90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती

मोबाइल युजर्सना आपल्या टेलीकॉम ऑपरेटरकडून चांगला नेटवर्क आणि फास्ट इंटरनेट मिळण्याची अपेक्षा असते. तसेच आता महागाईमुळे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या रिचार्ज प्लॅनची मागणी देखील वाढली आहे. अनेक युजर्स असे देखील आहेत ज्यांना दरमहिन्याला रिचार्ज करण्याआधी दीर्घ वैधता असलेले प्लॅन्स हवे असतात. अशा युजर्ससाठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL नं 439 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. बीएसएनएल (Bharat Sanchar Nigam Limited) चा हा प्लॅन BSNL Diwali 2022 offer अंतगर्त सादर केला गेला आहे जो 439 रुपयांमध्ये 90 दिवसांची दीर्घ वॅलिडिटी (90 days validity) देतो.

90 Days Validity

90 दिवसांच्या वॅलिडिटीसाठी बीएसएनएल कंपनी 439 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा एक प्रीपेड प्लॅन आहे ज्यात मोबाइल युजर्सना 90 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनची मुख्य यूएसपी यात मिळणारी दीर्घ वॅलिडिटी आहे, ज्यामुळे एकदा 439 रुपयांचा रिचार्ज केल्यावर 90 दिवस म्हणजे 3 महिन्यांची वैधता मिळते. Jio, Airtel आणि Vi च्या तुलनेत BSNL चा हा प्लॅन 90 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या सर्वात किफायतशीर प्लॅन्स पैकी एक आहे. हे देखील वाचा: WhatsApp Down: ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली; तुम्हाला देखील येतेय का समस्या?

BSNL Rs 439 Plan

बीएसएनएल 439 रुपयांचा प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या वॅलिडिटी व्यतिरिक्त कोणते फायदे मिळतात, ते पाहायचं झालं तर कंपनीद्वारे अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे. हे कॉल 90 दिवस पूर्णपणे फ्री असतील तसेच बीएसएनएल ग्राहक कोणत्याही नंबर अमर्याद व्हॉइस कॉलिंग करू शकतील. तसेच कंपनीकडून या रिचार्ज प्लॅनमध्ये 300 एसएमएस देखील दिले जात आहेत. हे एसएमएस कोणत्याही डेली लिमिटविना येतात त्यामुळे यांचा वापर कधीही करता येतो. हे देखील वाचा: PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज

BSNL 130 Days Validity Prepaid Plan Free Calls And Data See Full Detail

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत आम्ही बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इंटरनेट डेटाचा उल्लेख का केला नाही, ज्याचे उत्तर ऐकून तुम्हाला एक झटका लागू शकतो. कंपनीकडून या 439 रुपयांचा प्लॅनमध्ये बिल्कुलही internet data दिला जात नाही. हा प्लॅन डेटाविना येतो आणि युजर्सना इंटरनेटची सुविधा मिळत नाही. जर इंटरनेटचा वापर करायचा असेल तर त्यासाठी अन्य रिचार्ज किंवा वायफायचा वापर करावा लागेल. हा प्लॅन त्या युजसारसाठी बेस्ट आहे ज्यांना कमी पैशात आपलं दुसरं सिम सक्रिय ठेवायचं आहे. तसेच ज्यांच्या परिसरात बीएसएनलचं नेटवर्क मिळतं आणि ज्यांना फक्त कॉलिंगसाठी प्लॅन हवा आहे, ते युजर्स देखील 439 रुपयांचा रिचार्ज करू शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here