Home बातम्या बंद होणार आहे का सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज?

बंद होणार आहे का सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज?

सॅमसंग स्मार्टफोंस ची ओळख जगभरात ‘गॅलेक्सी’ शब्दावरून होते. सॅमसंग ची ‘गॅलेक्सी एस’ सीरीज कंपनी ची सर्वात जास्त विकली जाणार्‍या स्मार्टफोन सीरीज पैकी एक आहे. गॅलेक्सी एस सीरीज खासकरून हाई बजेट वाल्या फ्लॅगशिप स्मार्टफोंस साठी प्रसिद्ध आहे. गॅलेक्सी एस8, गॅलेक्सी एस9 च्या यशानंतर आता कंपनी या सीरीज च्या नवीन फोन वर काम करत आहे आणि काही दिवसांमध्ये हे टेक जगासमोर येतील. पण सॅमसंग च्या या फेमस सीरीज बद्दल एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे की लवकरच सॅमसंग ची गॅलेक्सी एस सीरीज बंद होऊ शकते.

सॅमसंग बद्दल बातमी येत आहे की येत्या काळात कंपनी च्या गॅलेक्सी एस सीरीज मध्ये मोठा बदल होऊ शकतो. कोरियन मीडिया मध्ये बातमी आली आहे की सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज एकत्र करू शकते. सॅमसंग वाइस चेयरमन जे ली म्हणतात की येत्या काळात गॅलेक्सी एस सीरीज आणि एस पेन असलेली गॅलेक्सी नोट सीरीज एकच होतील. म्हणजे यूजर्सना या दोन्ही पैकी एकाच सीरीज चे स्मार्टफोन मिळतील.

ली ने आपल्या वक्तव्यात ही गोष्ट अपूर्णच ठेवली आहे त्यामुळे टेक जगात चर्चेला उधाण आले आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार सॅमसंग स्वतः आपल्या गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज मधील स्पर्धेत अडकली आहे. या दोन्ही सॅमसंग सीरीज चे स्मार्टफोन एकमेकांना बाजारात टक्कर देत आहेत तसेच आपलच मार्केट कमजोर करत आहेत. सॅमसंग फॅन्स एक बेस्ट फोन मिळवण्यासाठी गॅलेक्सी एस किंवा गॅलेक्सी नोट पैकी एक निवडत आहेत आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा तोटा कंपनी ला होत आहे.

सॅमसंग च्या वेगवेगळ्या स्मार्टफोंस मधील स्पर्धेचा तोटा कंपनी ला भोगावा लागत आहे. उदाहरणार्थ सॅमसंग एकीकडे गॅलेक्सी एस8 डिवाईस लॉन्च करते आणि थोड्याच दिवसांनी गॅलेक्सी नोट 8 बाजारात येतो. त्यामुळे सॅमसंग ने मार्केट मध्ये आधी आणलेल्या गॅलेक्सी एस 8 चा स्टॉक तसाच राहतो आणि यूजर गॅलेक्सी नोट 8 कडे वळतात. अशा परिस्थितिला दोन्ही गॅलेक्सी सीरीजला सामोरे जावे लागते.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी सॅमसंग ने 11 मिलियन सेल च्या टारगेट सह गॅलेक्सी नोट 8 लॉन्च केला होता. आणि बातमी आहे की कंपनी यावेळी गॅलेक्सी नोट 9 12 मिलियन सेल च्या टारगेट सह बाजारात आणणार आहे. म्हणजे सॅमसंग स्वतःहून बाजारात गॅलेक्सी नोट सीरीज चा जास्त स्टॉक आणत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कंपनी गॅलेक्सी नोट 9 मुळे गॅलेक्सी एस9 कमी करू इच्छित नाही.

सॅमसंग बद्दल बोलले जात आहे की पुढल्या वर्षी कंपनी गॅलेक्सी एस सीरीज गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये विलीन करेल. त्यानंतर एकाच स्मार्टफोन सीरीज चे फोन बाजारात येतील. रिपोर्ट्स नुसार कंपनी गॅलेक्सी एस10 चे 3 वेरिएंट लॉन्च करणार आहे. या वेरिएंट्स मधील एक गॅलेक्सी एस10+ असेल जो गॅलेक्सी नोट सीरीज ची ओळख असलेल्या ‘एस पेन’ सह येईल. या वेरिएंट चा डिस्प्ले पण इतर वेरिएंट्स पेक्षा मोठा असेल.

गॅलेक्सी एस10+ एस पेन सोबत सादर येण्याचा अर्थ हाच काढला जात आहे की गॅलेक्सी एस10+ लॉन्च केल्यानंतर कंपनी गॅलेक्सी नोट10 सादर करणार नाही. गॅलेक्सी एस सीरीज मध्ये एस पेन सोबत लॉन्च होणारा डिवाईस गॅलेक्सी नोट 10 च्या जागी सादर केला जाईल. असे झाल्यास गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये नवीन कोणताही डिवाईस येणार नाही आणि नोट फीचर्स वाला स्मार्टफोन गॅलेक्सी एस सीरीज मध्ये लॉन्च होईल.

सॅमसंग कडून हा निर्णय होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. पण जर कंपनी ने गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीज एक केली तर कंपनी चे हे डिवाईस खुपच एडवांस असतील आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह येतील त्याचबरोबर फ्लॅगशिप चे नवीन रेकॉर्ड बनवतील. या बातमी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही सॅमसंग या दोन्ही सीरीज एकत्र करू शकते तसेच टेक बाजारात आपली स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एक्स’ सादर करू शकते जी फ्लेक्सिबल ​डिस्प्ले सह येईल.