Apps - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Jun 2023 03:54:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/ https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/#respond Sun, 25 Jun 2023 12:41:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20167 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण भारतात इंस्टाग्रामचे 32,12,00,000 अकाऊंट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 22.4 टक्के आहे. यावरून स्पष्ट समजतं की भारतीय इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवतात. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सर्वात जास्त रील बघण्यास पसंती देतात. परंतु तुम्हाला जर इंस्टा रील क्रिएटर बनायचं असेल तर आम्ही या […]

The post बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सुमारे 22 टक्के भारतीय इस्टाग्राम वापरतात.
  • इंस्टाग्राम युजर्स दरम्यान रील्स व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत.
  • आम्ही टॉप इंस्टाग्राम रील व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती घेऊन आलो आहोत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण भारतात इंस्टाग्रामचे 32,12,00,000 अकाऊंट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 22.4 टक्के आहे. यावरून स्पष्ट समजतं की भारतीय इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवतात. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सर्वात जास्त रील बघण्यास पसंती देतात. परंतु तुम्हाला जर इंस्टा रील क्रिएटर बनायचं असेल तर आम्ही या आर्टिकलमध्ये टॉप रील एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही देखील शानदार रील बनवू शकता.

का वापरावे रील एडिटिंग अ‍ॅप्स?

इंस्टाग्राम एक क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही थेट व्हिडीओ पोस्ट केला तर तो आकर्षक वाटेलच असं नाही. त्यामुळे व्हिडीओ बनवण्यासाठी केलेली मेहनत एडिटिंगविना वाया जाऊ शकते. रील्स क्रिएटिव्ह आणि जास्त आकर्षक बनवण्यासाठी तुम्हाला शानदार व्हिडीओ एडिटिंग करावी लागेल. तुम्ही जितका चांगला आणि मनोरंजक कंटेंट बनवाल तुम्हाला तेवढ्या लाइक आणि फॉलोअर्स मिळतील.

बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स

  • VN Video Editor
  • Canva
  • Inshot
  • KineMaster
  • Splice
  • Filmora

VN Video Editor

VN व्हिडीओ एडिटर इंस्टाग्राम युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. यात युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स फ्री मध्ये मिळतात. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही वॉटरमार्क देखील येत नाही. यात युजर्स मल्टी फ्रेम व्हिडीओ देखील सहज एडिट करू शकतात. या अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे:

  • व्हिडीओ इफेक्ट्स
  • फिल्टर
  • ट्रिम
  • स्पीड
  • स्लिप्ट
  • म्यूजिक लायब्रेरी

Canva

कॅनवा अ‍ॅप ऑनलाइन सर्वात लोकप्रिय व्हिडीओ आणि इमेज एडिटर अ‍ॅप आहे. जे युजर्स पहिल्यांदाच एडिटिंग करत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट अ‍ॅप्लिकेशन आहे. यात अनेक फ्री टेम्पलेट आहेत, ज्यांचा वापर तुम्ही क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी करू शकतात. याचे फीचर्स पाहता तुम्ही व्हिडीओ एडिट केल्यानंतर थेट सीधा पोस्ट करू शकतात. कॅनवाचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • फ्री टेम्प्लेट्स
  • फिल्टर्स
  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशन
  • GIF एलिमेंट्स

Inshot

Inshot अ‍ॅप व्हिडीओ एडिंगसाठी बेस्ट अ‍ॅप्स पैकी एक आहे. याच्या मदतीनं तुम्ही वर्टिकल आणि हॉरिजॉन्टल व्हिडीओ सहज एडिट करू शकतात. त्याचबरोबर सहज व्हिडीओ फॉर्मेट देखील बदलू शकता. या अ‍ॅपची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही फोनमध्ये स्टोर ऑडियो फाईल व्हिडीओमध्ये जोडू शकता. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • इफेक्ट
  • फिल्टर
  • ट्रांजिशन
  • स्पीड
  • अ‍ॅनिमेशन

KineMaster

रील एडिट करण्यासाठी काइनमास्टर अ‍ॅप देखील शानदार पर्याय आहे. यात देखील युजर्सना अनेक टेम्प्लेट आणि फीचर्स मिळतात, ज्यांच्या मदतीनं युजर्स शानदार रील बनवू शकतात. KineMaster अ‍ॅप ध्ये युजर्सना ऑडियो, व्हिडीओ आणि इमेजची मोठी लायब्रेरी मिळते. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत :

  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशंस
  • इंपोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन
  • मोशन ट्रॅकिंग
  • टेक्स्ट एडिटिंग

Splice

Splice अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिट करण्यासाठी युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर मिळतात. या अ‍ॅप ध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्पीच टू टेक्स्ट फीचरचा सपोर्ट दिला आहे, जेणेकरून युजर्स व्हिडीओमध्ये टेक्स्टचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर एडिटरमध्ये व्हिडीओ कट करणे, ट्रिम करणे आणि क्रॉप करण्यासारखे फीचर्स देखील मिळतात :

  • यूनीक ट्रांजिशन
  • अ‍ॅनिमेशन
  • स्लिप्ट
  • टेक्स्ट एडिटर
  • म्यूजिक अँड ऑडियो

Filmora

ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्स ध्ये फिल्मोरा खूप पॉपुलर आहे. यात युजर्सना अनेक प्रोफेशनल फीचर्स मिळतात, ज्यामुळे तुम्ही शानदार रील एडिट करू शकता. या अ‍ॅप मध्ये युजर्सना अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिटिंग दरम्यान व्हॉइस ओव्हर करण्याचा ऑप्शनही मिळतो. याचे टॉप फीचर्स पुढे पाहू शकता :

  • स्टिकर
  • अ‍ॅनिमेशन
  • टेक्स्ट
  • ऑडियो इक्वलाइजर
  • पिक्चर-इन-पिक्चर इफेक्ट

The post बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/feed/ 0
इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/ https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/#respond Sat, 17 Jun 2023 03:56:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21086 इंटरनेटवर इंफॉरमेशन म्हणजे माहितीचा खजिना आहे. ह्यातील जवळपास सर्वच माहिती भाषेत उपलब्ध आहे. ही माहिती जर तुम्हाला मराठीतून वाचायची असेल तर तुम्हाला ती भाषांतरित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रान्सलेटरकडे जाण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीनं प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. आता तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये कंटेंट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता. सध्या अनेक […]

The post इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आणि वेबसाइट आहेत
  • गुगल ट्रान्सलेट इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवाद करू शकतो
  • मायक्रोसॉफ्टच्या ट्रान्सलेटरमध्ये देखील भारतीय भाषांचा सपोर्ट मिळतो

इंटरनेटवर इंफॉरमेशन म्हणजे माहितीचा खजिना आहे. ह्यातील जवळपास सर्वच माहिती भाषेत उपलब्ध आहे. ही माहिती जर तुम्हाला मराठीतून वाचायची असेल तर तुम्हाला ती भाषांतरित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ट्रान्सलेटरकडे जाण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीनं प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधले आहेत. आता तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये कंटेंट तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता.

सध्या अनेक सारे अ‍ॅप्स आणि वेबसाइट आहेत ज्या इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करतात. कंप्यूटर प्रोग्रामच्या माध्यमातून होणारं ट्रान्सलेशन इतकं अचूक नसतं परंतु तुम्हाला कंटेंट समजण्यालायक ट्रान्सलेशन मिळू शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्स आणि वेबसाइटची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषेत कंटेंट ट्रान्सलेट करू शकता.

इंग्रजीतून मराठी अनुवाद ट्रान्सलेट करणार अ‍ॅप्स

  • Google Translate
  • Microsoft Translator
  • Hi Translate
  • Marathi-English Translator
  • Translate All
  • English to Marathi Translator
  • English Marathi Dictionary

गुगल ट्रान्सलेट

आमच्या यादीत ट्रान्सलेशनसाठी सर्वात पहिला ऑप्शन गुगल ट्रान्सलेटचा आहे. हा ऑनलाइन ट्रांसलेशनसाठी सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्या मदतीनं तुम्ही 130 भाषांमध्ये अनुवाद करू शकता. मराठीसह इतर भारतीय भाषा जसे की तामिळ, तेलुगू, हिंदी, बंगाली सारख्या भाषेत देखील ट्रान्सलेट करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. तसेच वेबसाइट स्वरूपात देखील गुगल ट्रान्सलेट उपलब्ध आहे.

मराठी-इंग्लिश ट्रान्सलेटर

इंग्रजीतून मराठीत अनुवाद करायचा असो किंवा मराठीतून इंग्रजीत Marathi-English Translator अ‍ॅप देखील एक चांगला ऑप्शन आहे. मराठी आणि इंग्रजीसह ह्याच्या मदतीनं इतर भाषांमध्ये देखील ट्रान्सलेट करता येतं.

ट्रान्सलेट ऑल अ‍ॅप

Translate All अ‍ॅपच्या मदतीनं देखील युजर्स अनेक भाषा मराठी किंवा इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. ह्या अ‍ॅपची गंमत म्हणजे ह्याच्या मदतीनं फोटोमधील टेक्स्ट देखील ट्रान्सलेट करता येतो. हे अ‍ॅप मराठी सह दुसऱ्या भारतीय भाषांना देखील सपोर्ट करतं.

मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर

Microsoft Translator देखील इतर भाषांमधून मराठी ट्रान्सलेशनसाठी चांगला ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेट अ‍ॅप अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोर आणि iOS युजर्स अ‍ॅप्स स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅपमधून इतर भाषा देखील ट्रान्सलेट करता येतात.

इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर अ‍ॅप

English to Marathi Translator अ‍ॅपच्या मदतीनं इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीत सहज अनुवाद करता येतो. हे अ‍ॅप ऑफलाइन देखील वापरता येतं. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येईल.

इंग्लिश मराठी डिक्शनरी

इंग्रजीतून मराठीच्या शब्दांचा अर्थ असो किंवा अनुवाद English Marathi Dictionary अ‍ॅप एक चांगला ऑप्शन आहे. हे अ‍ॅप देखील ऑफलाइन वापरता येतं. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं युजर्स इंग्रजी भाषा शिकू देखील शकतात. ह्यासाठी गेम आणि टास्क देण्यात आले आहेत.

हाय ट्रान्सलेट

इंग्रजीतून मराठी किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी Hi Translate अ‍ॅप देखील चांगला ऑप्शन आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर वापरता येतं. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं युजर्स 100 पेक्षा जास्त भाषा ट्रान्सलेट करू शकतात.

The post इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/english-to-marathi-translator-apps/feed/ 0
हे आहेत टॉप 5 Photo Editor अ‍ॅप्स; जाणून घ्या फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/photo-banavanare-apps/ https://www.91mobiles.com/marathi/photo-banavanare-apps/#respond Mon, 12 Jun 2023 03:45:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21512 स्मार्टफोन आल्यामुळे फोटोज काढणे आणि शेयर करणं सोपं झालं आहे. जर तुम्ही देकील इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी फोटोज शेयर करत असाल तर एक फोटो एडिटर अ‍ॅप (photo editor app) तुमच्या फोटोजमध्ये जीव ओतू शकतो. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर अनेक फोटो एडिटर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. परंतु ह्या आर्टिकलमध्ये […]

The post हे आहेत टॉप 5 Photo Editor अ‍ॅप्स; जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन आल्यामुळे फोटोज काढणे आणि शेयर करणं सोपं झालं आहे. जर तुम्ही देकील इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी फोटोज शेयर करत असाल तर एक फोटो एडिटर अ‍ॅप (photo editor app) तुमच्या फोटोजमध्ये जीव ओतू शकतो. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर अनेक फोटो एडिटर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. परंतु ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला त्या अ‍ॅप्सची माहिती देत आहोत, ज्यात बेसिक एडिटिंग टूल्सपासून फोटो फिल्टर्स, फोटो ऑब्जेक्ट रिमूव्हर, इमेज डेब्लर, इफेक्ट्स, फोटो कोलाज इत्यादी अ‍ॅडव्हान्स टूल देखील आहेत.

बेस्ट फोटो एडिटिंग अ‍ॅप्स

Picsart AI Photo Editor

तुमच्या फोटोला मनासारखा रंग द्यायचा असेल तर Picsart AI Photo Editor अ‍ॅप तुम्हाला आवडू शकतो. जो गुगल प्ले स्टोरवरून एक बिलियनपेक्षा जास्त डाउनलोड केला गेला आहे. जाणून घेऊया फोटो एडिटिंगसाठी काय खास आहे ह्यात:

  • ह्यात फोटोसह ट्रेडिंग फोटो इफेक्ट आणि फिल्टर वापरता येतात. तसेच बॅकग्राउंड हटवणं, बदलणं किंवा पूर्णपणे हटवण्यासाठी बॅकग्राउंड इरेजरचा वापर करता येईल.
  • फोटोमध्ये न आवडलेली गोष्ट काढून टाकण्यासाठी रिमूव्ह ऑब्जेट टूलचा वापर करता येईल.
  • फोटोवर टेक्स्ट लिहिण्यासाठी 200+ डिजाइनर फॉन्ट मिळतात.
  • सेल्फी एडिट करण्यासाठी मेकअप स्टिकर इत्यादी वापरता येतील.
  • इथे एआय टूलचा वापर करून बॅकग्राउंट ब्लर करता येतो.
  • फोटो वेगानं क्रॉप करता येतो आणि त्यात स्टिकर जोडून किंवा स्वतःहून स्टिकर बनवू शकता.

डाउनलोड : iOS, Android

Snapseed

गुगलचा हे शानदार फोटो एडिटिंग अ‍ॅप आहे, परंतु हे सामान्य युजरसाठी नाही तर प्रोफेशनल युजर्ससाठी जास्त उपयुक्त आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 100 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. पुढे तुम्ही ह्या फोटो एडिटिंग अ‍ॅपचे फीचर्स पाहू शकता:

  • स्नॅपसीडमध्ये 29 पेक्षा जास्त व्यावसायीक-क्वॉलिटीचे एडिटिंग टूल्स मिळतात.
  • इथे तुम्ही वन-टॅप एडिटिंगसाठी प्रीसेट आणि फिल्टरचा वापर करू शकता.
  • तसेच तुम्हाला प्रोफेशनल-क्वॉलिटी एडिटिंग टूल्स, कलर अ‍ॅडजस्ट करणारे टूल्स देखील मिळतात.
  • ह्याचा मोबाइल एडिटिंग इंटरफेस खूप सोपा आहे,जो फोटोग्राफर आणि कंटेंट क्रिएटरसाठी चांगला पर्याय बनतो.
  • सिंपल फोटो एडिटिंगसाठी ह्यात तुम्हाला कर्व्स, इमेज ट्यूनिंग, ब्रश, लाइटिंग आणि कलर स्केल सारखे टूल्स मिळतात.
  • जर फोटो एडिटिंगचा थोडा अनुभव असेल तर लेयर एडिट्स इत्यादी ऑप्शन्स देखील मिळतात.
  • स्नॅपसीडच्या पोर्ट्रेट मोडचा वापर स्मूद स्किन, डोळ्यांत चमक आणणे आणि प्रो-क्‍वालिटी इमेज बनवण्यासाठी करता येईल. तुम्ही Snapseed च्या लेन्स ब्लर टूलसह बोकेह सारख्या अ‍ॅडव्हान्स एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता.
  • Snapseed अनेक फिल्टर सह येतं, ज्यांचा तुम्ही एडिटिंग टूल म्हणून वापर करू शकता. हे फ्री अ‍ॅप आहे.

डाउनलोड : iOS, Android

Photoshop Camera Photo Filters

फोटो एडिटिंग बद्दल बोलायचं झालं तर ही यादी अडोबीविना पूर्ण होणार नाही. फोटो एडिंगसाठी हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून एक मिलियनपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. पुढे फीचर्स वाचू शकता:

  • फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅपमध्ये फक्त एक टॅपच्या माध्यमातून कॅमेरा फिल्टर आणि इफेक्ट लागू करता येतात. ह्यात तुम्हाला डझनभर कस्टम फिल्टरची सुविधा मिळते.
  • अ‍ॅप मध्ये पोर्ट्रेट, ब्लूम, पॉप आर्ट, स्पेक्ट्रम, डेसिंक, फूड, सीनरी, नॅचरल स्काइज, एनालॉग, नाइट शिफ्ट, ड्रीमकॅचर, सुपरसाइज, डबल एक्सपो, प्रिज्म, मिक्स्ड मीडिया, ब्लू स्काइज, आर्टफुल इत्यादी फिल्टर मिळतात.
  • स्टूडियो लाइट, कॉमिक स्काइज, इंटरस्टेलर, सेलेस्टियल, कॉसमॉस, ग्रिट, डॅपल्ड, व्हायब्रण्ट, नियॉन पल्स आणि कलर इको सारख्या लोकप्रिय लेन्स देखील मिळतील, ज्यांच्या मदतीनं शानदार फोटो इफेक्ट टाकता येतात.
  • फोटोशॉप आणि एआय-पावर्ड पिक्चर एडिटिंग टूलच्या मदतीनं फोटो सुधारता येतात ह्यात तुम्हाला ऑटो-टोन फोटो इफेक्ट देखील मिळतो.
  • फोटोशॉप कॅमेऱ्यात फेस लाइट फीचर लाइटिंगसाठी ऑप्टिमाइज करतो आणि सही पोर्ट्रेट इमेज तयार करतो. ह्यात तुम्हाला 100 पेक्षा जास्त लेन्स इफेक्ट्स मिळतात.

डाउनलोड : iOS, Android

Pixlr – Photo Editor

Pixlr लोकप्रिय फोटो एडिटिंग टूल आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 50 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. हे फ्री आणि पेड दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याची खासियत जाणून घेऊया:

  • Pixlr च्या फ्री व्हर्जनमध्ये बेसिक एडिटिंग टूल्स मिळतात, ज्यात फिल्टर आणि ओव्हरलेचा समावेश आहे.
  • हे कोलाज टेम्प्लेटसह येतं, ज्यामुळे सहज कोलाज तयार करता येतात.
  • ह्याचा युजर इंटरफेस त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांनी एडिटिंग सॉफ्टवेयर जास्त वापरले नाहीत.
  • Pixlr युजर्सना विविधता देतं. तुम्ही तुमचे फोटोज ब्लॅक-अँड-व्हाइट, फिल्म किंवा सेपिया टोनमध्ये बदलण्यासाठी ब्रशसह प्रीसेट इफेक्ट, ओव्हरले आणि स्टाइल फिल्टर वापरू शकता.
  • अ‍ॅपच्या फ्री व्हर्जनमध्ये जाहिराती दिसतात तर प्रीमियम व्हर्जन ($1.99/दरमहा) मध्ये अनेक एडिटिंग टूल मिळतील.

डाउनलोड : iOS, Android

Lightroom Photo & Video Editor

अडोबी फोटोशॉप लाइटरूम देखील पावरफुल फोटो आणि व्हिडीओ एडिटर अ‍ॅप आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 100 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. ह्यात इमेज एडिटर आणि फोटो फिल्टरचा वापर करता येतो. जाणून घ्या फिचर:

  • अडोबीच्या ह्या अ‍ॅपमध्ये वेगानं फोटो एडिटिंगसाठी फ्री प्रीसेट आणि फोटो फिल्टर मिळतात.
  • ह्यात प्रोफेशनल फोटोग्राफरनं तयार केलेले 200+ पेक्षा जास्त प्रीमियम प्रीसेट आहेत.
  • ह्यात फोटोज चांगले बनवण्यासाठी अडॅपटिव्ह एआयचा वापर करता येईल.
  • ऑटो पिक्चर एडिटरवर टॅप करून फोटो चांगला बनवता येईल. ह्यात कंट्रास्ट, एक्सपोजर, हाइलाइट्स , कलर मिक्सर, कलर ग्रेडिंग टूल इत्यादींचा वापर करता येईल.
  • फोटोज चांगले बनवण्यासाठी फोटो एन्हान्सर टूलचा वापर करता येईल. इथे तुम्हाला क्रॉप आणि रोटेट करण्याचा पर्याय देखील मिळतो.
  • कर्व्स फोटो एडिटरचा वापर अ‍ॅडव्हान्स एडिटिंग जसे की हाइलाइट्स, मिडटोन्स, शॅडो आणि कलर इत्यादीसाठी करता येईल.
  • अ‍ॅप मध्ये एक्सपोजर, टाइमर, फोटो फिल्टरसह चांगल्या शॉट्ससाठी अ‍ॅडव्हान्स कॅप्चर मोड वापरता येईल.

डाउनलोड : iOS, Android

The post हे आहेत टॉप 5 Photo Editor अ‍ॅप्स; जाणून घ्या फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/photo-banavanare-apps/feed/ 0