Redmi Note 10 5G स्मार्टफोन भारतात POCO M3 Pro नावाने होईल लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Xiaomi ने गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये Redmi Note 10 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर M2103K19G सह सादर केला होता. आता याच मॉडेल नंबरसह Poco India ने एक स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) मध्ये मॉडेल नंबर M2013K19PI सह लिस्ट केला आहे. यापूर्वी शाओमीचा स्मार्टफोन मॉडेल नंबर M2013K19PG सह फेडरल कॉम्यूनिकेशन कमिशन (FCC) च्या डेटा बेसमध्ये लिस्ट झाला आहे. याच मॉडेल नंबरचा स्मार्टफोन भारतात IMEI डेटाबेसमध्ये POCO M3 Pro नावाने लिस्ट केला गेला आहे. म्हणजे शाओमी भारतात Redmi Note 10 5G स्मार्टफोन Poco M3 Pro नावाने लॉन्च करण्याची योजना आखत आहे. (Xiaomi Redmi Note 10 5g smartphone can be launched as Poco M3 Pro in India)

FCC च्या लिस्टिंगनुसार मॉडेल नंबर M2103K19G सह येणारा Redmi Note 10 5G आणि मॉडेल नंबर M2013K19PG सह येणाऱ्या POCO M3 Pro च्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही फरक नाही. Poco M3 Pro स्मार्टफोनची डिजाइन काहीशी वेगळी असू शकते. याआधी पोको इंडियाने गेल्यावर्षी कॅमेरा सेंट्रिक POCO M3 स्मार्टफोन लॉन्च केला होता.

POCO ने भारतात अलीकडेच फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह POCO F3 आणि POCO F2 Pro स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, पण कंपनीने अजूनतरी 5G स्मार्टफोन लॉन्च केला नाही. आता कंपनी भारतात आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. हा स्मार्टफोन POCO M3 Pro असू शकतो जो मिडरेंजमध्ये 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाऊ शकतो.

POCO M3 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

POCO M3 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन HD+ आणि रिफ्रेश रेट 90Hz असू शकते. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पोकोचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह 4 GB आणि 6 GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. पोकोचा हा स्मार्टफोन Android 10 वर आधारित MIUI 12 वर चालेल. पोकोचा हा 5G स्मार्टफोन 64 GB आणि 128 GB च्या स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता POCO M3 Pro स्मार्टफोन 48-मेगापिक्सल मल्टीपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाऊ शकतो. पोकोचा हा स्मार्टफोन 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज सपोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स

विशेष म्हणजे शाओमीचा हा स्मार्टफोन मॉडेल नंबर M2013K19C सह चीनमध्ये TENAA च्या वेबसाइटवर लिस्ट झाला होता. रिपोर्ट्सनुसार शाओमीचा हा स्मार्टफोन चीनमध्ये Redmi 20X नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here