48MP Camera - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Dec 2019 14:15:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/#respond Thu, 26 Dec 2019 14:15:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6130 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात S1 Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनच्या किंमतीसह इतर माहिती आमच्याकडे आली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार भारतीय बाजारात या फोनची किंमत 19,990 रुपये असेल पण याची बॉक्स प्राइस अर्थात MRP 20,990 रुपये असेल. आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे भारतात या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सध्या यायचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी वेरियंटच भारतात उपलब्ध होईल. नंतर 6 GB वेरियंट पण येऊ शकतो.

कंपनीने ऑक्टोबर मध्ये Vivo S1 Pro मॉडेल सादर केला होता ज्यात डायमंड शेप मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि हाच मॉडेल आता भारतात येणार आहे. याबद्द्दल आम्ही आधीपण माहिती दिली आहे कि या फोनसाठी लवकरच ट्रेनिंग सुरु होणार आहे तसेच 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे हा फोन आधी इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स उपलब्ध आहेत. या फोन मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनीने वॉटर ड्रॉप नॉच सह सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला आहे.

Vivo S1 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर सादर केला जाईल आणि फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्ज असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8 GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्हाला तीन स्लॉट मिळतील ज्यात दोन सिम कार्ड आणि एक माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. हा फोन Android 9 Pie वर चालतो आणि यात तुम्हाला फनटच ओएस मिळेल. भारतात लॉन्च झाल्यावर यात वीवोचा फनटच 10 मिळू शकतो.

Vivo S1 Pro मध्ये डायमंड शेप क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा कॅमेरा 48 एमपी चा आहे आणि हा एफ/1.78 अपर्चर सह येतो. त्याचबरोबर 8एमपी ची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे. फोनचा तिसरा आणि चौथा सेंसर 2 एमपी चा आहे. सेल्फी पाहता वीवो एस1 प्रो मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी17 आणि वीवो वी17 प्रो प्रमाणे यात पण तुम्हाला कॅमेरा सह सुपर नाइट मोड मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि सोबत तुम्हाला 18 वॉट चा फास्ट चार्जर पण मिळेल.

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/feed/ 0
8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/#respond Wed, 12 Dec 2018 14:57:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3138 हुआवई ने या फोनचे स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत पण चीनी सोशल नेटवर्किंग साइट वर संपूर्ण स्पेसिफिकेशन आले आहेत.

The post 8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने आधीच घोषणा केली आहे की कंपनी 17 डिसेंबरला नोवा सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करणार आहे. कंपनी नोवा 4 नावाने फोन लॉन्च करणार आहे आणि याचा पोस्टर पण शेयर केला आहे. या पोस्टर मध्ये फोनचा लुक स्पष्ट दिसत आहे. फुल व्यू डिस्प्ले सोबत फोन मध्ये होल पंच नॉच देण्यात आली आहे जशी आपण सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये बघितली आहे. हुआवई ने या फोनचे स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत पण चीनी सोशल नेटवर्किंग साइट वर संपूर्ण स्पेसिफिकेशन आले आहेत.

या लीक मध्ये हुआवई नोवा 4 च्या रॅम, प्रोसेसर आणि मेमरी बद्दल स्पष्ट माहिती घेता येईल. माहिती देण्यात आली आहे की हा फोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. हाई आणि लो वेरियंट मध्ये मुख्य अंतर सेल्फी कॅमेर्‍याच्या आहे. हाइयर वेरियंट मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पण रॅम आणि रोम मध्ये कोणताही फरक नाही.

हुआवई नोवा 4 मध्ये 6.4-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी 2310 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाली एचडी+ स्क्रीन 19.25:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. तर हा फोन हुआवई किरीन 970 वर चालतो जो​ खूप चांगला प्रोसेसर आहे.

हा फोन 8जीबी रॅम मेमेरी सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या सोबत पावर बॅकअप साठी 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी हुआवई नोवा 4 मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्टँडर्ड वर्जन मध्ये 20एमपी + 16एपमी + 2एमपी चा कॅमेरा आहे तर हाईयर वेरियंट मध्ये 20 च्या ऐवजी 48एमपी चा कॅमेरा देण्यात आला आहे.

The post 8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-4-to-launch-with-48mp-rear-camera-in-marathi/feed/ 0