बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव

Highlights

  • सुमारे 22 टक्के भारतीय इस्टाग्राम वापरतात.
  • इंस्टाग्राम युजर्स दरम्यान रील्स व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत.
  • आम्ही टॉप इंस्टाग्राम रील व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती घेऊन आलो आहोत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण भारतात इंस्टाग्रामचे 32,12,00,000 अकाऊंट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 22.4 टक्के आहे. यावरून स्पष्ट समजतं की भारतीय इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवतात. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सर्वात जास्त रील बघण्यास पसंती देतात. परंतु तुम्हाला जर इंस्टा रील क्रिएटर बनायचं असेल तर आम्ही या आर्टिकलमध्ये टॉप रील एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही देखील शानदार रील बनवू शकता.

का वापरावे रील एडिटिंग अ‍ॅप्स?

इंस्टाग्राम एक क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही थेट व्हिडीओ पोस्ट केला तर तो आकर्षक वाटेलच असं नाही. त्यामुळे व्हिडीओ बनवण्यासाठी केलेली मेहनत एडिटिंगविना वाया जाऊ शकते. रील्स क्रिएटिव्ह आणि जास्त आकर्षक बनवण्यासाठी तुम्हाला शानदार व्हिडीओ एडिटिंग करावी लागेल. तुम्ही जितका चांगला आणि मनोरंजक कंटेंट बनवाल तुम्हाला तेवढ्या लाइक आणि फॉलोअर्स मिळतील.

बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स

  • VN Video Editor
  • Canva
  • Inshot
  • KineMaster
  • Splice
  • Filmora

VN Video Editor

VN व्हिडीओ एडिटर इंस्टाग्राम युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. यात युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स फ्री मध्ये मिळतात. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही वॉटरमार्क देखील येत नाही. यात युजर्स मल्टी फ्रेम व्हिडीओ देखील सहज एडिट करू शकतात. या अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे:

  • व्हिडीओ इफेक्ट्स
  • फिल्टर
  • ट्रिम
  • स्पीड
  • स्लिप्ट
  • म्यूजिक लायब्रेरी

Canva

कॅनवा अ‍ॅप ऑनलाइन सर्वात लोकप्रिय व्हिडीओ आणि इमेज एडिटर अ‍ॅप आहे. जे युजर्स पहिल्यांदाच एडिटिंग करत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट अ‍ॅप्लिकेशन आहे. यात अनेक फ्री टेम्पलेट आहेत, ज्यांचा वापर तुम्ही क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी करू शकतात. याचे फीचर्स पाहता तुम्ही व्हिडीओ एडिट केल्यानंतर थेट सीधा पोस्ट करू शकतात. कॅनवाचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • फ्री टेम्प्लेट्स
  • फिल्टर्स
  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशन
  • GIF एलिमेंट्स

Inshot

Inshot अ‍ॅप व्हिडीओ एडिंगसाठी बेस्ट अ‍ॅप्स पैकी एक आहे. याच्या मदतीनं तुम्ही वर्टिकल आणि हॉरिजॉन्टल व्हिडीओ सहज एडिट करू शकतात. त्याचबरोबर सहज व्हिडीओ फॉर्मेट देखील बदलू शकता. या अ‍ॅपची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही फोनमध्ये स्टोर ऑडियो फाईल व्हिडीओमध्ये जोडू शकता. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • इफेक्ट
  • फिल्टर
  • ट्रांजिशन
  • स्पीड
  • अ‍ॅनिमेशन

KineMaster

रील एडिट करण्यासाठी काइनमास्टर अ‍ॅप देखील शानदार पर्याय आहे. यात देखील युजर्सना अनेक टेम्प्लेट आणि फीचर्स मिळतात, ज्यांच्या मदतीनं युजर्स शानदार रील बनवू शकतात. KineMaster अ‍ॅप ध्ये युजर्सना ऑडियो, व्हिडीओ आणि इमेजची मोठी लायब्रेरी मिळते. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत :

  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशंस
  • इंपोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन
  • मोशन ट्रॅकिंग
  • टेक्स्ट एडिटिंग

Splice

Splice अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिट करण्यासाठी युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर मिळतात. या अ‍ॅप ध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्पीच टू टेक्स्ट फीचरचा सपोर्ट दिला आहे, जेणेकरून युजर्स व्हिडीओमध्ये टेक्स्टचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर एडिटरमध्ये व्हिडीओ कट करणे, ट्रिम करणे आणि क्रॉप करण्यासारखे फीचर्स देखील मिळतात :

  • यूनीक ट्रांजिशन
  • अ‍ॅनिमेशन
  • स्लिप्ट
  • टेक्स्ट एडिटर
  • म्यूजिक अँड ऑडियो

Filmora

ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्स ध्ये फिल्मोरा खूप पॉपुलर आहे. यात युजर्सना अनेक प्रोफेशनल फीचर्स मिळतात, ज्यामुळे तुम्ही शानदार रील एडिट करू शकता. या अ‍ॅप मध्ये युजर्सना अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिटिंग दरम्यान व्हॉइस ओव्हर करण्याचा ऑप्शनही मिळतो. याचे टॉप फीचर्स पुढे पाहू शकता :

  • स्टिकर
  • अ‍ॅनिमेशन
  • टेक्स्ट
  • ऑडियो इक्वलाइजर
  • पिक्चर-इन-पिक्चर इफेक्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here