भारतात 5G नेटवर्क लवकरच सुरु होणार आहे. भारतात 5G सेवा सुरु होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) नं यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्या वेगानं 5G सेवा सुरु करण्यासाठी काम करत आहे. बातम्यांनुसार देशातील प्रमुख टेलीकॉम कंपनी जियो भारतात 29 ऑगस्टला भारतात 5G सेवेची घोषणा करू शकते. 5G सेवा सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन फास्ट डाउलोडिंग, लो लेटेंसी, सुधारित नेटवर्क, जास्त नेटवर्क कव्हरेज आणि चांगली परफॉर्मेंस देतील. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे 4G फोनवरून 5G वर जाण्याची. आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या 5G स्मार्टफोनबाबत माहिती देत आहोत जे पुढील महिन्यात भारतात लाँच होऊ शकतात.
Upcoming 5G Smartphone
Apple iPhone 14
Apple चे नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. यंदा कंपनी 7 सप्टेंबरला आपला लाँच इव्हेंट आयोजित करणार आहे. म्हणजे या दिवस Apple iPhone 14 लाइनअप लाँच केली जाईल. या सीरीजचे iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे चार मॉडेल्स लाँच केले जातील. iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल 5G सपोर्टसह बाजारात येतील.
Vivo V25 5G
Vivo नं भारतात अलीकडेच आपल्या स्टायलिश Vivo V25 सीरीज अंतर्गत Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आता कंपनी Vivo V25 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. विवोचा हा फोन मिड रेंजमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये 64MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. विवोचा हा फोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह येईल, अशी चर्चा आहे.
OnePlus Nord 3 5G
OnePlus लवकरच आपला प्रीमिमय अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G लाँच करणार आहे. वनप्लसची नॉर्ड सीरीज खूप लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या OnePlus Nord 2T 5G नंतर आता कंपनी Nord 3 स्मार्टफोन बाजारात सादर करेल. वनप्लसच्या आगामी फोन बाबत दावा केला जात आहे की MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.
Xiaomi 12S Ultra 5G
शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12S Ultra 5G लवकरच भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमीचा हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाल्यापासून चर्चेत आला आहे. Xiaomi 12S Ultra स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. फोनमध्ये 6.73 इंचाचा LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो Leica Summicron लेन्स सिस्टमला सपोर्ट करतो.
Moto Edge 30 Ultra 5G
Moto Edge 30 Ultra 5G स्मार्टफोन देखील लवकरच भारतात लाँच होणार आहे. मोटोरोलाचा आगामी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Motorola X30 Pro 5G चा रिब्रँड व्हर्जन असेल. Motorola X30 Pro स्मार्टफोन 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Samsung च्या ISOCELL HP1 200MP सेन्सरचा वापर करण्यात आला आहे, ज्यात 12.5MP रिजोल्यूशनचा फोटो 16-टू-1 पिक्सल बायनिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 200MP च्या रिजोल्यूशनमध्ये रूपांतरित केला जातो.
iQOO Neo 7
iQOO भारतात पुढील महिन्यात आपला प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन iQOO Neo 7 लाँच करण्याची योजना बनवत आहे. आयकूचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. सध्या या फोनच्या लाँच डेटबद्दल माहिती कंफर्म नाही. आगामी iQOO Neo 7 स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे की यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.
Samsung Galaxy A23 5G
सॅमसंग देखील भारतात सप्टेंबरमध्ये नवीन बजेट 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. सॅमसंगचा अपकमिंग Galaxy A23 5G स्मार्टफोन 16 सप्टेंबरला लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. सॅमसंगचा हा फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. या फोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD पॅनल दिला जाईल. रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
