सॅमसंग अनेक दिवसांपासून नवीन डिजाइन सह आपला नवीन स्मार्टफोन्स सादर करत आहे. गेल्यावर्षी कंपनीने Galaxy A80 स्लाइडर मॅकॅनिज्म सह रोटेटिंग कॅमेरा सह सादर केला होता. आता कंपनी जास्त स्क्रीन स्पेस देण्यासाठी पंचहोल कॅमेऱ्यानंतर पॉप-अप कॅमेरा असलेला फोन आणण्याची योजना बनवत आहे.
मार्केट मध्ये पॉप-अप कॅमेरा मॉड्यूल सह अनेक ब्रँड्सचे फोन्स मार्केट मध्ये आहेत. आता माहिती समोर येत आहे कि Samsung पहिल्यांदाच पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. याआधी कंपनीने कोणत्याही फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा दिला नाही.
प्रसिद्ध फेमस लीक्स्टर @OnLeaks नुसार सॅमसंग पॉप-अप कॅमेरा असलेला नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने Pigtou सह पार्टनरशिप पण केली आहे. या नवीन फोनबाबत जास्त माहिती मिळाली नाही. तसेच फोनच्या डिजाइनच्या माहितीसह असे समोर आले आहे कि फोन अफोर्रेडेबल कॅटेगरी मध्ये सादर केला जाईल.
लीक नुसार फोन मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या मागे दिला जाईल. इतकेच नव्हे तर फोनच्या बॉटमला यूएसबी टाइप सी पोर्ट असेल.
Samsung Galaxy A21s
Samsung Galaxy A21s मध्ये 6.55-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले असेल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल असेल. डिवाइस मध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल.
फोटोग्राफी पाहता गॅलेक्सी A21s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेंसर असेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. डिवाइस मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच Galaxy A21s मध्ये FS स्कॅनर, माइक्रो यूएसबी पोर्ट, एनएफसी कनेक्टिविटी, डुअल सिम, 3.5mm हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 उपलब्ध असेल. कंपनी फोन Black, Blue आणि White कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते.
