Airtel 4G Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Sep 2018 14:35:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 14:35:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2031 एयरटेल ने 289 रुपयांचा नवीन प्लान आणला गेला आहे जो आइडिया च्या 295 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो.

The post एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम कंपन्यां मधील स्पर्धेत देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने अजून एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. एयरटेल ने 289 रुपयांचा नवीन प्लान आणला गेला आहे जो आइडिया च्या 295 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो. एयरटेलचा हा प्लान जास्त वॅलिडिटी सह 4जी इंटरनेट डाटा आणि वॉयस कॉलिंगची सुविधा देतो.

एयरटेल 289 रुपयांचा प्लान
एयरटेल च्या या लेटेस्ट प्लान बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. एयरटेल ने प्लान 42 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. सर्वात आधी इंटरनेट डेटा बद्दल बोलू, एयरटेल च्या या प्लान मध्ये यूजर्सना 42 दिवसांसाठी एकूण 1 जीबी डेटा मिळेल. या डेटा चा वापर 4जी सोबत 3जी व 2जी स्पीड वर पण केला जाऊ शकतो.

आशा प्रकारे एयरटेल आपल्या प्लान मध्ये 42 दिवस अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. या वॉयस कॉल चा वापर रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना प्लानच्या वॅलिडिटी पर्यंत रोज 100 एसएमएस देईल.

आइडिया 295 रुपयांचा प्लान
आइडिया चा प्लान पाहता हा प्लान पण 42 दिवसांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण 5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येतो. 5जीबी डेटा संपल्यानंतर यूजर्सना अतिरिक्त डेटा साठी पैसे द्यावे लागतील. प्लान मध्ये रोज 250 मिनिट वॉयस कॉलिंग साठी फ्री मिळतील तसेच यूजर्सना एका दिवसासाठी 100 एसएमएस देण्यात येतील.

दोन्ही प्लान्सची तुलना केल्यास इंटरनेट डेटा च्या बाबतीत आइडिया आपल्या यूजर्सना जास्त बेनिफिट देत आहे तर वॉयस कॉलिंग च्या बाबतीत एयरटेल यूजर्सना जास्त फायदा मिळेल.

The post एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/feed/ 0
90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 12:31:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1113 एयरटेल चा हा 90जीबी डाटा रोल ओवर सुविधे सह येतो. म्हणजे एक महिन्यात सर्व 90 जीबी न संपल्यास उरलेले डाटा पुढील महिन्याच्या ​90जीबी डाटा मध्ये जोडला जाईल.

The post 90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आपल्या प्लान्स आणि आॅफरच्या जोरावर देशातील टेलीकॉम बाजारात मजबूत स्थितीत आहे. बाजारातील परिस्थिती बघून आणि अन्य कंपन्यांना उत्तर देण्यासाठी एयरटेल वेळोवेळी आपल्या टॅरिफ प्लान्स मध्ये बदल करत असते. आता पुन्हा एकदा आपल्या जुना प्लान अपडेट करत एयरटेल जियो, वोडाफोन व आयडिया सारख्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. एयरटेल आता आपल्या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी 4जी डाटा देत आहे.

एयरटेल ने ‘माय प्लान इनफिनिटी’ अंतर्गत 649 रुपयांचा प्लान जाहीर केला आहे. हा एक पोस्ट पेड प्लान आहे जो एयरटेल ने अपडेट केला आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना आधी एक बिलिंग सायकल म्हणजे एक महिन्यासाठी एकूण 50जीबी डाटा दिला जात होता जो 4जी व 3जी स्पीड वर वापरता येत होता. अवहाला नुसार आता नवीन बदलांनंतर एयरटेल यूजर्सना या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी इंटरनेट डाटा मिळेल.

एयरटेल चा हा 90जीबी डाटा रोल ओवर सुविधे सह येतो. म्हणजे एक महिन्यात सर्व 90 जीबी न संपल्यास उरलेले डाटा पुढील महिन्याच्या ​90जीबी डाटा मध्ये जोडला जाईल. इंटरनेट डाटा सोबत या प्लान मध्ये पूर्ण महिन्यासाठी मोफत नॅशनल वॉयस कॉल मिळतात जे रोमिंग मध्ये पण वापरता येतात. यासोबतच एयरटेल आपल्या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण देत आहे.

विशेष म्हणजे याच आठवड्यात ट्राई चा एक अहवाल समोर आला होता ज्यात एप्रिल मध्ये वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांनी मिळवलेल्या सब्सक्राइबर्स चे आकडे आहेत. या अहवालात सांगण्यात आले आहे की एप्रिल मध्ये जियो ने 96 लाख सब्सक्राइबर्स मिळवले होते. तसेच या लिस्ट मध्ये आयडिया ने 55 लाख सब्सक्राइबर्स मिळवले तर एयरटेल 45 लाख सब्सक्राइबर्स सह तिसर्‍या नंबर वर आहे.

The post 90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/feed/ 0