BSNL Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Oct 2022 10:24:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/90-days-validity-plan-bsnl-rs-439-recharge-details/ https://www.91mobiles.com/marathi/90-days-validity-plan-bsnl-rs-439-recharge-details/#respond Tue, 25 Oct 2022 10:24:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14289 मोबाइल युजर्सना आपल्या टेलीकॉम ऑपरेटरकडून चांगला नेटवर्क आणि फास्ट इंटरनेट मिळण्याची अपेक्षा असते. तसेच आता महागाईमुळे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या रिचार्ज प्लॅनची मागणी देखील वाढली आहे. अनेक युजर्स असे देखील आहेत ज्यांना दरमहिन्याला रिचार्ज करण्याआधी दीर्घ वैधता असलेले प्लॅन्स हवे असतात. अशा युजर्ससाठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL नं 439 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. […]

The post 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइल युजर्सना आपल्या टेलीकॉम ऑपरेटरकडून चांगला नेटवर्क आणि फास्ट इंटरनेट मिळण्याची अपेक्षा असते. तसेच आता महागाईमुळे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या रिचार्ज प्लॅनची मागणी देखील वाढली आहे. अनेक युजर्स असे देखील आहेत ज्यांना दरमहिन्याला रिचार्ज करण्याआधी दीर्घ वैधता असलेले प्लॅन्स हवे असतात. अशा युजर्ससाठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL नं 439 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. बीएसएनएल (Bharat Sanchar Nigam Limited) चा हा प्लॅन BSNL Diwali 2022 offer अंतगर्त सादर केला गेला आहे जो 439 रुपयांमध्ये 90 दिवसांची दीर्घ वॅलिडिटी (90 days validity) देतो.

90 Days Validity

90 दिवसांच्या वॅलिडिटीसाठी बीएसएनएल कंपनी 439 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा एक प्रीपेड प्लॅन आहे ज्यात मोबाइल युजर्सना 90 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनची मुख्य यूएसपी यात मिळणारी दीर्घ वॅलिडिटी आहे, ज्यामुळे एकदा 439 रुपयांचा रिचार्ज केल्यावर 90 दिवस म्हणजे 3 महिन्यांची वैधता मिळते. Jio, Airtel आणि Vi च्या तुलनेत BSNL चा हा प्लॅन 90 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या सर्वात किफायतशीर प्लॅन्स पैकी एक आहे. हे देखील वाचा: WhatsApp Down: ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली; तुम्हाला देखील येतेय का समस्या?

BSNL Rs 439 Plan

बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या वॅलिडिटी व्यतिरिक्त कोणते फायदे मिळतात, ते पाहायचं झालं तर कंपनीद्वारे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे. हे कॉल 90 दिवस पूर्णपणे फ्री असतील तसेच बीएसएनएल ग्राहक कोणत्याही नंबर अमर्याद व्हॉइस कॉलिंग करू शकतील. तसेच कंपनीकडून या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील दिले जात आहेत. हे एसएमएस कोणत्याही डेली लिमिटविना येतात त्यामुळे यांचा वापर कधीही करता येतो. हे देखील वाचा: PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज

BSNL 130 Days Validity Prepaid Plan Free Calls And Data See Full Detail

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत आम्ही बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इंटरनेट डेटाचा उल्लेख का केला नाही, ज्याचे उत्तर ऐकून तुम्हाला एक झटका लागू शकतो. कंपनीकडून या 439 रुपयांचा प्लॅनमध्ये बिल्कुलही internet data दिला जात नाही. हा प्लॅन डेटाविना येतो आणि युजर्सना इंटरनेटची सुविधा मिळत नाही. जर इंटरनेटचा वापर करायचा असेल तर त्यासाठी अन्य रिचार्ज किंवा वायफायचा वापर करावा लागेल. हा प्लॅन त्या युजसारसाठी बेस्ट आहे ज्यांना कमी पैशात आपलं दुसरं सिम सक्रिय ठेवायचं आहे. तसेच ज्यांच्या परिसरात बीएसएनलचं नेटवर्क मिळतं आणि ज्यांना फक्त कॉलिंगसाठी प्लॅन हवा आहे, ते युजर्स देखील 439 रुपयांचा रिचार्ज करू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/90-days-validity-plan-bsnl-rs-439-recharge-details/feed/ 0
600 रुपयांमध्ये मिळत आहे 300GB डेटा, सोबतच 5 मिनिटांच्या कॉल वर 6 पैसे कॅशबॅक https://www.91mobiles.com/marathi/bsnl-extends-rs-600-broadband-plan-with-300gb-data-6-paise-cashback-offer/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-extends-rs-600-broadband-plan-with-300gb-data-6-paise-cashback-offer/#respond Wed, 29 Jul 2020 10:33:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7711 BSNL ने आपल्या यूजर्ससाठी प्रोमोशनल प्लानच्या रूपात 600 रुपयांचा एक ब्रॉडबॅंड प्लान सादर केला होता जो 27 जुलै पर्यंत वैध होता.

The post 600 रुपयांमध्ये मिळत आहे 300GB डेटा, सोबतच 5 मिनिटांच्या कॉल वर 6 पैसे कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL आपल्या यूजर्सना नेटवर्कशी जोडून ठेवण्यासाठी स्वस्तात जास्त बेनिफिट असलेले प्लान्स घेऊन येत असते. भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ने आपल्या सर्विस आणि स्वस्त प्लान्सच्या जोरावर खाजगी कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न गेले काही महिने करत आहे. ग्राहकांना असाच अजून आनंद देत BSNL ने आपल्या लोकप्रिय ‘5 pe 6’ ऑफरची वैधता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे.

जास्तीत जास्त लोकांना आपल्या नेटवर्कवर आणण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी सर्व टेलीकॉम कंपन्या काही ना काही आर्कषक ऑफर्स घेऊन येत असतात. आणि याच प्रयत्नात BSNL ने ‘5 pe 6’ ऑफरची सुरवात केली होती, ज्यात बीएसएनएल ग्राहकांना कॉलच्या बदल्यात 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. हि शानदार ऑफर कंपनीने आधीच सादर केली आहे पण आता ग्राहकांची गरज पाहता कंपनीने ऑफरची वैधता वाढवून शेवटची तारीख 31 ऑगस्ट केली आहे.

अशी आहे ऑफर

BSNL च्या ‘5 pe 6’ ऑफर मध्ये ग्राहकांना आउटगोइंग कॉल वर पैसे मिळतात. दर 5 मिनिटांचा कॉल पूर्ण झाल्यावर यूजरला 6 पैश्यांचा कॅशबॅक दिला जातो. जितका वेळ यूजर 5 मिनिट्स बोलतो तितक्या वेळा 6 पैसे कॅशबॅक मिळतो. म्हणजे जेवढा वेळ कॉल चालेल तेवढा जास्त कॅशबॅक. हा कॅशबॅक फक्त आउटगोइंग कॉल करणाऱ्यांना दिला जातो. या ऑफर अंतर्गत एक यूजर एका महिन्यात एका कनेक्शन वर जास्ती जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक मिळवूं शकतो.

अश्याप्रकारे घ्या लाभ

बीएसएनएल ने आपली हि ऑफर ब्रॉडबॅंड, लँडलाईन आणि फाइबर-टू-द-होम म्हणजे FTTH कनेक्शन वर उपलब्ध केली आहे. जर तुम्ही पण BSNL यूजर असाल आणि तुम्ही अजूनही या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर बीएसएनएल ग्राहक आपल्या कनेक्शन वरून टोल फ्री नंबर 18005991900 वर कॉल करू शकतात. तसेच ‘5 pe 6’ कॅशबॅक ऑफरसाठी 9478053334 वर ‘ACT’ नंतर स्पेस सह आपला फोन नंबर लिहून एसएमएस पाठवावा लागेल. लक्षात असू दे कि फोन नंबर सह एसटीडी कोड लिहिणे अनिवार्य आहे. अश्याप्रकारे स्कीमचा लाभ घेता येईल.

600 रुपयांच्या ब्रॉडबॅंड प्लानची वैधता पण वाढली

BSNL ने आपल्या यूजर्ससाठी प्रोमोशनल प्लानच्या रूपात 600 रुपयांचा एक ब्रॉडबॅंड प्लान सादर केला होता जो 27 जुलै पर्यंत वैध होता. पण आता कंपनीने ग्राहकांसाठी या प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएल यूजर आता येत्या 27 अक्टूबर पर्यंत या प्लानचा रिचार्ज करू शकतील. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता 600 रुपयांमध्ये यूजर्सना एकूण 300GB डेटा दिला जात आहे जो 40Mbps च्या स्पीडने वापरता येतो. 300जीबी संपल्यावर ग्राहक 2Mbps स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. त्याचबरोबर प्लान मध्ये अनलिमिटेड नॅशनल वॉयस कॉलिंग पण फ्री मिळत आहे.

The post 600 रुपयांमध्ये मिळत आहे 300GB डेटा, सोबतच 5 मिनिटांच्या कॉल वर 6 पैसे कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-extends-rs-600-broadband-plan-with-300gb-data-6-paise-cashback-offer/feed/ 0