जाणून घ्या भारतात कसा चालेल आयफोन 10एस चा डुअल सिम फंक्शन आणि ईसिम म्हणजे काय

टेक दिग्गज अॅप्पल ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले नवीन आयफोन सादर केला आहे. अॅप्पल ने आयफोन 10आर, आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स लॉन्च केले आहेत. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स अॅप्पल ने आता पर्यंत लॉन्च केलेल्या सर्व आयफोन्स पेक्षा वेगळे आहेत. त्याचे कारण नवीन आयफोन मधील डुअल सिम सपोर्ट आहे. हो अगदी बरोबर वाचलंत तुम्ही, आता अॅप्पल यूजर्स पण आयफोन मध्ये एक साथ दोन सिम कार्ड वापरू शकतील. पण खास बाब ही की यातील एक फिजिकल सिम असेल तर दुसरा ईसिम असेल.

पण कंपनी ने माहिती दिली आहे की चीन मध्ये ईसिम कॉन्सेप्ट नाही त्यामुळे अॅप्पल आयफोन10 एस मॅक्स मध्ये डुअल सिम स्लॉट मिळेल परंतु भारता सहित दुसर्‍या देशांमध्ये ईसिम वाला मॉडेलच येईल. त्यामुळे तुम्हाला प्रश्ण पडू शकतो की ईसिम म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा. चला तर जाणून घेऊया अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये एक साथ दोन सिम खासकरून ईसिम कसा वापरला जाईल.

कसा चालतो ईसिम

आधी सांगितल्याप्रमाणे ईसिम फोनच्या हार्डवेयर मध्ये असतो आॅपरेटर प्रोफाईल डाउनलोड करे पर्यंत हा एक्टिवेट होत नाही. आता पर्यंत आयफोन ईसिम वॉच सोबत कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथ ने पेयर करण्यात येत होते पण आता ईसिम मुळे स्मार्टवॉच, फिटनेस बँड किंवा कोणताही वियरेबल डायरेक्ट फोन मोबाईल नेटवर्क शी कनेक्ट केला जाऊ शकतो. म्हणजे जो नंबर आयफोन मध्ये आहे तोच नंबर यूजर आपल्या अॅप्पल वॉच मध्ये पण ए​क्टिवेट करू शकतील.

ईसिम म्हणजे काय

ईसिम इम्बेडेड सिम चे छोटे नाव आहे. ईसिम साईज मध्ये नेहमीच्या सिम कार्ड पेक्षा 10 पट छोटा असतो. हा सिम इतर सिम कार्ड प्रमाणे फोन मध्ये टाकाल जात नाही तर ज्यावेळी फोन मॅन्युफॅक्चर केला जातो त्यावेळी हा सिम पण त्या फोन सोबत बनवला जातो. हा सिम फोन च्या हार्ड वेयर मध्ये सामील असतो आणि हा फोन च्या बाहेर काढता येत नाही. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये पण याच ​ईसिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा सिम फोन च्या हार्डवेयर मध्ये असतो पण तोपर्यंत एक्टिवेट होत नाही जोपर्यंत याचा प्रोफाईल फोन मध्ये आॅपरेटर नेटवर्क वरून डाउनलोड केला जात नाही.

फायदा काय

अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स पहिले असे आयफोन आहेत जे डुअल सिम फंक्शनालिटी सह सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही आयफोन मध्ये एक साथ दोन वेगवेगळे कंपन्यांचे नंबर वापरता येतील. आयफोन मधील दोन्ही सिम स्टँडबाय मोड वर असतील, म्हणजे एकाच वेळी दोन्ही सिम वर कॉल रिसीव होऊ शकतात आणि डॉयल पण केले जाऊ शकतात.

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये डुअल सिम वापरता येतील पण त्या दोघांपैकी एक सिम तुम्हाला तोच ठेवावा लागेल जो फोन ला आधी पासून सपोर्ट करतो. जगात एकूण 14 नेटवर्क आहेत जे अॅप्पल च्या नवीन आयफोन साठी आपला ईसिम उपलब्ध करतील. विशेष म्हणजे आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील ईसिम सीडीएमए असेल तर फोन मधील फिजीकल सिम स्लॉट मध्ये यूजर फक्त जीएसएम सिम टाकू शकतील. म्हणजे नवीन आयफोन एक साथ दोन सीडीएमस सिम ला सपोर्ट करणार नाही.

कसा वापरता येईल भारतात

अॅप्पल ने सांगितले आहे की भारतात फक्त दोन ​टेलीकॉम कंपन्याच आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मध्ये ईसिम सपोर्ट देतील. या दोन कंपन्यांमध्ये देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आणि देशातील सर्वात वेगाने वाढत असलेली कंपनी रिलायंस जियो आहे. आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स ला जियो आणि एयरटेल कडून बंडल आॅफर सह विकले जाऊ शकतात.

लक्षात असू द्या कि रिलायंस जियो आणि एयरटेल दोन्ही कंपन्या आधीपासून भारतात अॅप्पल वॉच सीरीज 3 विकत आहेत. एयरटेल आणि जियो द्वारा विकण्यात येणारी अॅप्पल वॉच सीरीज 3 यूजर्सना विना फोन कॉल करण्याची व रिसीव करण्याची सुविधा देते. त्याचप्रमाणे आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील ईसिम मधून वोडाफोन आणि एयरटेल नेटवर्क वर एक्स्ट्रा खर्चा विना व ब्लूटूथ कनेक्टिविटी वीना आयफोन वर आलेले कॉल अॅप्पल वॉच वरून पण रिसीव करता येतात.

वेगळा असेल चीन मधील मॉडेल

अॅप्पल ने आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स मधील डुअल सिम सपोर्ट चीन साठी वेगळा बनवला आहे. चीन सोबतच हांगकांग आणि मकाउ मधे ईसिम वाला फीचर नवीन आयफोन मध्ये दिसणार नाही. तिथे अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स चे असे मॉडेल लॉन्च केले जातील ज्यात दोन सिम स्लॉट असतील. म्हणजे यूजर आपल्या मर्जीने दोन सिम कार्ड टाकू शकतील

आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स च्या चीन, हांगकांग व मकाउ मध्ये लॉन्च होणार्‍या मॉडल्स मध्ये सिम ट्रे एकच असेल पण या ट्रे मध्ये दोन वेगवेगळे सिम एकावर एक ठेवता येतील. भारतात आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स 28 सप्टेंबर पासून भारतात विकत घेता येईल. नवीन आयफोन्स गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

अॅप्पल आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मक्स च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा )
आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स ची भारतीय किंमत (इथे क्लिक करून) बघू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here