Home बातम्या सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन

सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन

सॅमसंगच्या गॅलेक्सी एम सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 91मोबाईल्स ने आपल्या एक्सक्लूसिव बातमीत सांगितले होते कि सॅमसंग ने भारतात नोएडा मधील प्लांट मध्ये आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्सची निर्मिती पण सुरु केली आहे. आता न्यूज एजेंसी आईएएनएस कडून बातमी आली आहे कि कोरियन कंपनी सॅमसंग पुढल्या महिन्यातच भारतात आपली गॅलेक्सी एस स्मार्टफोन सीरीज आणेल.

आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि जानेवारी मध्ये सॅमसंग कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करेल. आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि त्यांना हि माहिती इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार सॅमसंग आपली गॅलेक्सी एम सीरीज सर्वात आधी भारतातच लॉन्च करेल. हि सीरीज पुढल्याच महिन्यात भारतीय बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात भारतातून ग्लोबल मंचावर करेल. रिपोर्ट नुसार या सीरीज मध्ये गॅलेक्सी एम50, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. पण तुम्ही फोन एक साथ लॉन्च केले जातील कि वेगवेगळ्या दिवशी याची माहिती एजेंसी ने दिली नाही.

साहजिकच गॅलेक्सी एम सीरीज सॅमसंग साठी खास असणार आहे. या सीरीज सोबतच सॅमसंग आपली रणनीती बदलणार आहे. सॅमसंग एकीकडे गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे तर दुसरीकडे गॅलेक्सी जे सीरीज तसेच गॅलेक्सी ऑन सीरीज कंपनी द्वारा बंद केली जाईल. अनेक रिर्पोट्स मध्ये असे पण बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम5, गॅलेक्सी एम3 आणि गॅलेक्सी एम2 नावाने लॉन्च करू शकते.

सॅमसंग ने अजूनतरी गॅलेक्सी एम सीरीजच्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीने या सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीचा खुलासा केलेला नाही. आईएएनएसच्या रिपोर्ट नंतर अशा आहे कि लवकरच सॅमसंग इंडिया नवीन फोनच्या लॉन्च संबंधित बातमी देऊ शकते.

तुम्हाला तर माहीतच आहे 91मोबाईल्स ने आधीपण गॅलेक्सी एम सीरीज संबंधित एक्सक्लूसिव बातम्या दिल्या आहेत. गॅलेक्सी एम20 बद्दल आम्ही अशीच सांगितले आहे कि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, नॉच डिस्प्ले, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. आम्ही रिपोर्ट मध्ये या फोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला होता. तसेच या फोन मध्ये रियर फिंगर​प्रिंट सेंसर पण दिला जाईल. हा फोन 5,000 एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च होईल.