90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आपल्या प्लान्स आणि आॅफरच्या जोरावर देशातील टेलीकॉम बाजारात मजबूत स्थितीत आहे. बाजारातील परिस्थिती बघून आणि अन्य कंपन्यांना उत्तर देण्यासाठी एयरटेल वेळोवेळी आपल्या टॅरिफ प्लान्स मध्ये बदल करत असते. आता पुन्हा एकदा आपल्या जुना प्लान अपडेट करत एयरटेल जियो, वोडाफोन व आयडिया सारख्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. एयरटेल आता आपल्या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी 4जी डाटा देत आहे.

एयरटेल ने ‘माय प्लान इनफिनिटी’ अंतर्गत 649 रुपयांचा प्लान जाहीर केला आहे. हा एक पोस्ट पेड प्लान आहे जो एयरटेल ने अपडेट केला आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना आधी एक बिलिंग सायकल म्हणजे एक महिन्यासाठी एकूण 50जीबी डाटा दिला जात होता जो 4जी व 3जी स्पीड वर वापरता येत होता. अवहाला नुसार आता नवीन बदलांनंतर एयरटेल यूजर्सना या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी इंटरनेट डाटा मिळेल.

एयरटेल चा हा 90जीबी डाटा रोल ओवर सुविधे सह येतो. म्हणजे एक महिन्यात सर्व 90 जीबी न संपल्यास उरलेले डाटा पुढील महिन्याच्या ​90जीबी डाटा मध्ये जोडला जाईल. इंटरनेट डाटा सोबत या प्लान मध्ये पूर्ण महिन्यासाठी मोफत नॅशनल वॉयस कॉल मिळतात जे रोमिंग मध्ये पण वापरता येतात. यासोबतच एयरटेल आपल्या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण देत आहे.

विशेष म्हणजे याच आठवड्यात ट्राई चा एक अहवाल समोर आला होता ज्यात एप्रिल मध्ये वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांनी मिळवलेल्या सब्सक्राइबर्स चे आकडे आहेत. या अहवालात सांगण्यात आले आहे की एप्रिल मध्ये जियो ने 96 लाख सब्सक्राइबर्स मिळवले होते. तसेच या लिस्ट मध्ये आयडिया ने 55 लाख सब्सक्राइबर्स मिळवले तर एयरटेल 45 लाख सब्सक्राइबर्स सह तिसर्‍या नंबर वर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here