28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

Highlights

  • Samsung Galaxy A34 5G 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो.
  • 6जीबी रॅम असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी फोनची किंमत 28,999 रुपये असू शकते.
  • सध्या फोन 8GB RAM सह दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

Samsung नं अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy A34 5G फोन लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 8GB RAM सह मार्केटमध्ये आला आहे जो 30,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकला जात आहे. तसेच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की या फोनचा 6GB RAM व्हेरिएंट देखील भारतात लाँच होऊ शकतो जो 28,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. बँक व कंपनी ऑफर्सनंतर हा तुम्हाला 24,999 रुपयांना पडू शकतो.

91मोबाइल्सला रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी ए34 5जी फोनचा नवीन 6जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या फोनची मार्केट प्राइस 28,999 रुपये असू शकते. फोनच्या किंमतीवर कंपनी 3,000 रुपयांचा बँक डिस्काउंट देऊ शकते तसेच 1,000 रुपयांचे सॅमसंग शॉप अ‍ॅप वेलकम व्हाउचर देखील मिळतील. या ऑफर्स नंतर Samsung Galaxy A34 5G 6GB RAM ची प्राइस 24,999 रुपये होऊ शकते. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जीची किंमत

Samsung Galaxy A34 5G चे बाजारातील मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची किंमत पाहता याचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये विकला जात आहे तर मोठा 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा सॅमसंग फोन Light Green, Black, Light Violet आणि Silver कलरमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या फोनच्या खरेदीवर उपरोक्त ऑफर मिळत आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ Super AMOLED Display
  • 48MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 5000mAh Battery
  • 8GB RAM, 256GB Storage

Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना

या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here