BSNL 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Dec 2022 15:22:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/bsnl-5g-launch-soon-in-india-4g-towers-upgrade-in-5g-7-months-telecom-minister/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-5g-launch-soon-in-india-4g-towers-upgrade-in-5g-7-months-telecom-minister/#respond Mon, 12 Dec 2022 10:28:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15919 Airtel-Jio 5G लाइव्ह होऊन काही महिने झाले आहेत. सध्या जरी या कंपन्या 5G मोफत देत असले तरी आगामी काळात मोठी वसुली करू शकतात, अशी भीती ग्राहकांना आहे. परंतु लवकरच एक टेलिकॉम कंपनी किफायती दरात 5G सेवा देण्यासाठी बाजारात दाखल होऊ शकते. आता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या ग्राहकांना देखील लवकरच 5G सर्व्हिसची मजा मिळणार […]

The post सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel-Jio 5G लाइव्ह होऊन काही महिने झाले आहेत. सध्या जरी या कंपन्या 5G मोफत देत असले तरी आगामी काळात मोठी वसुली करू शकतात, अशी भीती ग्राहकांना आहे. परंतु लवकरच एक टेलिकॉम कंपनी किफायती दरात 5G सेवा देण्यासाठी बाजारात दाखल होऊ शकते. आता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या ग्राहकांना देखील लवकरच 5G सर्व्हिसची मजा मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं आहे की बीएसएनएल पुढील 5 ते 7 महिन्यांत 1.35 लाख 4G टावर्स 5G वर अपग्रेड करण्याची योजना बनवत आहे.

बीएसएनएल आपले टॉवर्स अपग्रेड करत असल्याची माहिती सरकारी कंपनीनं दिली नाही तर स्वतः टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. गेली अनेक वर्ष भारतात मोठ्याप्रमाणावर 4G नेटवर्क देण्यात अपयश आल्यानंतर आता सरकारी कंपनी लवकरच 4G आणि 5G सर्व्हिस लाइव्ह करण्याची जोरदार तयारी करत आहे. आशा आहे की कंपनीच्या 3G सेवेप्रमाणे नव्या जेनरेशनची नेटवर्क सेवा देखील सामान्यांना परवडणारी असेल. हे देखील वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera; Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची तारीख समजली

BSNL 4G टावर्स होतील 5G वर अपग्रेड

मीडिया रिपोर्टनुसार, BSNL आपल्या 1.35 लाख 4G टावर्सना जवळपास पाच ते सात महिन्यांमध्ये 5G वर अपग्रेड करण्याची योजना बनवत आहे. सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DoT) BSNL ला 5G कोर मिळवून देईल ज्यामुळे कंपनी 5G सर्व्हिस इनेबल करू शकेल. यावरून असं समजतं की कंपनीची 5G सेवा नॉन स्टॅन्ड अलोन (NSA) प्रकारची असेल त्यामुळे इंटरनेट स्पीड कमी परंतु नेटवर्कची व्याप्ती मोठी असेल.

15 ऑगस्टला येऊ शकतं BSNL 5G

याआधी अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की येत्या सहा महिन्यांमध्ये, 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल आणि पुढील काही वर्षांमध्ये देशातील 80-90 टक्के भागात 5G सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2023 ला बीएसएनएलचा 5G लाइव्ह केलं जाईल. हे देखील वाचा: 6GB RAM सह येतोय सॅमसंगचा स्वस्त Samsung Galaxy A54 5G फोन; वेबसाइटवर झाला लिस्ट

याआधी बातमी आली होती की बीएसएनएल आणि टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेज (TCS) मिळून 4जी सेवा सादर करतील. पहिल्यांदाच 4जी सेवेसाठी भारतीय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल, अशी माहिती BSNL चे डायरेक्टर Sushil Kumar Mishra यांनी दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं टेलीकॉम सेक्टर मध्ये 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूक म्हणजे FDI ला मंजूरी दिली होती. तसेच सरकारनं दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम चार्ज आणि एजीआरच्या थकबाकीवर 4 वर्षांचा मोरेटोरियम देण्याचा देखील निर्णय घेतला होता.

The post सरकारी दरात मिळणार 5G ची मजा! Jio-Airtel चा बाजार बंद करण्यासाठी येतंय BSNL 5G; लाँच डेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-5g-launch-soon-in-india-4g-towers-upgrade-in-5g-7-months-telecom-minister/feed/ 0
बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/#respond Wed, 18 Jul 2018 12:55:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1307 बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल.

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेट चा वापर सध्या जोरदार सुरू आहे. टेलीकॉम कंपन्यांनी स्वस्तात 4जी डेटा दिल्यामुळे देशातील स्मार्टफोन यूजर्स इंटरनेट चा भरपूर फायदा घेत आहेत. यात देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) 4जी क्षेत्रात खासगी कंपन्यापेक्षा मागे राहिली आहे. आणि हे बीएसएनएल च्या पण लक्षात आहे म्हणून कंपनी आता पूर्ण तयारी सह देशात 5जी सर्विस आणण्याचे प्रयत्न करत आहे. बीएसएनएल ने आपल्या यूजर्स साठी 5जी सर्विस घेऊन येण्या बाबत एक मोठी घोषणा केली आहे.

बीएसएनएल ने सांगितले आहे की कंपनी 5जी सर्विस वर काम करत आहे आणि लवकरच आपल्या यूजर्सना 5जी ची सेवा देऊ इच्छित आहे. बीएसएनएल ने 5जी सर्विस साठी काही अंर्तराष्ट्रीय टेलीकॉम कंपन्यां सोबत करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये एनटीटी एडवांस टेक्नोलॉजी सोबतच प्रसिद्ध मोबाईल ब्रांड नोकिया पण आहे. बीएसएनएल ने सांगितले आहे की भारत संचार निगम लिमिटेड 5जी सेवेत मागे राहणार नाही आणि जगातील इतर देशां सोबतच ही सर्विस भारतात घेऊन येईल.

बीएसएनएल चे चीफ जनरल मॅनेजर अनिल जैन ने यांनी सांगितले की अंदाजे 2020 मध्ये 5जी सर्विस सुरू होईल, पण बीएसएनएल ला अपेक्षा आहे की कंपनी पुढच्या वर्षी 2019 मध्ये आपली 5जी सर्विस लॉन्च करेल. चीफ ने हे मान्य केले आहे की कंपनी ने 4जी मिस केली पण 5जी सर्विस च्या क्षेत्रात कंपनी मागे राहणार नाही. बीएसएनएल ची 5जी सर्विस मर्यादित काळातच संपूर्ण देशात सुरू करेल.

अनिल जैन ने सांगितले आहे की बीएसएनएल ने ​ग्राउंड लेवल वर 5जी ची टेस्टिंग सुरू केली आहे आणि यासाठी अनेक अंर्तराष्ट्रीय टेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. जैन यांचे म्हणणे आहे की 5जी सर्विस बद्दल अनेक इंटरनेशनल कंपन्यांनी सुचना पाठवल्या आहेत तर काहींनी आपल्या नेटवर्क वर काम पण केले आहे. अनिल यांच्या नुसार जगभरात 5जी सर्विस साठी टेस्टिंग सुरू आहे. जर्मनी व चीन सह भारतात पण 5जी सर्विस वर अनेक टेस्ट केले जात आहेत.

विशेष म्हणजे बीएसएनएल 1 ऑगस्ट पासून भारतात ‘बीएसएनएल विंग्स’ ची सुरवात करणार आहे. बीएसएनएल विंग्स देशातील पहिली इंटरनेट टेलीफोनी सेवा आहे. हा एक असा अॅप आहे जो वापरून वीना कोणताही सिम कार्ड वाई-फाई वरून देशातील कोणत्याही मोबाइल नंबर वर कॉल करता येईल. या अॅप मधून मोबाइल नंबर सोबत लँडलाईन नंबर वर पण फ्री कॉल करता येईल.

सध्या व्हाट्सॅप सारख्या अॅप मधून आॅडियो किंवा वीडियो कॉल करण्यासाठी दुसर्‍या व्यक्ति च्या फोन मध्ये पण तोच अॅप्लीकेशन असणे गरजेचे आहे. पण बीएसएनएल विंग्स वापरण्यासाठी याची गरज नसेल. या अॅप मधून कोणत्याही नंबर वर डायरेक्ट कॉल करता येईल. विशेष म्हणजे या कॉलिंग साठी कोणत्याही सिम ची गरज नसेल, म्हणजे नो सिम नो डेटा पॅक.

बीएसएनएल विंग्स बद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

The post बीएसएनएल करत आहे 5जी सर्विस चे काम, नोकिया सोबत केली हातमिळवणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-roll-out-5g-service-with-global-launch-nokia-bsnl-wings-in-marathi/feed/ 0