एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा

टेलीकॉम कंपन्यां मधील स्पर्धेत देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने अजून एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. एयरटेल ने 289 रुपयांचा नवीन प्लान आणला गेला आहे जो आइडिया च्या 295 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो. एयरटेलचा हा प्लान जास्त वॅलिडिटी सह 4जी इंटरनेट डाटा आणि वॉयस कॉलिंगची सुविधा देतो.

एयरटेल 289 रुपयांचा प्लान
एयरटेल च्या या लेटेस्ट प्लान बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. एयरटेल ने प्लान 42 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. सर्वात आधी इंटरनेट डेटा बद्दल बोलू, एयरटेल च्या या प्लान मध्ये यूजर्सना 42 दिवसांसाठी एकूण 1 जीबी डेटा मिळेल. या डेटा चा वापर 4जी सोबत 3जी व 2जी स्पीड वर पण केला जाऊ शकतो.

आशा प्रकारे एयरटेल आपल्या प्लान मध्ये 42 दिवस अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. या वॉयस कॉल चा वापर रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना प्लानच्या वॅलिडिटी पर्यंत रोज 100 एसएमएस देईल.

आइडिया 295 रुपयांचा प्लान
आइडिया चा प्लान पाहता हा प्लान पण 42 दिवसांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण 5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येतो. 5जीबी डेटा संपल्यानंतर यूजर्सना अतिरिक्त डेटा साठी पैसे द्यावे लागतील. प्लान मध्ये रोज 250 मिनिट वॉयस कॉलिंग साठी फ्री मिळतील तसेच यूजर्सना एका दिवसासाठी 100 एसएमएस देण्यात येतील.

दोन्ही प्लान्सची तुलना केल्यास इंटरनेट डेटा च्या बाबतीत आइडिया आपल्या यूजर्सना जास्त बेनिफिट देत आहे तर वॉयस कॉलिंग च्या बाबतीत एयरटेल यूजर्सना जास्त फायदा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here