गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात S1 Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनच्या किंमतीसह इतर माहिती आमच्याकडे आली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार भारतीय बाजारात या फोनची किंमत 19,990 रुपये असेल पण याची बॉक्स प्राइस अर्थात MRP 20,990 रुपये असेल. आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे भारतात या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सध्या यायचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी वेरियंटच भारतात उपलब्ध होईल. नंतर 6 GB वेरियंट पण येऊ शकतो.
कंपनीने ऑक्टोबर मध्ये Vivo S1 Pro मॉडेल सादर केला होता ज्यात डायमंड शेप मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि हाच मॉडेल आता भारतात येणार आहे. याबद्द्दल आम्ही आधीपण माहिती दिली आहे कि या फोनसाठी लवकरच ट्रेनिंग सुरु होणार आहे तसेच 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते.
Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन
वर सांगितल्याप्रमाणे हा फोन आधी इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स उपलब्ध आहेत. या फोन मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनीने वॉटर ड्रॉप नॉच सह सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला आहे.
Vivo S1 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर सादर केला जाईल आणि फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्ज असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8 GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्हाला तीन स्लॉट मिळतील ज्यात दोन सिम कार्ड आणि एक माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. हा फोन Android 9 Pie वर चालतो आणि यात तुम्हाला फनटच ओएस मिळेल. भारतात लॉन्च झाल्यावर यात वीवोचा फनटच 10 मिळू शकतो.
Vivo S1 Pro मध्ये डायमंड शेप क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा कॅमेरा 48 एमपी चा आहे आणि हा एफ/1.78 अपर्चर सह येतो. त्याचबरोबर 8एमपी ची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे. फोनचा तिसरा आणि चौथा सेंसर 2 एमपी चा आहे. सेल्फी पाहता वीवो एस1 प्रो मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी17 आणि वीवो वी17 प्रो प्रमाणे यात पण तुम्हाला कॅमेरा सह सुपर नाइट मोड मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि सोबत तुम्हाला 18 वॉट चा फास्ट चार्जर पण मिळेल.















