Apple iPhone Xs - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जाणून घ्या भारतात कसा चालेल आयफोन 10एस चा डुअल सिम फंक्शन आणि ईसिम म्हणजे काय https://www.91mobiles.com/marathi/know-how-dual-sim-works-in-the-iphone-xs-and-iphone-xs-max-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/know-how-dual-sim-works-in-the-iphone-xs-and-iphone-xs-max-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 15:04:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2119 आता अॅप्पल यूजर्स पण आयफोन मध्ये एक साथ दोन सिम कार्ड वापरू शकतील. पण खास बाब ही की यातील एक फिजिकल सिम असेल तर दुसरा ईसिम असेल.

The post जाणून घ्या भारतात कसा चालेल आयफोन 10एस चा डुअल सिम फंक्शन आणि ईसिम म्हणजे काय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज अॅप्पल ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले नवीन आयफोन सादर केला आहे. अॅप्पल ने आयफोन 10आर, आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स लॉन्च केले आहेत. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स अॅप्पल ने आता पर्यंत लॉन्च केलेल्या सर्व आयफोन्स पेक्षा वेगळे आहेत. त्याचे कारण नवीन आयफोन मधील डुअल सिम सपोर्ट आहे. हो अगदी बरोबर वाचलंत तुम्ही, आता अॅप्पल यूजर्स पण आयफोन मध्ये एक साथ दोन सिम कार्ड वापरू शकतील. पण खास बाब ही की यातील एक फिजिकल सिम असेल तर दुसरा ईसिम असेल.

पण कंपनी ने माहिती दिली आहे की चीन मध्ये ईसिम कॉन्सेप्ट नाही त्यामुळे अॅप्पल आयफोन10 एस मॅक्स मध्ये डुअल सिम स्लॉट मिळेल परंतु भारता सहित दुसर्‍या देशांमध्ये ईसिम वाला मॉडेलच येईल. त्यामुळे तुम्हाला प्रश्ण पडू शकतो की ईसिम म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा. चला तर जाणून घेऊया अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये एक साथ दोन सिम खासकरून ईसिम कसा वापरला जाईल.

कसा चालतो ईसिम

आधी सांगितल्याप्रमाणे ईसिम फोनच्या हार्डवेयर मध्ये असतो आॅपरेटर प्रोफाईल डाउनलोड करे पर्यंत हा एक्टिवेट होत नाही. आता पर्यंत आयफोन ईसिम वॉच सोबत कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ ने पेयर करण्यात येत होते पण आता ईसिम मुळे स्मार्टवॉच, फिटनेस बँड किंवा कोणताही वियरेबल डायरेक्ट फोन मोबाईल नेटवर्क शी कनेक्ट केला जाऊ शकतो. म्हणजे जो नंबर आयफोन मध्ये आहे तोच नंबर यूजर आपल्या अॅप्पल वॉच मध्ये पण ए​क्टिवेट करू शकतील.

ईसिम म्हणजे काय

ईसिम इम्बेडेड सिम चे छोटे नाव आहे. ईसिम साईज मध्ये नेहमीच्या सिम कार्ड पेक्षा 10 पट छोटा असतो. हा सिम इतर सिम कार्ड प्रमाणे फोन मध्ये टाकाल जात नाही तर ज्यावेळी फोन मॅन्युफॅक्चर केला जातो त्यावेळी हा सिम पण त्या फोन सोबत बनवला जातो. हा सिम फोन च्या हार्ड वेयर मध्ये सामील असतो आणि हा फोन च्या बाहेर काढता येत नाही. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये पण याच ​ईसिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा सिम फोन च्या हार्डवेयर मध्ये असतो पण तोपर्यंत एक्टिवेट होत नाही जोपर्यंत याचा प्रोफाईल फोन मध्ये आॅपरेटर नेटवर्क वरून डाउनलोड केला जात नाही.

फायदा काय

अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स पहिले असे आयफोन आहेत जे डुअल सिम फंक्शनालिटी सह सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही आयफोन मध्ये एक साथ दोन वेगवेगळे कंपन्यांचे नंबर वापरता येतील. आयफोन मधील दोन्ही सिम स्टँडबाय मोड वर असतील, म्हणजे एकाच वेळी दोन्ही सिम वर कॉल रिसीव होऊ शकतात आणि डॉयल पण केले जाऊ शकतात.

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये डुअल सिम वापरता येतील पण त्या दोघांपैकी एक सिम तुम्हाला तोच ठेवावा लागेल जो फोन ला आधी पासून सपोर्ट करतो. जगात एकूण 14 नेटवर्क आहेत जे अॅप्पल च्या नवीन आयफोन साठी आपला ईसिम उपलब्ध करतील. विशेष म्हणजे आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील ईसिम सीडीएमए असेल तर फोन मधील फिजीकल सिम स्लॉट मध्ये यूजर फक्त जीएसएम सिम टाकू शकतील. म्हणजे नवीन आयफोन एक साथ दोन सीडीएमस सिम ला सपोर्ट करणार नाही.

कसा वापरता येईल भारतात

अॅप्पल ने सांगितले आहे की भारतात फक्त दोन ​टेलीकॉम कंपन्याच आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये ईसिम सपोर्ट देतील. या दोन कंपन्यांमध्ये देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आणि देशातील सर्वात वेगाने वाढत असलेली कंपनी रिलायंस जियो आहे. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स ला जियो आणि एयरटेल कडून बंडल आॅफर सह विकले जाऊ शकतात.

लक्षात असू द्या कि रिलायंस जियो आणि एयरटेल दोन्ही कंपन्या आधीपासून भारतात अॅप्पल वॉच सीरीज 3 विकत आहेत. एयरटेल आणि जियो द्वारा विकण्यात येणारी अॅप्पल वॉच सीरीज 3 यूजर्सना विना फोन कॉल करण्याची व रिसीव करण्याची सुविधा देते. त्याचप्रमाणे आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील ईसिम मधून वोडाफोन आणि एयरटेल नेटवर्क वर एक्स्ट्रा खर्चा विना व ब्लूटूथ कनेक्टिविटी वीना आयफोन वर आलेले कॉल अॅप्पल वॉच वरून पण रिसीव करता येतात.

वेगळा असेल चीन मधील मॉडेल

अॅप्पल ने आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील डुअल सिम सपोर्ट चीन साठी वेगळा बनवला आहे. चीन सोबतच हांगकांग आणि मकाउ मधे ईसिम वाला फीचर नवीन आयफोन मध्ये दिसणार नाही. तिथे अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स चे असे मॉडेल लॉन्च केले जातील ज्यात दोन सिम स्लॉट असतील. म्हणजे यूजर आपल्या मर्जीने दोन सिम कार्ड टाकू शकतील

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स च्या चीन, हांगकांग व मकाउ मध्ये लॉन्च होणार्‍या मॉडल्स मध्ये सिम ट्रे एकच असेल पण या ट्रे मध्ये दोन वेगवेगळे सिम एकावर एक ठेवता येतील. भारतात आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स 28 सप्टेंबर पासून भारतात विकत घेता येईल. नवीन आयफोन्स गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मक्स च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा )
आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स ची भारतीय किंमत (इथे क्लिक करून) बघू शकता.

The post जाणून घ्या भारतात कसा चालेल आयफोन 10एस चा डुअल सिम फंक्शन आणि ईसिम म्हणजे काय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-how-dual-sim-works-in-the-iphone-xs-and-iphone-xs-max-in-marathi/feed/ 0
डुअल सिम आणि 7एनएम चिपसेट सह लॉन्च झाले सुपर फास्ट अॅप्पल आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xs-and-iphone-xs-max-launches-feature-specifications-and-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xs-and-iphone-xs-max-launches-feature-specifications-and-price-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 07:20:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2077 खास बाब म्हणजे पहिल्यांदाच कंपनी ने डुअल सिम वाले फोन सादर केले आहेत. आयफोन 10एस मॅक्स मध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे.

The post डुअल सिम आणि 7एनएम चिपसेट सह लॉन्च झाले सुपर फास्ट अॅप्पल आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल एक असा ब्रँड आहे ज्याने वर्षातून फक्त एकदा जरी आपले फोन लॉन्च केले तरी कपंनी वर्षभर चर्चेत असते. काल पण तसेच झाले प्रत्येकजण अॅप्पल बद्दल बोलत होता. अॅप्पल ची जगभरात चर्चा होत होती. कारण होते ​अमेरिकेतील कूपर्टिनों मधील स्टीव जॉब्स थियेटर मध्ये अॅप्पल आयफोन 10एस लॉन्च होत होता प्रत्येकजण फोन बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. अॅप्पल वॉच सीरीज 4 च्या लॉन्च ने इवेंट ची सुरवात झाली आणि त्यानंतर अॅप्पल आयफोन 10एस ची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कंपनी ने एक—एक करून या फोन चे फीचर्स सांगायला सुरवात केली. अॅप्पल ने आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स सादर केले आहेत. पण खास बाब म्हणजे पहिल्यांदाच कंपनी ने डुअल सिम वाले फोन सादर केले आहेत. आयफोन 10एस मॅक्स मध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे.

आयफोन 10एस (Apple iPhone XS)

नावा नुसार हा फोन अॅप्पल च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने लॉन्च झालेल्या आयफोन 10 चा अपेडेटेड वर्जन आहे. हा फोन ग्लास बॉडी सह सादर करण्यात आला आहे जी सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टील फ्रेम सह याला शानदार लुक देते. या फोन मध्ये 2436 X 1125 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.8-इंचाचा सुपर रेटीना ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो नॉच सह उपलब्ध आहे. कंपनी ने 1 मिलियन टू 1 कॉन्ट्रास्ट रेशियो वाला एचडीआर डिस्प्ले वापरला आहे जो तुम्हाला चांगला व्यू देईल.

त्याचबरोबर 120 हट्र्ज टच सेंसिंग, 3डी टच आणि टॅप टू वेक सारख्या फीचर्स चा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे हा बेस्ट बनतो.

तुम्हाला तर माहितीच आहे अॅप्पल आपल्या डिवाइस मधील रॅम ची माहिती देत नाही. त्यामुळे आयफोन 10एस (iPhone XS) च्या रॅम ची पण माहिती कंपनी ने दिली नाही पण बातमी नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम आहे. तसेच नवीन आयफोन 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या तीन वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

आयफोन एक्सएस अॅप्पल च्या सर्वात नवीन आणि पावरफुल ए12 बायनोइक चिपसेट वर चालतो. हा चिपसेट 7 नॅनोमीटरचा चिपसेट आहे जो 6 कोर सीपीयू आणि 4 कोर जीपीयू ची पावर एकत्रित करतो. अॅप्पल चा हा चिपसेट फास्ट आणि लॅग फ्री प्रोसेसिंग करू शकतो तसेच फोन मधील आईओएस 12 उत्तम यूजर इंटरफेस देतो.

अॅप्पल आयफोन 10एस च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. तुम्हाला तर माहितीच आहे की कंपनी टेलीफोटो लेंस वापरते. या फोन मध्ये पण असेच झाले आहे. पण खास बाब ही की कंपनी ने नवीन सेंसर मध्ये पिक्सल दिले आहेत. तसेच टेलीफोटो लेंस वाइड अपर्चर सह येईल. फोन चा कॅमेरा आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन ला सपोर्ट करतो आणि बोके इफेक्ट व मोशन वीडियो इत्यादिचा सपोर्ट पण मिळेल. त्याचबरोबर फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 7-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत एक आईआर कॅमेरा सेंसर पण आहे. फोन च्या नॉच मधील सेंसर 3डी फेस रेक्ग्नेशन सह फास्ट अनलॉकिंग करू शकतो.

आयफोन एक्सएस आईपी68 सर्टिफाइड आहे, ज्यामुळे हा पाणी आणि धूळी पासून वाचू शकतो. आयफोन 10एस मध्ये सिंगल सिम स्लॉट आहे पण काही देशांत ई-सिम च्या माध्यमातून डुअल सिम सपोर्ट करने मिळू शकतो. कंपनी चा दावा आहे की तुम्ही दोन सिम नंबर आणि डेटा प्लान चा वापर करू शकता. हा फोन वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो.

अॅप्पल आयफोन 10एस मॅक्स (Apple iPhone XS Max)

अॅप्पल आयफोन 10एस सोबत कंपनी ने आयफोन 10एस मॅक्स पण आणला आहे. नावावरून समजले असेलच की यात मोठी स्क्रीन मिळेल. आयफोन 10एक्सएस मॅक्स अॅप्पल ने लॉन्च केलेला सर्वात महाग स्मार्टफोन आहे आणि या फोन मध्ये 6.5-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. कंपनी ने यात पण सुपर रेटीना ओएलईडी डिस्प्ले (2688 X 1242 पिक्सल रेज्ल्यूशन) दिला आहे ज्यात कंपनी ने 1 मिलियन टू 1 कॉन्ट्रास्ट रेशियो वाल्या एचडीआर डिस्प्ले चा वापर केला आहे. कंपनी ने डॉल्बी एचडीआर10 चा वापर केला आहे जो शानदार अनुभव देऊ शकतो.

अॅप्पल आयफोन 10एस मॅक्स मध्ये पण 10एस प्रमाणे एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. कंपनी ने एक टेलीफोटो लेंस चा वापर केला आहे जी कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेते. तसेच टेलीफोटो लेंस वाइड अपर्चर सह येते. या मॉडल मध्ये पण तुम्हाला आप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट मिळेल. तसेच बोके इफेक्ट आणि पोर्टेट व स्लो मोशन वीडियो इत्यादिचा सपोर्ट पण मिळेल. या फोन मध्ये पण 7-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

आयफोन 10एस मॅक्स च्या इतर स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे आणि तुम्ही एक साथ दोन फिजिकल सिम वापरू शकता. अॅप्पल ने हा फोन पण 4जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन पण कंपनी च्या ए12 चिपसेट वर चालतो तसेच यात आईओएस 12 अपडेटेड आहे. कंपनी चा दावा आहे की हा जुन्या मॉडल पेक्षा खुप वेगवान आहे आणि यात गेमिंग चा अनुभव पण शानदार मिळेल.

आयफोन 10एस चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट अॅप्पल ने 999 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 71,800 रुपये आहे. तसेच आयफोन 10एस मॅक्स चा 64जीबी मेमरी वेरिएंट 1099 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे जी भारतीय करंसी नुसार 79,000 रुपयांच्या आसपास आहे.

अॅप्पल चा आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स 28 सप्टेंबर पासून भारतात विकत घेता येईल. नवीन आयफोन्स गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post डुअल सिम आणि 7एनएम चिपसेट सह लॉन्च झाले सुपर फास्ट अॅप्पल आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xs-and-iphone-xs-max-launches-feature-specifications-and-price-in-marathi/feed/ 0
12 सप्टेंबरला लॉन्च होईल अॅप्पल आयफोन Xएस आणि सोबत दोन नवीन मॉडेल https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-launch-date-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-launch-date-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 09:13:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1893 कंपनी ने मीडिया इनवाइट ला गॅदर राउंड असे नाव दिले आहे.

The post 12 सप्टेंबरला लॉन्च होईल अॅप्पल आयफोन Xएस आणि सोबत दोन नवीन मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून अॅप्पलच्या नवीन फोन्स बद्दल अनेक बातम्या येत होत्या. अनेक लीक मधून अशी माहिती देण्यात आली होती की गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी पण कंपनी तीन मॉडेल सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी अशी सुचना देण्यात आली होती की कंपनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे फोन्स जगासमोर आणू शकते आणि आज अॅप्पल ने मीडिया इनवाइट शेयर केले आहे. 12 सप्टेंबरला अॅप्पल ने एका इवेंटचे आयोजन करत आहे आणि तेव्हा कंपनी हे फोन्स समोर आणेल.

अॅप्पलचा हा इवेंट कंपनी च्या यूएस मधील कूपरर्टिनो येथील मुख्यालयात अॅप्पल चे फाउंडर स्टिव जॉब्स च्या नावाने असलेल्या थियेटर मध्ये केला जाईल. कंपनी ने मीडिया इनवाइट ला गॅदर राउंड असे नाव दिले आहे. पण या मीडिया इनवाइट बद्दल बोलले जात आहे की कंपनी आयफोन सोबत राउंड शेप मधील अॅप्पल वॉच पण सादर करू शकते.

नवीन आयफोन बद्दल बोलायचे झाले तर या लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी यावेळी तीन वेगवेगळ्या स्क्रीन साइज मध्ये फोन्स अणू शकते. एक मॉडेल कमी रेंज चा असेल ज्यात 6.1—इंचाची स्क्रीन असेल आणि कंपनी हा एलसीडी स्क्रीन सह सादर करू शकते. तसेच इतर दोन मॉडेल मध्ये कंपनी ओएलईडी स्क्रीनचा वापर करू शकते. यातील एक मॉडेल 5.8—इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो तर दुसरा मॉडेल कंपनी 6.5—इंचाच्या स्क्रीन सह सादर करू शकते.

पण या फोन्स च्या इतर स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण आशा आहे की गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी पण कंपनी फेसआईडी सारखे फीचर्स देईल. काही तज्ज्ञांच्या मते कंपनी यावेळी 3डी टच काढून टाकू शकते. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी एक मॉडेल डुअल सिम सपोर्ट सह सादर करू शकते. अॅप्पल च्या कोड मध्ये डुअल सिम सपोर्ट दिसला होता.

The post 12 सप्टेंबरला लॉन्च होईल अॅप्पल आयफोन Xएस आणि सोबत दोन नवीन मॉडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-launch-date-in-marathi/feed/ 0