यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Highlights

  • आता तुम्ही यूपीआय पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड देखील वापरता येतं.
  • सध्या काही बँकांच्या रुपे क्रेडिट कार्डवर ही सुविधा उपलब्ध आहे.
  • इथे आम्ही यूपीआय अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत सांगितली आहे.

देशात यूपीआयनं डिजिटल पेमेंट लोकप्रिय केलं आहे. यूपीआयमध्ये आधी युजर्स फक्त बँक अकाऊंट द्वारे पेमेंट करू शकत होते परंतु आता क्रेडिट कार्डनं देखील पेमेंट करू शकतात. यूपीआयशी सध्या फक्त रूपे क्रेडिट कार्डच लिंक करता येतात. तसेच हे पेमेंट फक्त मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर करता येईल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे ट्रांसफर करायचे असतील तर तुम्हाला बँक टू बँक ट्रँजॅक्शन करावं लागेल.

क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करावं लागेल. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला यूपीआय अ‍ॅप मध्ये पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं याची माहिती देत आहोत. तसेच यूपीआय पेमेंटमध्ये क्रेडिट कार्ड कस वापरायचं हे देखील सांगणार आहोत.

यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत

BHIM अ‍ॅपमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओस डिवाइसमध्ये BHIM अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2: नंतर भीम अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.

स्टेप 3: मग ‘Bank Accounts’ सेक्शनवर क्लिक करा.

स्टेप 4: इथे + आयकॉनवर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला अ‍ॅड क्रेडिट कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5: आता क्रेडिट कार्ड इश्यू करणारी बँक सिलेक्ट करा आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

फोनपेमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये फोनपे ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

स्टेप 2: आता व्यू ऑल पेमेंट मेथड ऑप्शन सिलेक्ट करा.

स्टेप 3: नवीन पेजवर क्रेडिट/डेबिट कार्ड ऑप्शनवर टॅप करून कार्डची माहिती भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

GPay मध्ये क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये GPay अ‍ॅप ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

स्टेप 2: इथे तुम्हाला सेट या अप पेमेंट मेथड किंवा पे बिजनेससवर क्लिक करा.

स्टेप 3: मग क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा म्हणजे कार्ड स्कॅनसाठी कॅमेरा ओपन होईल. तुम्ही मॅन्युअली देखील कार्ड डिटेल्स टाकू शकता.

स्टेप 4: आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो भरा आणि कार्ड लिंक होईल.

क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट कसं करायचं

यूपीआयशी लिंक क्रेडिट कार्ड फक्त मर्चेंट अकाऊंटमध्ये पेमेंट करू शकेल. मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला बँक किंवा क्रेडिट कार्ड सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिसेल. क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो सबमिट केल्यावरच पेमेंट पूर्ण होईल. लक्षात असू दे 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वर 1.1 टक्के चार्ज द्यावा लागेल. त्यापेक्षा कमी ट्रँजॅक्शन फ्री असतील.

यूपीआय सध्या या बँकांच्या रुपे कार्डला सपोर्ट करतो.

  • एचडीएफसी बँक
  • इंडियन बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • यूनियन बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • कॅनरा बँक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here