सोनी ने यावर्षी बर्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये आपला एक्सपीरिया 1 फ्लॅगशिप फोन लॉन्च केला होता. तसेच कंपनी ने एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस मिड-रेंज फोन सादर केले होते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या मिड-रेंज कॅटगरी मध्ये एक्सपीरिया 4 लॉन्च करू शकते. पण आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार कंपनी अपकमिंग फोन एक्सपीरिया 2 नावाने लॉन्च केला जाईल.
सोनी आईएफए टेक ट्रेड शॉ मध्ये आपले नवीन फोन सादर करण्यासाठी ओळखली जाते. पण यावेळी वेगळा अंदाज लावला जात आहे कि कंपनी सप्टेंबर मध्ये एक्सपीरिया 2 लॉन्च करू शकते. सोनी एक्सपीरिया 1 बद्दल बोलायचे तर याची किंमत £799 (जवळपास 74,000 रुपये) आहे. डिवाइस पर्पल, ब्लॅक, ग्रे आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला होता.
आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एक्सपीरिया 2 मध्ये 6.2-इंच सिनेमावाइड डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 21:9 आणि स्क्रीन रेजोल्यूशन (2880 x 1234 पिक्सल) असेल. तसेच हँडसेटचे मेजर पाहता हा 161 x 70 x 8.1एमएम सह येईल. बोलले जात आहे कि कंपनी हा डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आणि 6जीबी रॅम सह आणेल. तसेच फोन मध्ये पवार बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल. तसेच हँडसेट मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक जॅक दिला जाईल.
एक्सपीरिया 2 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच फोन मध्ये दिल्या जाणाऱ्या रियर कॅमेरा सेटअपची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. अशा आहे कि यात एक टीओएफ (टाइम ऑफ फ्लाइट) सेंसर असेल. सध्या एक्सपीरिया 2 बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. एक्सपीरिया 1 स्मार्टफोन आणि एक्सपीरिया 2 मध्ये फरक डिस्प्ले कॅमेरा स्पेक्स आणि बॅटरी क्षमतेचा असेल.
