नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात

नोकियाचे माळी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आधी नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन 8 जानेवारी 2017 ला सादर केला होता. नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन्स लॉन्च च्या वेळीच कंपनी ने स्पष्ट केले होते कि ते आपल्या ग्राहकांना वेळोवेळी एंडरॉयड आणि सिक्योरिटी पॅचचा अपडेट देईल. आता कंपनी ने नवीन वर्षात नोकियाच्या 10 स्मार्टफोन्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यांना एंडरॉयड ओरियो आणि लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम पाईचा अपडेट यावर्षी एप्रिल पर्यंत मिळेल.

एचएमडी ग्लोबल ने ऑफिशियली त्या सर्व स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे ज्यांना कंपनी कडून एंडरॉयड ओरिया आणि एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केले जाईल. नोकियाचे हे स्मार्टफोन यावर्षी एप्रिल मध्ये नवीन ओएस वर अपडेट होतील. नोकिया स्मार्टफोनची हि लिस्ट अशाप्रकारे आहे.

या स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई आणि एंडरॉयड ओरियोचा अपडेट
एचएमडी ग्लोबल ने दिलेल्या लिस्ट नुसार नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोनला एंडरयॉयड पाई चा अपडेट मिळेल. तसेच नोकिया 6, आणि नोकिया 5 स्मार्टफोन साठी एंडरॉयड 8.1 ओरियो व नोकिया 3 साठी एंडरॉयड 8.0 ओरियोचा अपडेट येईल.

एंड्रॉयड 9.0 अपडेट नंतर स्मार्टफोन्स मध्ये ऍप ऍक्शन फीचर येईल, ज्यामुळे यूजर यूज्ड ऍप्स मध्ये सह नेविगेट करू शकतील. तसेच ऍडप्टिव ब्राइटनेस फीचर पण स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचरने डिवाइसची ब्राइटनेस आपोआप सेट होईल. बॅटरी ऑप्टिमाइजेशनचे फीचर पण या अपडेट मधून नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचर मुळे बॅटरी लाइफ अधिकपेक्षा चांगली होईल.

तसेच नोकिया यावर्षी सादर करणाऱ्या स्मार्टफोन्सचे लीक व माहिती समोर येत आहे. नोकियाचे आगामी स्मार्टफोन नोकिया 9 प्योरव्यू ची बातमी काही दिवसांपूर्वी चीनीच्या माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर नोकियाच्या एका स्मार्टफोनचा फोटो शेयर करण्यात आला आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा आणि बेजल लेस फोन दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये कोणतीही नॉच व सेल्फी कॅमेरा दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here