8GB RAM - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Apr 2023 12:49:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/#respond Wed, 12 Apr 2023 12:49:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20235 स्मार्टफोन चालण्यासाठी रँडम अ‍ॅक्सेस मेमरी म्हणजे रॅम खूप आवश्यक आहे. या रॅममध्ये स्मार्टफोन ओएस, अ‍ॅप्स आणि डेटा जो आता वापरात आहे तो साठवून ठेवतो. त्यामुळे ही मेमरी जितकी जास्त तेवढे जास्त अ‍ॅप्स तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. बऱ्याचदा जास्त रॅम फक्त महागड्या फोन्समध्ये मिळतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे […]

The post 15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन चालण्यासाठी रँडम अ‍ॅक्सेस मेमरी म्हणजे रॅम खूप आवश्यक आहे. या रॅममध्ये स्मार्टफोन ओएस, अ‍ॅप्स आणि डेटा जो आता वापरात आहे तो साठवून ठेवतो. त्यामुळे ही मेमरी जितकी जास्त तेवढे जास्त अ‍ॅप्स तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. बऱ्याचदा जास्त रॅम फक्त महागड्या फोन्समध्ये मिळतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे 15 हजारांच्या आत 8 जीबी रॅम देतात. चला पाहूया यादी.

15,000 रुपयांच्या आत 8जीबी रॅम देणारे स्मार्टफोन्स

  1. Infinix Hot 30i
  2. realme C55
  3. Tecno Pova 4
  4. Infinix Note 12 Turbo
  5. Infinix Hot 12 Pro
  6. Moto G32
  7. Xiaomi Redmi 10 Power

Infinix Hot 30i

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G37
  • किंमत : 9,999 रुपये

Infinix Hot 30i स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

realme C55

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G88
  • किंमत : 13,999 रुपये

realme C55 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.72 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात MediaTek Helio G88 चिपसेट मिळतो. जोडीला 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेज देखील आहे. फोनमध्ये 64 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील सेल्फी कॅमेरा 8 एमपीचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Tecno Pova 4

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : MediaTek Helio G99
  • किंमत : 11,999 रुपये

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. कंपनीनं यात MediaTek Helio G99 चिपसेटचा वापर केला आहे. फोन 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेजसह विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी 50 एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000एमएएचची बॅटरी मिळते.

Infinix Note 12 TURBO

  • स्टोरेज : 6.7 इंच
  • प्रोसेसर : MediaTek Helio G96
  • किंमत : 14,499 रुपये

मीडियाटेक हीलियो जी96 प्रोसेसरसह आलेल्या Infinix Note 12 TURBO स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं यात 6.7 इंचाचा मोठा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 2 एमपीचा सेकंडरी सेन्सर आहे. तर पुढे 16 एमपीचा सेल्फी शुटर मिळतो. यातील 5000एमएएचची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Infinix Hot 12 Pro

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Unisoc T616
  • किंमत : 12,999 रुपये

Infinix Note 12 स्मार्टफोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी पावर बॅकअपसाठी मिळते. हा फोन Unisoc T616 प्रोसेसरवर चालतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील डिस्प्लेचा आकार 6.6 इंच असून हा एक एचडी+ डिस्प्ले आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G32

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
  • किंमत : 12,099 रुपये

Moto G32 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.5 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरची ताकद दिली आहे. फोनच्या मागे 50 एमपी + 8 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

Redmi 10 Power

  • स्टोरेज : 128जीबी
  • प्रोसेसर : Snapdragon 680
  • किंमत : 11,471 रुपये

Redmi 10 Power स्मार्टफोनमध्ये Snapdragon 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.71 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे, जो एक एलसीडी पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 15 हजारांच्या 8GB RAM ची पावर असणारे स्मार्टफोन, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phones-under-15000-rupees/feed/ 0
Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/#respond Thu, 26 Dec 2019 14:15:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6130 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात S1 Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनच्या किंमतीसह इतर माहिती आमच्याकडे आली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार भारतीय बाजारात या फोनची किंमत 19,990 रुपये असेल पण याची बॉक्स प्राइस अर्थात MRP 20,990 रुपये असेल. आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे भारतात या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सध्या यायचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी वेरियंटच भारतात उपलब्ध होईल. नंतर 6 GB वेरियंट पण येऊ शकतो.

कंपनीने ऑक्टोबर मध्ये Vivo S1 Pro मॉडेल सादर केला होता ज्यात डायमंड शेप मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि हाच मॉडेल आता भारतात येणार आहे. याबद्द्दल आम्ही आधीपण माहिती दिली आहे कि या फोनसाठी लवकरच ट्रेनिंग सुरु होणार आहे तसेच 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे हा फोन आधी इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स उपलब्ध आहेत. या फोन मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनीने वॉटर ड्रॉप नॉच सह सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला आहे.

Vivo S1 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर सादर केला जाईल आणि फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्ज असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8 GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्हाला तीन स्लॉट मिळतील ज्यात दोन सिम कार्ड आणि एक माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. हा फोन Android 9 Pie वर चालतो आणि यात तुम्हाला फनटच ओएस मिळेल. भारतात लॉन्च झाल्यावर यात वीवोचा फनटच 10 मिळू शकतो.

Vivo S1 Pro मध्ये डायमंड शेप क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा कॅमेरा 48 एमपी चा आहे आणि हा एफ/1.78 अपर्चर सह येतो. त्याचबरोबर 8एमपी ची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे. फोनचा तिसरा आणि चौथा सेंसर 2 एमपी चा आहे. सेल्फी पाहता वीवो एस1 प्रो मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी17 आणि वीवो वी17 प्रो प्रमाणे यात पण तुम्हाला कॅमेरा सह सुपर नाइट मोड मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि सोबत तुम्हाला 18 वॉट चा फास्ट चार्जर पण मिळेल.

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/feed/ 0