Asus Zenfone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 16 Apr 2021 11:41:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ASUS ZenFone 8 Mini लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, यात असेल 16GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-mini-specs-spotted-on-geekbench-with-16gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-mini-specs-spotted-on-geekbench-with-16gb-ram/#respond Fri, 16 Apr 2021 11:41:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10598 ASUS Zenfone 8 Mini मॉडेल नंबर Asus_I006D सह दिसला आहे. लिस्टिंगनुसार, ZenFone 8 Mini मध्ये 2.84GHz आणि Adreno 660 GPU वर सीपीयू कोरसह ऑक्टा-कोर SoC असेल.

The post ASUS ZenFone 8 Mini लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, यात असेल 16GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी फेब्रुवारीमध्ये टेक वेबसाइट DigiTimes वर अशी माहिती समोर आली होती कि ASUS एक कॉम्पॅक्ट ZenFone डिवाइसवर काम करत आहे, जो ASUS ZenFone 8 Mini नावाने सादर केला जाईल. अलीकडेच या फोनला TÜV SÜD सर्टिफिकेशन मिळाले होते, ज्यात फोनच्या चार्जिंग स्पीडची माहिती समोर आली होती. आता ASUS ZenFone 8 Mini बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पॉट केला गेला आहे. हि लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice ला दिसली आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. (Asus Zenfone 8 Mini specs spotted on Geekbench with 16GB RAM)

गीकबेंच लिस्टिंग

ASUS Zenfone 8 Mini मॉडेल नंबर Asus_I006D सह दिसला आहे. लिस्टिंगनुसार, ZenFone 8 Mini मध्ये 2.84GHz आणि Adreno 660 GPU वर सीपीयू कोरसह ऑक्टा-कोर SoC असेल. या CPU आणि GPU मध्ये क्वालकॉमचा प्रमुख चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 888 काम करेल. याचा अर्थ असा आहे कि ASUS ZenFone 8 मिनीमध्ये स्नॅपड्रॅगॉन 888 SoC असेल.

हे देखील वाचा : Redmi Note 10 5G स्मार्टफोन भारतात POCO M3 Pro नावाने होईल लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसरबाबत समोर आलेल्या माहितीव्यतिरिक्त गीकबेंच लिस्टिंगवरून असे समजले आहे कि ZenFone 8 Mini मध्ये 16GB रॅम असेल आणि हा अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. फोनला सिंगल-कोर टेस्टमध्ये 1,121 गुण आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 3,662 गुण मिळाले आहेत. हि टेस्ट गीकबेंच 5.3.2 वर केली गेली आहे.

Asus Zenfone 8 Mini

काही दिवसांपूर्वी रिपोर्टमध्ये फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली होती. रिपोर्टनुसार Asus Zenfone 8 Mini मध्ये 5.9-इंचाचा डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC असेल. एक्सडीए डेवलपर्सचा रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे कि या नवीन सीरीजमध्ये आगामी तीन फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC ची शक्ती मिळेल.

हे देखील वाचा : 20 एप्रिलला आहे Apple चा मोठा ईवेंट, नवीन iPhone पासून AirPods पर्यंत होऊ शकतात या मोठ्या घोषणा

मागील रिपोर्टमध्ये असे पण सांगण्यात आले होते कि “SAKE” कोडनेम असलेला स्मार्टफोन जेनफोन 8 मिनी आहे. सोर्स कोडमधून समजले आहे कि डिवाइसमध्ये 5.92 इंचाचा OLED डिस्प्ले असेल. यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि FHD + रेजोल्यूशन 2400 × 1080 असेल. डिवाइसमध्ये मागे फक्त दोन कॅमेरा सेंसर- 64MP Sony IMX686 आणि नवीन Sony IMX663 असेल.

कधी लॉन्च होईल Asus Zenfoen 8 सीरीज?

हे स्मार्टफोन्स कंपनीच्या अपकमिंग Asus ZenFone 8 Series चा भाग आहेत कि कंपनी एखाद्या दुसऱ्या सीरीजवर काम करत आहे, हे अजून समजले नाही. कारण कंपनीकडून अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. या सीरीजमध्ये कंपनीद्वारे ZenFone 8 आणि ZenFone 8 Pro सोबतच एक कॉम्पॅक्ट फोन Zenfone 8 Mini लॉन्च होऊ शकतो.

The post ASUS ZenFone 8 Mini लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, यात असेल 16GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-mini-specs-spotted-on-geekbench-with-16gb-ram/feed/ 0