Sony Liv वर अनेक टीव्ही शो, मूव्ही, वेब सीरीज आणि स्पोर्ट्स कव्हरेज होतं आहेत, ज्यात यूईएफए चॅम्पियन लीग, डब्ल्यूडब्ल्यूई आणि यूएफसीचा समावेश आहे. तसेच या प्लॅटफॉर्म भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट अर्थात Rocket Boys या सीरिज सारखे शोज देखील आहेत. हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लिव सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची व्हिडीओ-ऑन-डिमांड सर्व्हिस मासिक तसेच वर्षी प्लॅन देखील सादर करते. तसेच Sony LIV कडे मोबाइल-ओन्ली प्लॅन देखील आहे. चला जाणून घेऊया भारतात Sony LIV सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमती, वैधता आणि बेनिफिट्स.
Best Sony LIV subscription plans
Sony LIV सब्सक्रिप्शन घेतल्यावर तुम्ही रॉकेट बॉयज, स्कॅम 1992, गुल्लक, सोनी आणि SAB टीव्ही शो, एक्सक्लूसिव्ह ब्लॉकबस्टर मूव्ही, हॉलीवुड टीव्ही शो, आणि टेन स्पोर्ट्स लाइव्ह टीव्हीसह WWE चा पॅकेज्ड टेलीकास्ट बघू शकता. पुढे आम्ही प्लॅनची माहिती दिली आहे.
1. Sony Liv Premium plan
सोनी लिव प्रीमियम प्लॅनपासून सुरु करूया ज्यात मासिक, सहामाही आणि वार्षिक सदस्यत्व उपलब्ध आहे. या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे एकसारखे आहेत. यात लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही चॅनेल, सोनी लिव ओरिजनल टीव्ही शो आणि मूव्ही उदा. स्कॅम 1992, आणि हॉलीवुड चित्रपटांचा समावेश आहे. परंतु वार्षिक आणि सहामाही सब्सस्क्रिप्शन एकावेळी दोन स्क्रीनला सपोर्ट देतं तर सोनी लिव प्रीमियम मंथली सब्सक्रिप्शनमध्ये एकावेळी फक्त एकाच स्क्रीनवर कंटेट पाहता येतो. हा प्लॅन ऑफलाईन डाउनलोडला देखील सपोर्ट करतो. तसेच SonyLiv प्रीमियम मंथली मेबंरशिपची किंमत 299 रुपये आहे, जर वार्षिक आणि सहामाही सदस्यत्वाची किंमत अनुक्रमे 699 रुपये आणि 999 रुपये आहे.
2. Sony Liv WWE Network
हा प्लॅन खास WWE च्या चाहत्यांसाठी आहे. 399 रुपये वर्षाला देऊन सोनी लिव डब्ल्यूडब्ल्यूई नेटवर्क प्लॅनमध्ये लाइव्ह डब्ल्यूडब्ल्यूई कार्यक्रम, एनएक्सटी आणि पीपीवी, संपूर्ण डब्ल्यूडब्ल्यूई लायब्ररी आणि विशेष डब्ल्यूडब्ल्यूई सीरीजचा कंटेंट अॅक्सेस करता येतो.
3. Sony Liv mobile-only
वोडाफोन आयडिया (विआय) युजर्ससह बीटा-टेस्टिंग केल्यानंतर सोनीनं सर्वांसाठी मोबाइल ओन्ली प्लॅनची घोषणा केली आहे. सोनी लिव मोबाइल- ओन्ली सब्सक्रिप्शनच्या नावावरून समजलं असेल की तुम्हाला ओटीटी कंटेंट मोबाइल स्क्रीनवर स्ट्रीम करण्याची परवानगी देतो. हा लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीसाठी सपोर्ट देत नाही. Sony Liv मोबाइल-ओन्ली प्लॅनची भारतात किंमत वर्षाला 599 रुपये आहे.
विआय युजर्स 82 रुपयांच्या प्रीपेड डेटा पॅकसह सब्सक्रिप्शन प्लॅन मिळवू शकतात, जो 4GB हाय-स्पीड इंटरनेट सह येतो. पॅक Sony LIV मोबाइल- ओन्ली प्लॅनची मंथली मेंबरशिप देतो.
Sony LIV free membership
Sony LIV WWE आणि Premium subscriptions व्यतिरिक्त, एक मोफत सदस्यत्व आहे जे तुम्हाला सोनीलिव अॅप आणि वेबसाइटवर द कपिल शर्मा शो आणि टीएमकेओसीसह निवडक टीव्ही शो आणि चित्रपटांचा आनंद घेण्याची अनुमती देतं.
