6GB RAM सह येऊ शकतो Samsung Galaxy A54 5G फोन; गिकबेंचवर झाला लिस्ट

91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून काही ही Samsung Galaxy A54 5G ची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ शेयर केला होता, ज्यात फोनच्या फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. तर आता हा 5जी सॅमसंग फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या सर्टिफिकेशनवरून स्पष्ट झालं होतं की Samsung Galaxy A54 5G फोन लवकरच लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A54 5G च्या फीचर्सचा खुलासा

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोन गीकबेंचवर SM-A546B मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग 9 डिसेंबरची आहे, जिथे गॅलेक्सी ए54 5जीला सिंगल-कोर मध्ये 776 स्कोर मिळाला आहे, तसेच मल्टी-कोरमध्ये या सॅमसंग फोनला 2599 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंचवर समोर आलेले अन्य फीचर्स पाहता Samsung Galaxy A54 5G लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 सह दिसला आहे. तसेच या फोनमध्ये वनयुआय स्कीन मिळेल.

Samsung Galaxy A54 5G फोन गीकबेंचवर 6 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट असू शकतो तसेच मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम दिला जाऊ शकतो. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचा देखील खुलासा झाला आहे जो 2.40गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी68 जीपीयू दिला जाऊ शकतो. आशा आहे की गॅलेक्सी ए54 5जी सॅमसंग एक्सनॉस 1380 चिपसेटवर चालू शकतो.

Samsung Galaxy A54 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स

रेंडरनुसार Samsung Galaxy A54 स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल कटआऊट मिळू शकते, ज्यात सेल्फी कॅमेरा असू शकतो. हा फोन थोड्याश्या बेजलसह बाजारात येऊ शकतो. फोनच्या उजवीकडे व्हॉल्युम रॉकर आणि पावर बटन मिळू शकतो. तर यूएसबी टाइप सी पोर्ट मायक्रोफोन आणि स्पीकर ग्रील तळाला दिली जाऊ शकते. फोनच्या वरच्या पॅनलवर सिम ट्रे आणि सेकंडरी मायक्रोफोन दिसत आहे. तर मागच्या बाजूला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स व सर्टिफिकेशन्सनुसार हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो तसेच तथा फोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,100एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here