WhatsApp Down: ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली; तुम्हाला देखील येतेय का समस्या?

WhatsApp down in India: भारतात सर्वात पॉपुलर मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp पुन्हा एका भारतात डाउन झाला आहे. Whatsapp down होताच सोशल मीडिया अ‍ॅप्सवर युजर्सनी याची टँकर करण्यास सुरुवात केली आहे. युजर्सनुसार मंगळवारी 25 ऑक्टोबरला प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवताना त्यांना अडचण येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप डाउन होण्यामागे कोणतं कारण हे अजून स्पष्ट झालं नाही. तसेच DownDetector.in नुसार मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगलुरू, चेन्नई आणि कोलकातासह भारतातील अनेक भागांमध्ये जवळपास 6,000 युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅपवर अडचण येत असल्याची माहिती दिली आहे.

मेसेज पाठवणे आणि रिसिव्हर होत नाहीत

बातमी लिहताना 91मोबाइल्स टीमच्या जवळपास सर्व मेंबर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवणे आणि रिसीव्ह करताना समस्येचा सामना करावा लागत आहे. कंपनीनं अधिकृतपणे व्हॉट्सअ‍ॅप डाउनल बद्दल कोणतीही स्टेटमेंट दिली नाही. तसेच आम्हाला वाटते की ही एक सर्वर-लेव्हल समस्या आहे ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आउटेज होत आहे.

डिलीट करून पुन्हा इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करू नका

आमच्या टीमच्या एका सदस्याने जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप डाउन झाल्यानंतर ते अनइंस्टॉल करून पुन्हा इंस्टॉल केलं. या प्रयत्नात प्ले स्टोरवरून मेसेज मिळण्यास त्यांना 5 मिनिटे वाट बघावी लागली आणि पुन्हा प्रयत्न करावा लागला. याचा अर्थ असा की तुम्ही देखील WhatsApp Down असल्यामुळे मेसेज पाठवू शकत नसाल तर WhatsApp Uninstall करून Install करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच स्मार्टफोन फ्लाइट मोडवर टाकणे किंवा फोन स्विच ऑफ करून देखील कोणताही फायदा होणार नाही. समस्या WhatsApp मध्ये आहे, तुमच्या नेटवर्क किंवा स्मार्टफोनमध्ये नाही.

ट्विटरवर लोक उडवतायत खिल्ली

ट्विटरवर व्हाट्सअप डाउन झाल्यानंतर हॅशटॅग #WhatsAppDown सह लोक ट्वीट करून याची माहिती देत आहेत. तसेच अनेक लोकांनी मीम शेयर करण्यास सुरुवात केली आहे जे खूप मजेदार आहेत. हे ट्विट पाहून तुम्हाला तुमचं हसू रोखता येणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here