आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली

तुम्ही आॅफिस किंवा कॉलेज मध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मेसेज आला कि पेटीएम मध्ये थोडे पैसे ट्रांसफर कर. पेटीएम मध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही पण कधी तरी असा मेसेज पाठवला असेलच. दूरवरून आॅनलाईन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोप्पा आणि वेगवान मार्ग बनला आहे. विशेषतः शहरांमध्ये पेटीएम तसेच मोबिक्विक, भीम ऍप व फोनपे सारखे डिजीटल वॉलेट दैनंदिन जीवनाचे भाग झाले आहेत. पण आता पैश्यांच्या देवाणघेवाणीवर निर्बंध येणार आहेत. आता पेटीएम व अन्य डिजीटल वॉलेट वरून एका दिवसात फक्त 10 वेळाच पैसे पाठवता व मिळवता येतील.

डिजीटल वॉलेट वरील देवाणघेवाणीवर नजर ठेवणारा विभाग नॅशनल पेमेंट कॉरपरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने आॅनलाईन ट्रांजेक्शनची दैनिक मर्यादा ठरवली आहे. जे डिजीटल वॉलेट यूपीआई च्या माध्यमातून आॅनलाईन ​ट्रांजेक्शन करतात ते सर्व ऍप एनपीसीआई च्या या मर्यादेत वापरता येतील. या ऍप्स मध्ये असणाऱ्या पेटीएम व भीम सारखे डिजीटल वॉलेट वापरणाऱ्या यूजर्स वर याचा परिणाम होईल. आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

पेटीएम किंवा अन्य वॉलेट वरून जर तुम्ही दुकानदाराला पेमेंट करत असाल तर हि 10 ट्राजेक्शन लिमिट लागू असणार नाही. पण जर एखाद्या मित्राला पैसे ट्रांसफर करत असाल तर मात्र तुम्ही एका दिवसात 10 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करू शकणार नाही. एका दिवसात 10 ट्रांजेक्शन सोबतच जास्तीत जास्त 1,00,000 रुपये ट्रांसफर करता येतील. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात यूपीआई च्या माध्यमातून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये हजारो कोटींची वाढ झाली आहे.

एनपीसीआई च्या रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये यूपीआई मधून देशात जवळपास 30 कोटी ट्रांजेक्शन झाले होते. तर यावर्षी ऑगस्ट पर्यंत या ट्रांजेक्शन्सची संख्या 54,000 कोटींवर गेली आहे. ​रिपोर्ट नुसार फक्त जुलै महिन्यात यूपीआई ट्रांजेक्शनची संख्या जवळपास 23.56 कोटी होती जी एका महिन्यात ऑगस्ट पर्यंत 31.2 कोटींवर पोचली. म्हणजे एका महिन्यात यूपीई मधून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये 32 टक्क्यांची वृद्धि झाली आहे.

काही दिवसांपूर्वी आरबीआई ने देशात डिजिटल देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन गाइडलाइंस जारी केल्या आहेत. ज्या अंर्तगत एका वॉलेट मधून दुसऱ्या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन निर्देश जारी करून सांगितले कि डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्क चा वापर करू शकतात. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here