Sony ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन एक्सपीरिया फोन सादर केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Sony Xperia 5 II नावाने मार्केट मध्ये आणला आहे जो सध्या अमेरिकन बाजारात आला आहे. आर्कषक डिस्प्ले आणि शानदार लुक सोबतच हा फोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो ज्याची किंमत यूएस मार्केट मध्ये $950 म्हणजे भारतीय करंसीनुसार 69,900 रुपयांच्या आसपास आहे. चला एक नजर टाकूया सोनी एक्सपीरिया 5 II च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वर.
Sony Xperia 5 II
सोनी एक्सपीरिया 5 II कंपनीने 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या सिनेमावाइड एफएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 2520 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. Xperia 5 II चा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो ज्यामुळे स्क्रीनचा वापर खूप स्मूद आणि लॅगफ्री होतो. Sony ने या फोन मध्ये BRAVIA X1 कलर्सचा वापर केला आहे.
Sony Xperia 5 II अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे. सोनीने आपला हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Sony Xperia 5 II ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा Exmor RS सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Sony Xperia 5 II डुअल सिम फोन आहे जो 5G आणि 4G वोएलटीई दोन्ही नेटवर्क वर चालतो. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. हा फोन IP68 रेटेड आहे जी या फोनला पाणी आणि धुळीपासून वाचवते. सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी सोनी एक्सपीरिया 5 II मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फक्त ब्लॅक कलर मध्ये लॉन्च झाला आहे.
