डुअल सिम आणि 7एनएम चिपसेट सह लॉन्च झाले सुपर फास्ट अॅप्पल आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

अॅप्पल एक असा ब्रँड आहे ज्याने वर्षातून फक्त एकदा जरी आपले फोन लॉन्च केले तरी कपंनी वर्षभर चर्चेत असते. काल पण तसेच झाले प्रत्येकजण अॅप्पल बद्दल बोलत होता. अॅप्पल ची जगभरात चर्चा होत होती. कारण होते ​अमेरिकेतील कूपर्टिनों मधील स्टीव जॉब्स थियेटर मध्ये अॅप्पल आयफोन 10एस लॉन्च होत होता प्रत्येकजण फोन बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. अॅप्पल वॉच सीरीज 4 च्या लॉन्च ने इवेंट ची सुरवात झाली आणि त्यानंतर अॅप्पल आयफोन 10एस ची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कंपनी ने एक—एक करून या फोन चे फीचर्स सांगायला सुरवात केली. अॅप्पल ने आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स सादर केले आहेत. पण खास बाब म्हणजे पहिल्यांदाच कंपनी ने डुअल सिम वाले फोन सादर केले आहेत. आयफोन 10एस मॅक्स मध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे.

आयफोन 10एस (Apple iPhone XS)

नावा नुसार हा फोन अॅप्पल च्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने लॉन्च झालेल्या आयफोन 10 चा अपेडेटेड वर्जन आहे. हा फोन ग्लास बॉडी सह सादर करण्यात आला आहे जी सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टील फ्रेम सह याला शानदार लुक देते. या फोन मध्ये 2436 X 1125 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.8-इंचाचा सुपर रेटीना ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो नॉच सह उपलब्ध आहे. कंपनी ने 1 मिलियन टू 1 कॉन्ट्रास्ट रेशियो वाला एचडीआर डिस्प्ले वापरला आहे जो तुम्हाला चांगला व्यू देईल.

त्याचबरोबर 120 हट्र्ज टच सेंसिंग, 3डी टच आणि टॅप टू वेक सारख्या फीचर्स चा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे हा बेस्ट बनतो.

तुम्हाला तर माहितीच आहे अॅप्पल आपल्या डिवाइस मधील रॅम ची माहिती देत नाही. त्यामुळे आयफोन 10एस (iPhone XS) च्या रॅम ची पण माहिती कंपनी ने दिली नाही पण बातमी नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम आहे. तसेच नवीन आयफोन 64जीबी, 256जीबी आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या तीन वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

आयफोन एक्सएस अॅप्पल च्या सर्वात नवीन आणि पावरफुल ए12 बायनोइक चिपसेट वर चालतो. हा चिपसेट 7 नॅनोमीटरचा चिपसेट आहे जो 6 कोर सीपीयू आणि 4 कोर जीपीयू ची पावर एकत्रित करतो. अॅप्पल चा हा चिपसेट फास्ट आणि लॅग फ्री प्रोसेसिंग करू शकतो तसेच फोन मधील आईओएस 12 उत्तम यूजर इंटरफेस देतो.

अॅप्पल आयफोन 10एस च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. तुम्हाला तर माहितीच आहे की कंपनी टेलीफोटो लेंस वापरते. या फोन मध्ये पण असेच झाले आहे. पण खास बाब ही की कंपनी ने नवीन सेंसर मध्ये पिक्सल दिले आहेत. तसेच टेलीफोटो लेंस वाइड अपर्चर सह येईल. फोन चा कॅमेरा आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन ला सपोर्ट करतो आणि बोके इफेक्ट व मोशन वीडियो इत्यादिचा सपोर्ट पण मिळेल. त्याचबरोबर फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 7-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत एक आईआर कॅमेरा सेंसर पण आहे. फोन च्या नॉच मधील सेंसर 3डी फेस रेक्ग्नेशन सह फास्ट अनलॉकिंग करू शकतो.

आयफोन एक्सएस आईपी68 सर्टिफाइड आहे, ज्यामुळे हा पाणी आणि धूळी पासून वाचू शकतो. आयफोन 10एस मध्ये सिंगल सिम स्लॉट आहे पण काही देशांत ई-सिम च्या माध्यमातून डुअल सिम सपोर्ट करने मिळू शकतो. कंपनी चा दावा आहे की तुम्ही दोन सिम नंबर आणि डेटा प्लान चा वापर करू शकता. हा फोन वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो.

अॅप्पल आयफोन 10एस मॅक्स (Apple iPhone XS Max)

अॅप्पल आयफोन 10एस सोबत कंपनी ने आयफोन 10एस मॅक्स पण आणला आहे. नावावरून समजले असेलच की यात मोठी स्क्रीन मिळेल. आयफोन 10एक्सएस मॅक्स अॅप्पल ने लॉन्च केलेला सर्वात महाग स्मार्टफोन आहे आणि या फोन मध्ये 6.5-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. कंपनी ने यात पण सुपर रेटीना ओएलईडी डिस्प्ले (2688 X 1242 पिक्सल रेज्ल्यूशन) दिला आहे ज्यात कंपनी ने 1 मिलियन टू 1 कॉन्ट्रास्ट रेशियो वाल्या एचडीआर डिस्प्ले चा वापर केला आहे. कंपनी ने डॉल्बी एचडीआर10 चा वापर केला आहे जो शानदार अनुभव देऊ शकतो.

अॅप्पल आयफोन 10एस मॅक्स मध्ये पण 10एस प्रमाणे एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. कंपनी ने एक टेलीफोटो लेंस चा वापर केला आहे जी कमी प्रकाशात पण चांगले फोटो घेते. तसेच टेलीफोटो लेंस वाइड अपर्चर सह येते. या मॉडल मध्ये पण तुम्हाला आप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट मिळेल. तसेच बोके इफेक्ट आणि पोर्टेट व स्लो मोशन वीडियो इत्यादिचा सपोर्ट पण मिळेल. या फोन मध्ये पण 7-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

आयफोन 10एस मॅक्स च्या इतर स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे आणि तुम्ही एक साथ दोन फिजिकल सिम वापरू शकता. अॅप्पल ने हा फोन पण 4जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन पण कंपनी च्या ए12 चिपसेट वर चालतो तसेच यात आईओएस 12 अपडेटेड आहे. कंपनी चा दावा आहे की हा जुन्या मॉडल पेक्षा खुप वेगवान आहे आणि यात गेमिंग चा अनुभव पण शानदार मिळेल.

आयफोन 10एस चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट अॅप्पल ने 999 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 71,800 रुपये आहे. तसेच आयफोन 10एस मॅक्स चा 64जीबी मेमरी वेरिएंट 1099 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे जी भारतीय करंसी नुसार 79,000 रुपयांच्या आसपास आहे.

अॅप्पल चा आयफोन 10एस आणि आयफोन 10एस मॅक्स 28 सप्टेंबर पासून भारतात विकत घेता येईल. नवीन आयफोन्स गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here