Home बातम्या Samsung घेऊन येत आहे Galaxy F22 स्मार्टफोन, असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

Samsung घेऊन येत आहे Galaxy F22 स्मार्टफोन, असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

सॅमसंगचा फोन

Samsung आपल्या Galaxy F series चा अजून एक स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या या सीरीजचा सर्वात किफायतीशीर स्मार्टफोन असेल. सॅमसंगची हि स्मार्टफोन सीरीज फक्त भारतात सादर करण्यात आली आहे. या सीरीजचा आगामी स्मार्टफोन Galaxy F22 आहे. सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनबाबत माहिती ट्विटरवर @_the_tech_guy अकाउंटच्या माध्यमातून समोर आली आहे. त्याचबरोबर SamMobile ने पण सॅमसंगचा गॅलेक्सी एफ22 स्मार्टफोन कंफर्म केला आहे. SamMobile ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे कि सॅमसंगचा हा स्मार्टफोन Galaxy A22 चा रिब्रँड वर्जन असू शकतो जो अजूनही लॉन्च झाला नाही. सॅमसंगच्या Galaxy F सीरीजचे फोन Galaxy A आणि Galaxy M चे रिब्रँड वर्जन असण्याची हि काही पहिली वेळ नाही. (Samsung working on Galaxy F22 it may be cheaper 5G smartphone)

अपकमिंग Samsung Galaxy A22 स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा 4G आणि 5G वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या 5G वेरिएंटबाबत बोलले जात आहे कि हा मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या फोनच्या 4G वेरिएंटबाबत बोलले जात आहे कि हा Galaxy F22 सारखा असू शकतो. अंदाज लावला जात आहे कि सॅमसंगचा हा स्मार्टफोन मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंग आपले मिडरेंज आणि बजेट सेगमेंटचे स्मार्टफोन्स मोठ्या बॅटरीसह सादर करते.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 Pro चा भारतीय लॉन्च कंफर्म, BIS सर्टिफिकेशनवर लिस्ट झाला स्मार्टफोन

सॅमसंगचा अपकमिंग Galaxy F22 आणि Galaxy A22 दोन्ही लॉन्च झाले नाहीत. शक्यता अशी वर्तवण्यात आली आहे कि कंपनी भारतात Galaxy F22 लॉन्च करेल. तर Galaxy A22 स्मार्टफोन इतर मार्केटमध्ये सादर करेल. कंपनी दोन्ही स्मार्टफोन एकसाथ एका मार्केटमध्ये सादर करू शकत नाही. सॅमसंगच्या या स्मार्टफोनबाबत असे पण बोलले जात आहे कि हे कंपनीचे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतात. सध्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत इतकीच माहिती समोर येऊ शकली आहे.