BHIM - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Apr 2023 11:40:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/ https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/#respond Fri, 21 Apr 2023 11:39:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20396 देशात यूपीआयनं डिजिटल पेमेंट लोकप्रिय केलं आहे. यूपीआयमध्ये आधी युजर्स फक्त बँक अकाऊंट द्वारे पेमेंट करू शकत होते परंतु आता क्रेडिट कार्डनं देखील पेमेंट करू शकतात. यूपीआयशी सध्या फक्त रूपे क्रेडिट कार्डच लिंक करता येतात. तसेच हे पेमेंट फक्त मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर करता येईल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे ट्रांसफर करायचे असतील […]

The post यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आता तुम्ही यूपीआय पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड देखील वापरता येतं.
  • सध्या काही बँकांच्या रुपे क्रेडिट कार्डवर ही सुविधा उपलब्ध आहे.
  • इथे आम्ही यूपीआय अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत सांगितली आहे.

देशात यूपीआयनं डिजिटल पेमेंट लोकप्रिय केलं आहे. यूपीआयमध्ये आधी युजर्स फक्त बँक अकाऊंट द्वारे पेमेंट करू शकत होते परंतु आता क्रेडिट कार्डनं देखील पेमेंट करू शकतात. यूपीआयशी सध्या फक्त रूपे क्रेडिट कार्डच लिंक करता येतात. तसेच हे पेमेंट फक्त मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर करता येईल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे ट्रांसफर करायचे असतील तर तुम्हाला बँक टू बँक ट्रँजॅक्शन करावं लागेल.

क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करावं लागेल. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला यूपीआय अ‍ॅप मध्ये पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं याची माहिती देत आहोत. तसेच यूपीआय पेमेंटमध्ये क्रेडिट कार्ड कस वापरायचं हे देखील सांगणार आहोत.

यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत

BHIM अ‍ॅपमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओस डिवाइसमध्ये BHIM अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2: नंतर भीम अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.

स्टेप 3: मग ‘Bank Accounts’ सेक्शनवर क्लिक करा.

स्टेप 4: इथे + आयकॉनवर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला अ‍ॅड क्रेडिट कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5: आता क्रेडिट कार्ड इश्यू करणारी बँक सिलेक्ट करा आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

फोनपेमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये फोनपे ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

स्टेप 2: आता व्यू ऑल पेमेंट मेथड ऑप्शन सिलेक्ट करा.

स्टेप 3: नवीन पेजवर क्रेडिट/डेबिट कार्ड ऑप्शनवर टॅप करून कार्डची माहिती भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

GPay मध्ये क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये GPay अ‍ॅप ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

स्टेप 2: इथे तुम्हाला सेट या अप पेमेंट मेथड किंवा पे बिजनेससवर क्लिक करा.

स्टेप 3: मग क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा म्हणजे कार्ड स्कॅनसाठी कॅमेरा ओपन होईल. तुम्ही मॅन्युअली देखील कार्ड डिटेल्स टाकू शकता.

स्टेप 4: आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो भरा आणि कार्ड लिंक होईल.

क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट कसं करायचं

यूपीआयशी लिंक क्रेडिट कार्ड फक्त मर्चेंट अकाऊंटमध्ये पेमेंट करू शकेल. मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला बँक किंवा क्रेडिट कार्ड सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिसेल. क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो सबमिट केल्यावरच पेमेंट पूर्ण होईल. लक्षात असू दे 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वर 1.1 टक्के चार्ज द्यावा लागेल. त्यापेक्षा कमी ट्रँजॅक्शन फ्री असतील.

यूपीआय सध्या या बँकांच्या रुपे कार्डला सपोर्ट करतो.

  • एचडीएफसी बँक
  • इंडियन बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • यूनियन बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • कॅनरा बँक

The post यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/feed/ 0
आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 13:13:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2686 आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही आॅफिस किंवा कॉलेज मध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मेसेज आला कि पेटीएम मध्ये थोडे पैसे ट्रांसफर कर. पेटीएम मध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही पण कधी तरी असा मेसेज पाठवला असेलच. दूरवरून आॅनलाईन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोप्पा आणि वेगवान मार्ग बनला आहे. विशेषतः शहरांमध्ये पेटीएम तसेच मोबिक्विक, भीम ऍप व फोनपे सारखे डिजीटल वॉलेट दैनंदिन जीवनाचे भाग झाले आहेत. पण आता पैश्यांच्या देवाणघेवाणीवर निर्बंध येणार आहेत. आता पेटीएम व अन्य डिजीटल वॉलेट वरून एका दिवसात फक्त 10 वेळाच पैसे पाठवता व मिळवता येतील.

डिजीटल वॉलेट वरील देवाणघेवाणीवर नजर ठेवणारा विभाग नॅशनल पेमेंट कॉरपरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने आॅनलाईन ट्रांजेक्शनची दैनिक मर्यादा ठरवली आहे. जे डिजीटल वॉलेट यूपीआई च्या माध्यमातून आॅनलाईन ​ट्रांजेक्शन करतात ते सर्व ऍप एनपीसीआई च्या या मर्यादेत वापरता येतील. या ऍप्स मध्ये असणाऱ्या पेटीएम व भीम सारखे डिजीटल वॉलेट वापरणाऱ्या यूजर्स वर याचा परिणाम होईल. आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

पेटीएम किंवा अन्य वॉलेट वरून जर तुम्ही दुकानदाराला पेमेंट करत असाल तर हि 10 ट्राजेक्शन लिमिट लागू असणार नाही. पण जर एखाद्या मित्राला पैसे ट्रांसफर करत असाल तर मात्र तुम्ही एका दिवसात 10 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करू शकणार नाही. एका दिवसात 10 ट्रांजेक्शन सोबतच जास्तीत जास्त 1,00,000 रुपये ट्रांसफर करता येतील. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात यूपीआई च्या माध्यमातून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये हजारो कोटींची वाढ झाली आहे.

एनपीसीआई च्या रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये यूपीआई मधून देशात जवळपास 30 कोटी ट्रांजेक्शन झाले होते. तर यावर्षी ऑगस्ट पर्यंत या ट्रांजेक्शन्सची संख्या 54,000 कोटींवर गेली आहे. ​रिपोर्ट नुसार फक्त जुलै महिन्यात यूपीआई ट्रांजेक्शनची संख्या जवळपास 23.56 कोटी होती जी एका महिन्यात ऑगस्ट पर्यंत 31.2 कोटींवर पोचली. म्हणजे एका महिन्यात यूपीई मधून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये 32 टक्क्यांची वृद्धि झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आरबीआई ने देशात डिजिटल देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन गाइडलाइंस जारी केल्या आहेत. ज्या अंर्तगत एका वॉलेट मधून दुसऱ्या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन निर्देश जारी करून सांगितले कि डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्क चा वापर करू शकतात. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/feed/ 0