स्मार्टफोन चालण्यासाठी रँडम अॅक्सेस मेमरी म्हणजे रॅम खूप आवश्यक आहे. या रॅममध्ये स्मार्टफोन ओएस, अॅप्स आणि डेटा जो आता वापरात आहे तो साठवून ठेवतो. त्यामुळे ही मेमरी जितकी जास्त तेवढे जास्त अॅप्स तुम्ही एकाच वेळी वापरू शकता. बऱ्याचदा जास्त रॅम फक्त महागड्या फोन्समध्ये मिळतो. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहोत, जे 15 हजारांच्या आत 8 जीबी रॅम देतात. चला पाहूया यादी.
15,000 रुपयांच्या आत 8जीबी रॅम देणारे स्मार्टफोन्स
- Infinix Hot 30i
- realme C55
- Tecno Pova 4
- Infinix Note 12 Turbo
- Infinix Hot 12 Pro
- Moto G32
- Xiaomi Redmi 10 Power
Infinix Hot 30i
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : MediaTek Helio G37
- किंमत : 9,999 रुपये
Infinix Hot 30i स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
realme C55
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : MediaTek Helio G88
- किंमत : 13,999 रुपये
realme C55 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.72 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात MediaTek Helio G88 चिपसेट मिळतो. जोडीला 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेज देखील आहे. फोनमध्ये 64 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील सेल्फी कॅमेरा 8 एमपीचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.
Tecno Pova 4
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : MediaTek Helio G99
- किंमत : 11,999 रुपये
Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. कंपनीनं यात MediaTek Helio G99 चिपसेटचा वापर केला आहे. फोन 8 जीबी रॅम 128 जीबीची स्टोरेजसह विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी 50 एमपी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000एमएएचची बॅटरी मिळते.
Infinix Note 12 TURBO
- स्टोरेज : 6.7 इंच
- प्रोसेसर : MediaTek Helio G96
- किंमत : 14,499 रुपये
मीडियाटेक हीलियो जी96 प्रोसेसरसह आलेल्या Infinix Note 12 TURBO स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं यात 6.7 इंचाचा मोठा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागे 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 2 एमपीचा सेकंडरी सेन्सर आहे. तर पुढे 16 एमपीचा सेल्फी शुटर मिळतो. यातील 5000एमएएचची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Infinix Hot 12 Pro
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : Unisoc T616
- किंमत : 12,999 रुपये
Infinix Note 12 स्मार्टफोनमध्ये 5000एमएएचची मोठी बॅटरी पावर बॅकअपसाठी मिळते. हा फोन Unisoc T616 प्रोसेसरवर चालतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील डिस्प्लेचा आकार 6.6 इंच असून हा एक एचडी+ डिस्प्ले आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि डेप्थ सेन्सर मिळतो. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
Moto G32
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 680
- किंमत : 12,099 रुपये
Moto G32 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 6.5 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरची ताकद दिली आहे. फोनच्या मागे 50 एमपी + 8 एमपी + 2 एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची मोठी बॅटरी मिळते.
Redmi 10 Power
- स्टोरेज : 128जीबी
- प्रोसेसर : Snapdragon 680
- किंमत : 11,471 रुपये
Redmi 10 Power स्मार्टफोनमध्ये Snapdragon 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं यात 6.71 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे, जो एक एलसीडी पॅनल आहे. फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह 50 एमपी + 2 एमपीचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.





















