ASUS ROG Phone 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Apr 2023 13:32:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/#respond Thu, 13 Apr 2023 13:17:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20264 ASUS नं आपल्या गेमिंग फोनच्या लाइनअपमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त अल्टिमेट मॉडेलमध्ये जास्त रॅम, जास्त स्टोरेज, कुलिंगसाठी AeroActive Portal आणि फोनच्या मागे इनकमिंग कॉस इत्यादी माहिती दाखवण्यासाठी PMOLED डिस्प्ले मिळतो. ROG म्हणजे Republic of Gamers हा एक […]

The post ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ASUS ROG Phone 7 अ‍ॅडव्हान्स गेमिंग फोन भारतात लाँच झाला आहे.
  • या गेमिंग फोनमध्ये AirTrigger system मिळते.
  • असूस आरओजी फोन 7 चे दोन मॉडेल भारतात लाँच झाले आहेत.

ASUS नं आपल्या गेमिंग फोनच्या लाइनअपमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त अल्टिमेट मॉडेलमध्ये जास्त रॅम, जास्त स्टोरेज, कुलिंगसाठी AeroActive Portal आणि फोनच्या मागे इनकमिंग कॉस इत्यादी माहिती दाखवण्यासाठी PMOLED डिस्प्ले मिळतो. ROG म्हणजे Republic of Gamers हा एक गेमिंग ब्रँड आहे जो गेमिंग लॅपटॉपसह गेमिंग मोबाइल देखील लाँच करतो. त्यामुळे यात गेमिंगसाठी आवश्यक फीचर्ससह शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स दिले जातात. नवीन आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेटमध्ये देखील असेच स्पेक्स आहेत ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट मधील गेमिंग फिचर

  • GameCool 7 cooling system
  • AeroActive Cooler 7
  • GameFX Audio
  • AirTrigger system

या फोनमध्ये नवीन ROG Rapid-Cycle Vapor Chamber डिजाईनचा वापर करण्यात आला जी लिक्विड रिर्टन चॅनेल्सच्या माध्यमातून व्हेपर चेंबर कूलिंगच्या तुलनेत 2.1 गुणा जास्त हिट कमी करते. तसेच यातील एअर ट्रिगर अतिरिक्त गेमिंग बटन्स म्हणून कामी येतात.

असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

  • 6.78” AMOLED
  • 165Hz Refesh Rate
  • in-display fingerprint sensor

ROG Phone 7 5G फोन 20.4:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 2448 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 165हर्ट्ज रिफ्रेश रेट व 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

ही स्क्रीन 1000निट्स ब्राइटनेस आणि 1,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला देखील सपोर्ट करते, त्याचबरोबर आय केयर टेक्नॉलॉजी देखील मिळते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. घामाने माखलेल्या हातांपासून वाचाण्यासाठी विशेष कोटिंग करण्यात आली आहे.

प्रोसेसर

  • Android 13
  • Qualcomm Adreno 740
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2

ASUS ROG Phone 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू देण्यात आला आहे. हा आरओजी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात झेन युआय आणि आरओजी युआय दोन्ही मिळतात. असूसचा हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट तसेच 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS4.0 Storage मिळते.

कॅमेरा

  • 50MP Rear Camera
  • 32MP Front Camera

फोटोग्राफीसाठी असूस आरओजी फोन 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स766 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ASUS ROG Phone 7 32 मेगापिक्सलच्या सेन्सरसह येतो जी एक ओमनी व्हिजन ओवी32 क्वॉड लेन्स आहे.

बॅटरी

  • 6,000mAh Battery
  • 65W Fast Charging

पावर बॅकअपसाठी या असूस फोनमध्ये ड्युअल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यात 3,000एमएएचचे दोन बॅटरी सेल आहेत जे एकत्र 6,000एमएएचची पावर देतात. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी आरओजी फोन 7 मध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फोन बॉक्समध्ये कंपनी 30वॉट पवार अडॅप्टर देईल.

आसूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट ची किंमत

  • ASUS ROG Phone 7 (12GB RAM, 256GB) = 74,999 रुपये
  • ASUS ROG Phone 7 Ultimate (16GB RAM, 512GB) = 99,999 रुपये

ASUS ROG Phone 7 मध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असून याची किंमत 74,999 रुपये आहे. तर ASUS ROG Phone 7 Ultimate मध्ये 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते ज्यासाठी 99,999 रुपये मोजावे लागतील. ही सीरिज मे महिन्यात विक्रीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होईल. कंपनीनं नेमकी तारीख मात्र अजून सांगितली नाही.

The post ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/feed/ 0
13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/#respond Fri, 24 Mar 2023 10:31:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19738 गेमिंग फोनचा विषय निघताच असूसच्या आरओजी सीरीजचं नाव सर्वप्रथम येतं. कंपनी आपल्या या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Asus ROG Phone 7 भारतात आणणार आहे. आरओजी फोन 7 13 एप्रिलला भारतात लाँच होईल. ROG म्हणजे Republic of Gamers, नावावरून समजतं की हा स्मार्टफोन गेमिंगसाठी किती खास असेल. कंपनीनं या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मात्र सांगितले नाहीत परंतु लीक्समधून बरीच […]

The post 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंग फोनचा विषय निघताच असूसच्या आरओजी सीरीजचं नाव सर्वप्रथम येतं. कंपनी आपल्या या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Asus ROG Phone 7 भारतात आणणार आहे. आरओजी फोन 7 13 एप्रिलला भारतात लाँच होईल. ROG म्हणजे Republic of Gamers, नावावरून समजतं की हा स्मार्टफोन गेमिंगसाठी किती खास असेल. कंपनीनं या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मात्र सांगितले नाहीत परंतु लीक्समधून बरीच माहिती समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता.

असूस आरओजी फोन 7 च्या लाँचची माहिती

असूस इंडियानं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीचा आगामी गेमिंग मोबाइल फोन Asus ROG Phone 7 13 एप्रिलला भारतात लाँच केला जाईल. या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फोन जगासमोर ठेवला जाईल आणि याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती दिली जाईल. 13 एप्रिलला आरओजी फोन 7 ग्लोबली लाँच होईल अशी अपेक्षा आहे जो भारतासह ताईपे, बर्लिन आणि न्यूयार्कमध्ये देखील एंट्री करू शकतो. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

असूस आरओजी फोन 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 6.8″ FHD+ 165Hz AMOLED Display
  • 16GB LPDDR5X RAM
  • 65W fast charging
  • 65W 6,000mAh Battery

Asus ROG Phone 7 संबंधित लीक्स व रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा आतापर्यंतच्या सर्वात पावरफुल मोबाइल प्रोसेसर पैकी एक आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. असूस आपला नवीन फोन 16जीबी रॅमसह मार्केटमध्ये सादर करू शकते जो LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीवर काम करू शकतो.

हा आरओजी फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये येऊ शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू मिळू शकतो जो गेमिंग दरम्यान स्मूद व वायब्रेंट मोशन देऊ शकतो. पावर बॅकअप पाहता समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार या मोबाइल फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

Asus ROG Phone 7 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनू शकते जी जो 165हर्ट्जच्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. हा रिफ्रेश रेट हाय ग्राफिक्स रेसिंग गेमला शानदार व्हिज्युअल क्वॉलिटी देऊ शकतो.

The post 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/feed/ 0