Android 9 Pie - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 13:30:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/#respond Thu, 10 Jan 2019 09:13:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3348 एचएमडी ग्लोबल ने ऑफिशियली त्या सर्व स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे ज्यांना कंपनी कडून एंडरॉयड ओरिया आणि एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केले जाईल

The post नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे माळी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आधी नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन 8 जानेवारी 2017 ला सादर केला होता. नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन्स लॉन्च च्या वेळीच कंपनी ने स्पष्ट केले होते कि ते आपल्या ग्राहकांना वेळोवेळी एंडरॉयड आणि सिक्योरिटी पॅचचा अपडेट देईल. आता कंपनी ने नवीन वर्षात नोकियाच्या 10 स्मार्टफोन्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यांना एंडरॉयड ओरियो आणि लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम पाईचा अपडेट यावर्षी एप्रिल पर्यंत मिळेल.

एचएमडी ग्लोबल ने ऑफिशियली त्या सर्व स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे ज्यांना कंपनी कडून एंडरॉयड ओरिया आणि एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केले जाईल. नोकियाचे हे स्मार्टफोन यावर्षी एप्रिल मध्ये नवीन ओएस वर अपडेट होतील. नोकिया स्मार्टफोनची हि लिस्ट अशाप्रकारे आहे.

या स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई आणि एंडरॉयड ओरियोचा अपडेट
एचएमडी ग्लोबल ने दिलेल्या लिस्ट नुसार नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोनला एंडरयॉयड पाई चा अपडेट मिळेल. तसेच नोकिया 6, आणि नोकिया 5 स्मार्टफोन साठी एंडरॉयड 8.1 ओरियो व नोकिया 3 साठी एंडरॉयड 8.0 ओरियोचा अपडेट येईल.

एंड्रॉयड 9.0 अपडेट नंतर स्मार्टफोन्स मध्ये ऍप ऍक्शन फीचर येईल, ज्यामुळे यूजर यूज्ड ऍप्स मध्ये सह नेविगेट करू शकतील. तसेच ऍडप्टिव ब्राइटनेस फीचर पण स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचरने डिवाइसची ब्राइटनेस आपोआप सेट होईल. बॅटरी ऑप्टिमाइजेशनचे फीचर पण या अपडेट मधून नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचर मुळे बॅटरी लाइफ अधिकपेक्षा चांगली होईल.

तसेच नोकिया यावर्षी सादर करणाऱ्या स्मार्टफोन्सचे लीक व माहिती समोर येत आहे. नोकियाचे आगामी स्मार्टफोन नोकिया 9 प्योरव्यू ची बातमी काही दिवसांपूर्वी चीनीच्या माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर नोकियाच्या एका स्मार्टफोनचा फोटो शेयर करण्यात आला आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा आणि बेजल लेस फोन दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये कोणतीही नॉच व सेल्फी कॅमेरा दिसत नाही.

The post नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/feed/ 0
फोन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट करण्याआधी या 7 गोष्टींची काळजी घ्या https://www.91mobiles.com/marathi/everything-to-know-before-the-android-9-pie-update-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/everything-to-know-before-the-android-9-pie-update-in-marathi/#respond Fri, 16 Nov 2018 14:41:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2887 आपल्या एंडरॉयड फोनला अपडेट करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे पण आवश्यक आहे. खाली आम्ही अशाच काही गोष्टींचा उल्लेख केला आहे.

The post फोन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट करण्याआधी या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एंडरॉयड ने आपल्या नवीन आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई ची माहिती खूप आधीच दिली होती. त्यानंतर कपंनी ने हि उपलब्ध पण करून दिली. एंडरॉयड 9 पाई चे बीटा वर्जन आधीच आले होते. नंतर पिक्सल 3 डिवाइस सह हि आॅपरेटिंग सिस्टम अधिकृतरित्या उपलब्ध झाली आणि आता अनेक फोन एंडरॉयड 9 पाई आॅपरेटिंग सिस्टम सह लॉन्च होत आहेत. तर मोबाईल निर्माता आता आपल्या जुन्या फोनला पण नवीन आॅपरेटिंग सिस्टम चा अपडेट देत आहेत. नुकतेच शाओमी, नोकिया, वीवो, ओपो, सोनी आणि असूस सहित अनेक कंपन्यांनी आपल्या जुन्या फोन मध्ये नवीन आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाईचा अपडेट देणार असल्याचे सांगितले आहे.

Software

नवीन ओएस अपडेट मध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळतील सोबतच फोनची परफॉर्मेंस पण स्मूथ होईल. परंतु आपल्या एंडरॉयड फोनला अपडेट करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे पण आवश्यक आहे. खाली आम्ही अशाच काही गोष्टींचा उल्लेख केला आहे.

1. फोनची मेमरी तपासा

memory

यात शंकाच नाही कि अपडेट नंतर फोन आधीपेक्षा खूप चांगला चालतो आणि अनेक नवीन फीचर्स पण मिळतात. म्हणूनच नवीन आॅपरेटिंग सिस्टम वर फोनला अपडेट केला पाहिजे. परंतु अनेकदा अपडेट फोन वरच भारी पडतो. जर फोनची इंटरनल मेमरी कमी असेल आणि रॅम मेमरी पण जास्त नसेल तर मग अपडेट करू नये. त्यामुळे तुमच्या फोनला नवीन एंडरॉयड 9 पाईचा अपडेट मिळाला असेल तर सर्वात आधी फोनची मेमरी तपासा.

2. दोन अपडेट मिळाले असतील तर..

Android O Oreo

जर तुम्ही तुमच्या फोनला दोनदा आधीच्या ओएस वर अपडेट केले असेल तर. जसे तुमचा फोन मार्शमेलो वर लॉन्च झाला होता आणि तुम्ही हा नुगट आणि ओरियो वर अपडेट केला आहे असे असल्यास एंडरॉयड 9 पाई वर अपडेट करू नये. हार्डवेयर चांगला असूनही समस्या येऊ शकते. कारण तुमचा फोन जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त जुना झाला आहे आणि जुन्या हार्डवेयर सोबत ओएस मध्ये कंपॅटिबिलिटीची समस्या येऊ शकते. त्यामुळे विचार करून अपडेट करा.

3. फोन ठेवा चार्ज

charge

जर वर दिलेली कोणतीही समस्या तुमच्या फोन मध्ये नसल्यास तुम्ही अपडेट करू शकता. जर तुमच्या फोन मध्ये आॅपरेटिंग सिस्टमचा अपडेट आला असल्यास आणि तुम्ही अपडेट करणार असाल तर सर्वात आधी फोनला पूर्णपणे चार्ज करा. जरी पूर्णपणे चार्ज नसल्यास निदान 70 ते 80 टक्के चार्जिंग असावी. जर फोनची बॅटरी कमी असली आणि आॅपरेटिंग सिस्टम अपडेट करताना फोन बंद झाला तर मग सॉफ्टवेयर मध्ये समस्या येऊ शकते.

4. फोनचा बॅकअप घ्या

data

ताई पाहता अपडेट साठी बॅकअप घेण्याची गरज नाही पण तुम्ही नवीन आॅपरेटिंगचा अनुभव अगदी नवीन फोन प्रमाणे घेऊ इच्छित असाल तर बॅकअप घ्या. कॉन्टॅक्ट आणि व्हाट्सऍप क्लाउड वर बॅकअप होतात पण फोटो आणि मीडिया फाइलचा बॅकअप लोक घेत नाहीत त्यामुळे तुम्ही पीसी, पेनड्राइव किंवा मग कार्ड मध्ये आपल्या फोनचा सर्व डेटा बॅकअप घ्या. आता तुम्ही तुमचा फोन अपडेट करू शकता.

5. वाईफाई नेटवर्कशी रहा कनेक्ट

wifi

फोन अपडेट तेव्हाच करा जेव्हा तुम्ही वाईफाई नेटवर्कशी कनेक्टड असाल. कारण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टमची साइज 1जीबी पेक्षा पण जास्त असते. त्यामुळे तुम्ही ओएस अपडेट मोबाईल नेटवर्क ऐवजी वाईफाई नेटवर्क वरून केल्यास चांगलेच.

6. करा फॅक्टरी डेटा रिसेट

Software

एंडरॉयड 9 पाईचा अपडेट खूप मोठा आहे. हा 1जीबी पेक्षा जास्त आहे त्यामुळे ओएस डाउलोड आणि इंस्टॉल होण्यास खूप वेळ लागेल. एकदा फोन अपडेट झाल्यास फॅक्टरी डेटा रिसेट करा. हे करणे आवश्यक नाही पण याने तुमचा फोन अजूनच स्मूथ होईल. फोन मधील फॅक्टरी डेटा रिसेट चा पर्याय सेटिंग मध्ये मिळेल.

android

तसेच हार्डवेयर बटण च्या माध्यमातून पण तुम्ही हार्डबूट पण करू शकता. हार्डबूट करण्यासाठी आधी फोन आॅफ करा आणि पावर व वॉल्यूम डाउन किंवा अप बटण एक साथ दाबून ठेवा. अशाने तुमचा फोन बूट मोड मध्ये जाईल. तिथे टच स्क्रीन चालणार नाही तुम्हाला अप डाउन साठी वॉल्यूम बटण आणि ओके करने साठी पावर बटणची मदत घ्यावी लागेल. तिथे डेटा रिसेटचा आॅप्शन निवडा.

7. ऍप डेटा करा रिस्टोर

Apps

जेव्हा फोन आॅन होईल तेव्हा तुम्ही तुमचा डेटा रिस्टोर करू शकता. तुम्ही हाच विचार करत असला कि आॅडियो, वीडियो, फोटो आणि डॉक्यूमेंट सहित अन्य डेटा रिस्टोर कराल पण ऍप्सचे काय करायचे जे फोन मध्ये इंस्टॉल होते? तर लक्षात घ्या त्यांची माहिती पण तुम्ही घेऊ शकता आणि फक्त एका क्लिकने ते इंस्टॉल पण करता येतील.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये प्ले स्टोर ओपन करावे लागेल. प्ले स्टोर मध्ये तुम्ही लॉगिन असाल याची खात्री करून घ्या. आता तुम्ही माय ऍप्स एंड गेम्स मध्ये जाऊन वर अपडेट, इंस्टॉल्ड आणि लाइब्रेरी चा पर्याय मिळेल. तुम्हाला लाइब्रेरी वर क्लिक करायचे आहे. मग सर्व ऍप्सची लिस्ट तुमच्या समोर येईल जे तुम्ही तुमच्या फोन मध्ये इंस्टॉल केले होते. तुम्हाला फक्त क्लिक करून ते ऍप्स इंस्टॉल करायचे आहेत.

The post फोन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट करण्याआधी या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/everything-to-know-before-the-android-9-pie-update-in-marathi/feed/ 0
डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 08:14:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1597 गूगल च्या पिक्सल सीरीज च्या सर्व स्मार्टफोन्स आज पासून एंडरॉयड पाई वर अपडेट होत आहेत तर इतर स्मार्टफोन्सना एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळण्यासाठी थोडा वेळ जाईल.

The post डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज गूगल ने मार्च महिन्यात आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 च्या मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ सादर केला होता. कंपनी ने तेव्हा एंडरॉयड पी म्हणजे एंडरॉयड पाई चा फक्त बीटा वर्जन आणला होता. पण आज गूगल ने एंडरॉयड च्या सर्वात लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई ला अधिकृतपणे जगभरात रोलआउट केला आहे. गूगल ने एंडरॉयड पाई आॅफिशियली जाहीर करण्यासोबतच एंडरॉयड चा लेटेस्ट अपडेट कोणत्या स्मार्टफोन्सना मिळेल तसेच कशा प्रकारे हा एडवांस वर्जन आपल्या फोन मध्ये डाउनलोड करावा हे देखील सांगितले आहे.

एंडरॉयड 9 पाई एडवांस एआई, अडॅप्टिव बॅटरी, वेल ​बीइंग फीचर, एसयूएसएच (SUSH) आणि न्यू नेविगेशन सारख्या अनेक आर्कषक फीचर्स सह येतो. एंडरॉयड 9 पाई ​चे फीचर्स किती खास आहेत आणि किती सक्षम आहेत ही जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). गूगल पिक्सल सोबतच जरुर तुम्ही पण तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई इंस्टाल करू इच्छित असाल तर आम्ही त्या सर्व स्टेप्स सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड पाई चा अपडेट इंस्टाल पण करू शकता.

तुमच्या फोन मध्ये आला आहे का एंडरॉयड पी अपडेट?

सर्वात आधी जाणून घ्या कि तुमच्या स्मार्टफोन मध्ये एंडरॉयड चा कोणता वर्जन आहे. यासाठी :

1. स्मार्टफोन ची सेटिंग्स ओपन करा आणि त्यात ‘सिस्टम’ आॅप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा आॅप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक करताच समजेल की तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन आहे.

कसा कराल स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट

1. ‘अबाउट फोन’ मध्ये एंडरॉयड सिक्योरिटी पॅच चा आॅप्शन देण्यात आला आहे, यावर क्लिक करा
2. जर तुमच्या फोन साठी नवीन एंडरॉयड चा अपडेट उपलब्ध असेल तर डाउनलोड अ‍ॅण्ड इंस्टाल चा आॅप्शन येईल
3. नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट करावा
4. डाउनलोड अॅण्ड इंस्टाल वर टॅप करा, नवीन अपडेट डाउनलोड व्हायला सुरवात होईल

एंडरॉयड 9 पाई गूगल द्वारा ओटीए अर्थात् ओवर-द-एयर च्या माध्यमातून सर्व स्मार्टफोन्स येईल. गूगल ने सांगितले आहे की सोनी मोबाईल, शाओमी, एचएमडी ग्लोबल, ओपो, वीवो, वनप्लस आणि असेन्शल ब्रांड च्या सर्व स्मार्टफोन्स सोबतच ते स्मार्टफोन जे एंडरॉयड वन वर सादर करण्यात आले आहेत, त्यांना एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळेल. गूगल च्या पिक्सल सीरीज च्या सर्व स्मार्टफोन्स आज पासून एंडरॉयड पाई वर अपडेट होत आहेत तर इतर स्मार्टफोन्सना एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळण्यासाठी थोडा वेळ जाईल.

The post डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/feed/ 0