6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

Highlights

  • Samsung Galaxy F14 5G हा एफ सीरिजमधील नवा फोन आहे.
  • फोनमध्ये 50MP कॅमेरा, अँड्रॉइड 13 आणि 6.6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो.
  • Samsung Galaxy F14 5G ची लाँच ऑफर अंतर्गत किंमत 12,990 रुपये आहे.

Samsung Galaxy F14 5G ची भारतीय किंमत, सेल डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. हा फोन आज भारतात आला असून हा Galaxy F13 ची जागा घेईल. गॅलेक्सी एफ सीरिजमधील या नव्या मॉडेलमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात 50MP कॅमेरा, अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम, 6.6-इंचाचा डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. Samsung Galaxy F14 5G लाँच ऑफर अंतर्गत 12,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जी ची किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy F14 5G च्या बेस मॉडेलची किंमत 12,990 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तर फोनचा मोठा मॉडेल 14,990 रुपयांमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह खरेदी करता येईल. ही लाँच ऑफरमधील किंमत आहे, त्यामुळे कंपनी ही किंमत काही कालावधीनंतर वाढवू शकते. या फोनची विक्री येत्या 30 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाइटवरून केली जाईल. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6-inch FHD+ IPS LCD display
  • 90Hz refresh rate
  • Exynos 1330 SoC
  • 50MP + 2MP + 2MP triple cameras
  • 13MP selfie shooter
  • 6000mAh battery, 25W fast charging

Samsung Galaxy F14 मध्ये कंपनीचा एक्सॉनॉस 1330 चिपसेट देण्यात आला आहे. जोडला 6जीबी पर्यंतचा रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. जास्त स्टोरेज मिळवण्यासाठी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच कंपनीनं 6जीबी एक्सटेंडेड रॅमचं फिचर देखील फोनमध्ये दिलं आहे. कनेक्टव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळतो.

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीमध्ये 6.6-इंचाचा एफएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90हर्टज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा इतकं वॉटरड्रॉप नॉच असलेला पॅनल आहे जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआयवर चालतो. यातील 6,000एमएएचची मोठी बॅटरी याची खासियत म्हणता येईल. हा फोन 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जी मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे 50मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे जो एफ 1.8 अपर्चर आणि एलईडी फ्लॅशसह येतो. जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here