हे आहेत टॉप 5 Photo Editor अ‍ॅप्स; जाणून घ्या फीचर्स

स्मार्टफोन आल्यामुळे फोटोज काढणे आणि शेयर करणं सोपं झालं आहे. जर तुम्ही देकील इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी फोटोज शेयर करत असाल तर एक फोटो एडिटर अ‍ॅप (photo editor app) तुमच्या फोटोजमध्ये जीव ओतू शकतो. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवर अनेक फोटो एडिटर अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. परंतु ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला त्या अ‍ॅप्सची माहिती देत आहोत, ज्यात बेसिक एडिटिंग टूल्सपासून फोटो फिल्टर्स, फोटो ऑब्जेक्ट रिमूव्हर, इमेज डेब्लर, इफेक्ट्स, फोटो कोलाज इत्यादी अ‍ॅडव्हान्स टूल देखील आहेत.

बेस्ट फोटो एडिटिंग अ‍ॅप्स

Picsart AI Photo Editor

तुमच्या फोटोला मनासारखा रंग द्यायचा असेल तर Picsart AI Photo Editor अ‍ॅप तुम्हाला आवडू शकतो. जो गुगल प्ले स्टोरवरून एक बिलियनपेक्षा जास्त डाउनलोड केला गेला आहे. जाणून घेऊया फोटो एडिटिंगसाठी काय खास आहे ह्यात:

  • ह्यात फोटोसह ट्रेडिंग फोटो इफेक्ट आणि फिल्टर वापरता येतात. तसेच बॅकग्राउंड हटवणं, बदलणं किंवा पूर्णपणे हटवण्यासाठी बॅकग्राउंड इरेजरचा वापर करता येईल.
  • फोटोमध्ये न आवडलेली गोष्ट काढून टाकण्यासाठी रिमूव्ह ऑब्जेट टूलचा वापर करता येईल.
  • फोटोवर टेक्स्ट लिहिण्यासाठी 200+ डिजाइनर फॉन्ट मिळतात.
  • सेल्फी एडिट करण्यासाठी मेकअप स्टिकर इत्यादी वापरता येतील.
  • इथे एआय टूलचा वापर करून बॅकग्राउंट ब्लर करता येतो.
  • फोटो वेगानं क्रॉप करता येतो आणि त्यात स्टिकर जोडून किंवा स्वतःहून स्टिकर बनवू शकता.

डाउनलोड : iOS, Android

Snapseed

गुगलचा हे शानदार फोटो एडिटिंग अ‍ॅप आहे, परंतु हे सामान्य युजरसाठी नाही तर प्रोफेशनल युजर्ससाठी जास्त उपयुक्त आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 100 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. पुढे तुम्ही ह्या फोटो एडिटिंग अ‍ॅपचे फीचर्स पाहू शकता:

  • स्नॅपसीडमध्ये 29 पेक्षा जास्त व्यावसायीक-क्वॉलिटीचे एडिटिंग टूल्स मिळतात.
  • इथे तुम्ही वन-टॅप एडिटिंगसाठी प्रीसेट आणि फिल्टरचा वापर करू शकता.
  • तसेच तुम्हाला प्रोफेशनल-क्वॉलिटी एडिटिंग टूल्स, कलर अ‍ॅडजस्ट करणारे टूल्स देखील मिळतात.
  • ह्याचा मोबाइल एडिटिंग इंटरफेस खूप सोपा आहे,जो फोटोग्राफर आणि कंटेंट क्रिएटरसाठी चांगला पर्याय बनतो.
  • सिंपल फोटो एडिटिंगसाठी ह्यात तुम्हाला कर्व्स, इमेज ट्यूनिंग, ब्रश, लाइटिंग आणि कलर स्केल सारखे टूल्स मिळतात.
  • जर फोटो एडिटिंगचा थोडा अनुभव असेल तर लेयर एडिट्स इत्यादी ऑप्शन्स देखील मिळतात.
  • स्नॅपसीडच्या पोर्ट्रेट मोडचा वापर स्मूद स्किन, डोळ्यांत चमक आणणे आणि प्रो-क्‍वालिटी इमेज बनवण्यासाठी करता येईल. तुम्ही Snapseed च्या लेन्स ब्लर टूलसह बोकेह सारख्या अ‍ॅडव्हान्स एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता.
  • Snapseed अनेक फिल्टर सह येतं, ज्यांचा तुम्ही एडिटिंग टूल म्हणून वापर करू शकता. हे फ्री अ‍ॅप आहे.

डाउनलोड : iOS, Android

Photoshop Camera Photo Filters

फोटो एडिटिंग बद्दल बोलायचं झालं तर ही यादी अडोबीविना पूर्ण होणार नाही. फोटो एडिंगसाठी हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून एक मिलियनपेक्षा जास्तवेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. पुढे फीचर्स वाचू शकता:

  • फोटो एडिटिंगसाठी अ‍ॅपमध्ये फक्त एक टॅपच्या माध्यमातून कॅमेरा फिल्टर आणि इफेक्ट लागू करता येतात. ह्यात तुम्हाला डझनभर कस्टम फिल्टरची सुविधा मिळते.
  • अ‍ॅप मध्ये पोर्ट्रेट, ब्लूम, पॉप आर्ट, स्पेक्ट्रम, डेसिंक, फूड, सीनरी, नॅचरल स्काइज, एनालॉग, नाइट शिफ्ट, ड्रीमकॅचर, सुपरसाइज, डबल एक्सपो, प्रिज्म, मिक्स्ड मीडिया, ब्लू स्काइज, आर्टफुल इत्यादी फिल्टर मिळतात.
  • स्टूडियो लाइट, कॉमिक स्काइज, इंटरस्टेलर, सेलेस्टियल, कॉसमॉस, ग्रिट, डॅपल्ड, व्हायब्रण्ट, नियॉन पल्स आणि कलर इको सारख्या लोकप्रिय लेन्स देखील मिळतील, ज्यांच्या मदतीनं शानदार फोटो इफेक्ट टाकता येतात.
  • फोटोशॉप आणि एआय-पावर्ड पिक्चर एडिटिंग टूलच्या मदतीनं फोटो सुधारता येतात ह्यात तुम्हाला ऑटो-टोन फोटो इफेक्ट देखील मिळतो.
  • फोटोशॉप कॅमेऱ्यात फेस लाइट फीचर लाइटिंगसाठी ऑप्टिमाइज करतो आणि सही पोर्ट्रेट इमेज तयार करतो. ह्यात तुम्हाला 100 पेक्षा जास्त लेन्स इफेक्ट्स मिळतात.

डाउनलोड : iOS, Android

Pixlr – Photo Editor

Pixlr लोकप्रिय फोटो एडिटिंग टूल आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 50 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. हे फ्री आणि पेड दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ह्याची खासियत जाणून घेऊया:

  • Pixlr च्या फ्री व्हर्जनमध्ये बेसिक एडिटिंग टूल्स मिळतात, ज्यात फिल्टर आणि ओव्हरलेचा समावेश आहे.
  • हे कोलाज टेम्प्लेटसह येतं, ज्यामुळे सहज कोलाज तयार करता येतात.
  • ह्याचा युजर इंटरफेस त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांनी एडिटिंग सॉफ्टवेयर जास्त वापरले नाहीत.
  • Pixlr युजर्सना विविधता देतं. तुम्ही तुमचे फोटोज ब्लॅक-अँड-व्हाइट, फिल्म किंवा सेपिया टोनमध्ये बदलण्यासाठी ब्रशसह प्रीसेट इफेक्ट, ओव्हरले आणि स्टाइल फिल्टर वापरू शकता.
  • अ‍ॅपच्या फ्री व्हर्जनमध्ये जाहिराती दिसतात तर प्रीमियम व्हर्जन ($1.99/दरमहा) मध्ये अनेक एडिटिंग टूल मिळतील.

डाउनलोड : iOS, Android

Lightroom Photo & Video Editor

अडोबी फोटोशॉप लाइटरूम देखील पावरफुल फोटो आणि व्हिडीओ एडिटर अ‍ॅप आहे. हे गुगल प्ले स्टोरवरून 100 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. ह्यात इमेज एडिटर आणि फोटो फिल्टरचा वापर करता येतो. जाणून घ्या फिचर:

  • अडोबीच्या ह्या अ‍ॅपमध्ये वेगानं फोटो एडिटिंगसाठी फ्री प्रीसेट आणि फोटो फिल्टर मिळतात.
  • ह्यात प्रोफेशनल फोटोग्राफरनं तयार केलेले 200+ पेक्षा जास्त प्रीमियम प्रीसेट आहेत.
  • ह्यात फोटोज चांगले बनवण्यासाठी अडॅपटिव्ह एआयचा वापर करता येईल.
  • ऑटो पिक्चर एडिटरवर टॅप करून फोटो चांगला बनवता येईल. ह्यात कंट्रास्ट, एक्सपोजर, हाइलाइट्स , कलर मिक्सर, कलर ग्रेडिंग टूल इत्यादींचा वापर करता येईल.
  • फोटोज चांगले बनवण्यासाठी फोटो एन्हान्सर टूलचा वापर करता येईल. इथे तुम्हाला क्रॉप आणि रोटेट करण्याचा पर्याय देखील मिळतो.
  • कर्व्स फोटो एडिटरचा वापर अ‍ॅडव्हान्स एडिटिंग जसे की हाइलाइट्स, मिडटोन्स, शॅडो आणि कलर इत्यादीसाठी करता येईल.
  • अ‍ॅप मध्ये एक्सपोजर, टाइमर, फोटो फिल्टरसह चांगल्या शॉट्ससाठी अ‍ॅडव्हान्स कॅप्चर मोड वापरता येईल.

डाउनलोड : iOS, Android

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here