8जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेर्‍या सह लॉन्च होईल हुआवई नोवा 4, जाणून घ्या याबद्दल सर्व काही

हुआवई ने आधीच घोषणा केली आहे की कंपनी 17 डिसेंबरला नोवा सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करणार आहे. कंपनी नोवा 4 नावाने फोन लॉन्च करणार आहे आणि याचा पोस्टर पण शेयर केला आहे. या पोस्टर मध्ये फोनचा लुक स्पष्ट दिसत आहे. फुल व्यू डिस्प्ले सोबत फोन मध्ये होल पंच नॉच देण्यात आली आहे जशी आपण सॅमसंग गॅलेक्सी ए8एस मध्ये बघितली आहे. हुआवई ने या फोनचे स्पेसिफिकेशन सांगितले नाहीत पण चीनी सोशल नेटवर्किंग साइट वर संपूर्ण स्पेसिफिकेशन आले आहेत.

या लीक मध्ये हुआवई नोवा 4 च्या रॅम, प्रोसेसर आणि मेमरी बद्दल स्पष्ट माहिती घेता येईल. माहिती देण्यात आली आहे की हा फोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. हाई आणि लो वेरियंट मध्ये मुख्य अंतर सेल्फी कॅमेर्‍याच्या आहे. हाइयर वेरियंट मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पण रॅम आणि रोम मध्ये कोणताही फरक नाही.

हुआवई नोवा 4 मध्ये 6.4-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी 2310 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाली एचडी+ स्क्रीन 19.25:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. तर हा फोन हुआवई किरीन 970 वर चालतो जो​ खूप चांगला प्रोसेसर आहे.

हा फोन 8जीबी रॅम मेमेरी सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या सोबत पावर बॅकअप साठी 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी हुआवई नोवा 4 मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्टँडर्ड वर्जन मध्ये 20एमपी + 16एपमी + 2एमपी चा कॅमेरा आहे तर हाईयर वेरियंट मध्ये 20 च्या ऐवजी 48एमपी चा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here