20 एप्रिलला आहे Apple चा मोठा ईवेंट, नवीन iPhone पासून AirPods पर्यंत होऊ शकतात या मोठ्या घोषणा

Apple द्वारे जेव्हा घोषणा होते कि कंपनी एखादा नवीन ईवेंट आयोजित करणार आहे, तेव्हा फक्त आयफोन फॅन्स नाही तर संपूर्ण मोबाईल विश्वाच्या नजारा या कंपनीवर स्थिरावतात. अ‍ॅप्पलच्या वॉयस असिस्टंट Siri ने लीक केले होते कि 20 एप्रिलला अ‍ॅप्पलचा ईवेंट आहे तेव्हा टेक इंडस्ट्रीचे कान टवकारले होते. आता अफवेला दुजोरा देत अ‍ॅप्पलने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 20 एप्रिलला Spring loaded नावाच्या Apple ईवेंटचे आयोजन करणार आहे. (Apple event spring loaded on 20th April what to expect Airtags iPad Pro Pencil Airpods)

Apple ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 20 एप्रिलला एक नवीन ईवेंट आयोजित करणार आहे जो Spring Loaded टॅगलाईनसह येईल. अ‍ॅप्पलचा हा ईवेंट कॅलिफोर्नियामधील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित केला जाईल ज्याचे प्रक्षेपण भारतासह जगभरात होईल. हा अ‍ॅप्पल ईवेंट 20 एप्रिलला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ज्याच्या मंचावर अनेक नवीन अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स सादर केले जातील. Apple ने अजूनतरी सांगितले नाही कि ईवेंटमध्ये कोण कोणते प्रोडक्ट सादर होतील पण मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सच्या आधारावर आम्ही अंदाज लावला आहे कि 20 एप्रिलच्या रात्री काय नवीन येऊ शकते.

Apple iPad Pro 2021

20 एप्रिलला आयोजित होणाऱ्या अ‍ॅप्पल ईवेंटमध्ये आयपॅडची नवीन रेंज बाजारात येऊ शकते. या आयपॅड्सचा लुक आणि डिजाईन गेल्यावर्षीच्या मॉडेल्स सारखी असेल परंतु समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार यावर्षी येत्या Apple iPad ची स्क्रीन 11 इंच आणि 12.9 इंचाची असू शकते. या आयपॅड्स मध्ये एलईडी डिस्प्ले पॅनल सोबतच यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स

iPad Mini

अ‍ॅप्पल आयपॅड सोबतच Spring Loaded Apple Event च्या मंचावरून आयपॅड मिनी पण टेक मार्केटमध्ये पाऊल टाकू शकतो. रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार या आयपॅडची स्क्रीन साईज 8.5 इंचापासून 9 इंचापर्यंत असेल. iPad Mini मध्ये प्रोसेसर पूर्वीपेक्षा फास्ट बनवला जाईल जो परफॉर्मन्स इम्प्रूव करेल. त्याचबरोबर नवीन आयपॅडमध्ये कॅमेरा मिळू शकतो.

Apple Pencil 3

अ‍ॅप्पलद्वारे 20 एप्रिलला आयोजित केल्या जाणाऱ्या ‘स्प्रिंग लोडेड’ ईवेंटच्या लोगोवर नजर टाकल्यास असे सहज म्हणता येईल कि यादिवशी अ‍ॅप्पल नवीन पेंसिल पण सादर करू शकते. या पेंसिलच्या नावाबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण आशा आहे कि हि आधीपेक्षा चांगल्या गेस्चर व नेविगेट फीचर्ससह येईल आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर बनलेली असेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

AirTags

बोलले जात आहे कि 20 एप्रिलला अ‍ॅप्पल आपला नवीन प्रोडक्ट AirTags पण जगासमोर ठेवेल. एयरटॅग्सवर कंपनी अनेक दिवस काम करत आहे. Apple AirTags एक ब्लूटूथ ट्रॅकिंग डिवायस आहे ज्यात चिप आहे. हा टॅग कोणत्याही वस्तूवर चिटकवता येईल आणि ती वस्तू कधीही ट्रॅक करून शोधता येईल. हा एयरटॅग गाडीची चावी किंवा बटवा सारख्या वस्तूंसाठी बनवण्यात आला आहे जो कायम iPhone शी कनेक्ट करता येईल.

iMac 2021

प्रोफेशनल लोकांसाठी उपयुक्त असलेला अ‍ॅप्पलचा कंम्प्यूटर म्हणजे iMac पण या ईवेंटमध्ये नवीन रुपासह लॉन्च होऊ शकतो. आशा आहे कि अ‍ॅप्पल या 20 एप्रिलला नवीन आयमॅक टेक विश्वासमोर सादर करेल जो फक्त प्रोसेसिंग पावरमध्ये पूर्वीपेक्षा शक्तिशाली नसेल तर लुक आणि डिजाईनमध्ये पण जास्त स्लीक, आकर्षक तसेच कमी बेजल्ससह येईल.

हे देखील वाचा : Redmi Note 10 5G स्मार्टफोन भारतात POCO M3 Pro नावाने होईल लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

AirPods 3

बातमीची पुष्टी तर झाली नाही पण अ‍ॅप्पल फॅन्स ईवेंटच्या मंचावरून नवीन एयरपॉड्सची वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि साल 2021 च्या पूर्वार्धात कंपनी इयरबड्सचा नवीन वर्जन घेऊन येईल. त्यामुळे आशा आहे कि कदाचित हाच तो ईवेंट आहे ज्याच्या मंचावरून नवीन Apple AirPods मार्केटमध्ये येतील.

Apple TV 2021

लीक्सनुसार अ‍ॅप्पल आपला स्मार्ट टेलीविजनचा पण अपग्रेडेड मॉडेल या ईवेंटच्या मंचावरून सादर करू शकते. नवीन Apple TV मध्ये गेमिंगची काळजी घेतली जाईल त्याचबरोबर नवीन फीचर्स व अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी असलेला टीव्ही रिमोट, अपग्रेडेड प्रोसेसर तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले नवीन अ‍ॅप्पल टीव्हीमध्ये मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here