Home बातम्या Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

Samsung Galaxy Note 10 Lite, Galaxy S10 Lite आणि Galaxy A51 बद्दल बोलले जात आहे कि हे डिसेंबर मध्ये लॉन्च होतील. साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-N770F सह गीकबेंच वर दिसला आहे. बोलले जात आहे कि लिस्टिंग मध्ये दिसलेला हा फोन Galaxy Note 10 Lite आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये Samsung Galaxy Note 10 Lite चे काही स्पेसिफिकेशन्स पण लीक झाले आहेत. 91mobiles ने अलीकडेच सांगितले होते कि कंपनी Galaxy Note 10 Lite, Galaxy S10 Lite आणि Galaxy A51 डिसेंबर 2019 मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

MySmartPrice ने हा फोन स्पॉट केला आहे. गीकबेंच लिस्टिंग मध्ये डिवाइसला सिंगल-कोर स्कोर 667 आणि मल्टी-कोर स्कोर 2,030 मिळाला होता. बेंचमार्क साइट मध्ये Galaxy Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. डिवाइस मध्ये Exynos 9810 चिपसेट असेल. विशेष म्हणजे Exynos 9810 गेल्यावर्षी सॅमसंगचा फ्लॅगशीप मोबाईल प्रोसेसर होता जो Galaxy S9, Galaxy S9+ आणि Galaxy Note 9 स्मार्टफोन मध्ये होता.

बेंचमार्क साइट वर समोर आले कि गॅलेक्सी नोट 10 मध्ये 6GB रॅम आणि एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Samsung Galaxy Note 10 Lite गेल्या वर्षीच्या Exynos 9810 सह सादर केला जाऊ शकतो. Galaxy Note 10 Lite पुढल्या महिन्यात यूरोप मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या S सीरीज मध्ये Galaxy S10 Lite स्नॅपड्रॅगॉन 855 SoC वर सादर करू शकते. Samsung Galaxy S10 Lite मध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 6.69-इंचाचा डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.