2,200एमएएच च्या दोन बॅटऱ्या असतील.