टेक विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचं नाव म्हणजे अॅप्पल. नावानुसार कंपनीच्या आयफोन्ससाठी तेवढी किंमत देखील मोजावी लागते. परंतु हेच फोन्स दुबईमध्ये त्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतात, आता असं होणार नाही. येत्या 7 सप्टेंबर Apple कंपनी आपली iPhone 14 Series सादर करणार आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल सादर केले जातील. जगभरातील चाहत्यांप्रमाणे भारतातील अॅप्पल प्रेमी आयफोन 14 सीरीजच्या लाँचची आतुरतेने वाट बघत आहेत. ही आयफोन सीरीज भारतीयांसाठी आणखी खास सिद्ध होणार आहे कारण नवीन iPhone 14 Pro Max ची निर्मिती भारतातच होईल.
Apple iPhone 14 सीरीज बद्दल बातम्या समोर येत आहे की कंपनी आपल्या नवीन मोबाइल फोन्सची निर्मिती भारतात करेल. यात iPhone 14 सह iPhone 14 Pro Max नावं देखील समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅप्पल कंपनी आयफोन 14 प्रो मॅक्स चीनमध्ये नव्हे तर भारतात बनवत आहे आणि हे Made in India iPhones भारतातून बाहेर दुसऱ्या देशांमध्ये देखील शिप केले जातील. हे देखील वाचा: iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री
चीन ऐवजी भारतात नवीन आयफोन्सची निर्मिती
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अॅप्पल कंपनीनं आपल्या लेटेस्ट आणि मोठ्या मोबाइल iPhone 14 Pro Max ची असेंबलिंगसाठी यावेळी चायना ऐवजी यावेळी भारतावर आपला विश्वास दर्शवला आहे. परंतु याचा अर्थ चीनमध्ये पूर्णपणे आयफोन 14 सीरीजची निर्मिती होणार नाही असं नाही. परंतु आयफोन 14 सीरीज प्रोडक्शनचा मोठा भाग चीनच्या ऐवजी भारतात सेट करण्यात आला आहे. असे केल्यामुळे लाँचनंतर प्रोडक्शनमध्ये जास्त उशीर होणार नाही.
Made in India iPhone 14 ऑक्टोबरपासून विकले जातील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅप्पल आयफोन मॅन्युफॅक्चरर फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या चेन्नईमधील प्लांटमध्ये iPhone 14 Series असेंबलिंगचं काम सुरु देखील झालं आहे. 7 सप्टेंबरला सीरीज लाँच झाल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासूनच मेड इन इंडिया आयफोन 14 प्रो मॅक्सची विक्री सुरु केली जाईल. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार
iPhone 14 Series ची किंमत किती असेल?
iPhone 14 Series ची निर्मिती भारतात होणार असल्यामुळे फोन शिपमेंटवरील कस्टम ड्यूटीमध्ये कंपनीला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे अॅप्पल इंडियाचा फोन बनवण्याच्या खर्च कमी होईल तसेच टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन देखील काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. फोन बनवण्याचा खर्च कमी झाल्यामुळे कंपनी फोनची सेल प्राइस देखील कमी करू शकते. बाहेरून आयत केल्यावर आयफोन 14 सीरीजची जी किंमत होणार होती त्यापेक्षा कमी किंमतीत हे फोन्स भारतात उपलब्ध होतील अशी आशा आहे.

















