91mobiles ने काही दिवसांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि सॅमसंगने आपल्या F-सीरीजच्या नवीन फोन Galaxy F62 वर काम करायला सुरवात केली आहे, ज्याचा मॉडेल नंबर SM-E625F असेल. आशा आहे कि फोन भारतात 2021 च्या पहिल्या तिमाहीत सादर केला जाईल. अलीकडेच SM-E625F मॉडेल नंबर असलेल्या फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे. आता आम्हाला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ62 चे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. कंपनीने आपल्या ग्रेटर नोयडाच्या फॅक्ट्री मध्ये या फोनचे प्रोडक्शन सुरु केले आहे. इतकेच नव्हे तर आमच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली आहे कि हा फोन कंपनीचा सर्वात स्लिम फोन असेल.
Geekbench लिस्टिंग नुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच, डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन बद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.
हे देखील वाचा : Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन
Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वात आधी सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता.
Samsung Galaxy F41
सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला होता जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
