Categories: बातम्या

शक्तिशाली प्रोसेसरसह सोनीचा दणकट स्मार्टफोन लाँच; 4 कॅमेऱ्यांसह Sony Xperia 5 IV 5G बाजारात

टेक कंपनी सोनीनं टेक मार्केटमध्ये टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक फ्लॅगशिप मोबाइल फोन जो Sony Xperia 5 IV नावानं लाँच झाला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC चा वापर केला आहे जो एक शक्तिशाली प्रोसेसर आहे. कंपनीनं या नवीन सोनी एक्सपीरिया 5G Phone मध्ये 8GB RAMआणि 120Hz OLED display सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात. पुढे आम्ही फोनच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती दिली आहे.

Sony Xperia 5 IV Specifications

सोनीनं आपला नवीन स्मार्टफोन 2520 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला आहे. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा एक नॉचलेस डिस्प्ले आहे ज्याच्या वरच्या आणि तळाला नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत तसेच वरच्या कडेला सेल्फी कॅमेरा व सेन्सर आहेत. स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

Sony Xperia 5 IV अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चा वापर करण्यात आला आहे. हा नवीन सोनी मोबाइल 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी सोनी एक्सपीरिया स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील Sony Xperia 5 IV 12 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करते.

Sony Xperia 5 IV स्मार्टफोन IP68 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक, एनएफसी व डॉल्बी अ‍ॅटमॉस सोबतच बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा Xperia मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जो 30वॉट फास्ट चर्जिंग तसेच वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. हे देखील वाचा: Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

Sony Xperia 5 IV Price

सोनीनं आपला हा नवीन एक्सपीरिया स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे जो युरोप आणि अमेरिकेत विकला जाईल. या फोनमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे तसेच याची किंमत भारतीय करंसीनुसार 80,000 रुपयांच्या आसपास आहे. Sony Xperia 5 IV स्मार्टफोन Green, Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.

Published by
Siddhesh Jadhav