Call of Duty Mobile - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 31 Oct 2019 16:03:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार https://www.91mobiles.com/marathi/pubg-vs-call-of-duty/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-vs-call-of-duty/#respond Thu, 31 Oct 2019 16:03:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5644 काही ठिकाणी पबजी वरचढ आहे तर काही बाबतीती Call Of Duty.

The post जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज मोबाईल गेमचे नाव येताच सर्वात आधी लोक PUBG बद्दल बोलतात. परंतु अलीकडेच Call Of Duty पण खूप लोकप्रिय झाला आहे. सर्वात आधी 2003 मध्ये हा गेम पीसी साठी लॉन्च केला गेला होता पण नुकताच याचा मोबाईल वर्जन पण लॉन्च करण्यात आला आहे आणि हा पण लोकांना आवडत आहे. त्यामुळे जे मोबाईल गेमर आहेत ते या दोन्ही प्रचलित गेम्स बद्दल थोडे गोंधळले आहेत. अनेक लोक विचारतात कि PUBG आणि Call Of Duty दोन्ही गेम्स पैकी कोणता चांगला आहे? मोबाईल यूजरचा हाच गोंधळ सोडवण्यासाठी मी एक छोटीशी तुलना केली आहे ज्यात तुम्हाला कळेल कि कोण आहे दमदार!

इथे होते दोघांची बरोबरी

PUBG आणि Call Of Duty दोन वेगवेगळे मोबाईल गेम आहेत पण दोन्ही मध्ये बरेच साम्य पण आहेत. दोन्ही गेम्सची स्टोरी लाइन एक सारखी आहे. ये दोन्ही गेम बॅटल रॉयल थीम वर आधारित आहेत आणि खेळण्याची पद्धत तीच आहे. यात बॅटल ग्राउंड किंवा मॅप्स एक सारखे आहेत आणि तुम्हाला तुमच्या क्षत्रूंना मारायचे आहे. कंट्रोल तेच आहेत आणि ऑनलाइनच खेळता येतात. मल्टी प्लेयर गेम्स आहेत आणि दोन्ही मध्ये एकाच काम आहे शोधून मारणे. ग्राफिक्स पण जवळपास एक सारखे आहेत आणि हत्यारं पण जवळपास तीच आहेत. इतक्या गोष्टी सारख्या असूनही दोन्ही गेम मध्ये बराच फरक आहेत, काही ठिकाणी पबजी वरचढ आहे तर काही बाबतीती Call Of Duty.

यामुळे आहे Call Of Duty मजेदार

5 VS 5 डेथ: Call Of Duty चा 5 VS 5 डेथ मोड खूप शानदार आहे. PUBG मध्ये हे फीचर नाही आणि या मोड मुळे अनेकांना Call Of Duty आवडतो. यात ऑनलाइन गेम खेळणाऱ्या लोकांचे दोन गट बनतात ज्यात 5-5 लोक असतात त्यांनतर ते क्षत्रूला मारतात. जो गट आधी 50 लोकांना मारतो तो विजेता होतो. हे टारगेट पूर्ण करण्यासाठी अंधाधुंद गोळीबार होतो आणि भयानक लढाई होते. त्यामुळे खूप मजा येते.

अडवांस मोड: अडवांस मोड पण Call Of Duty ला पबजी च्या पुढे नेतो. या मोड मध्ये तुम्हाला क्षत्रू वर हमला करण्यासाठी ड्रोन मिळतो आणि तुम्ही एयर स्ट्राइक पण करू शकता. हि एक मजेदार गोष्ट आहे आणि हि पबजी मध्ये मिळत नाही.

फाइल साइज: आज PUBG सर्वात पॉप्युलर गेम आहे याबद्दल दुमत नाही पण मोठी फाईल साईझ हि एक मोठी अडचण आहे. PUBG जवळपास अडीच जीबी चा आहे. तर Call Of Duty यापेक्षा अर्ध्या स्टोरेज मध्ये येतो. अर्थात जवळपास 1 जीबी ची फाइल आहे.

क्विक ऍक्शन: Call Of Duty आवडण्याचे कारण म्हणजे हा पजबी च्या तुलनेत थोडा फास्ट आहे. अर्थात गोळी मारताना किंवा कोणतीही ऍक्शन असेल तर या गेम मध्ये तुम्हाला जास्त वेगाने ती घडताना दिसते पण पबजी थोडा स्लो वाटतो.

हे देखील वाचा: काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे

याबाबतीत PUBG आहे भारी

मिळतात सर्व हत्यार: काही बाबतीत Call Of Duty पुढे आहे पण असे नाही कि PUBG मध्ये आता काही उरले नाही. उलट PUBG मध्ये अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या यूजरना आवडतात. यात सर्वात पहिली बाब अशी कि सुरवातीपासून तुमच्याकडे सर्व गन्स असतील. तुम्हाला जे हत्यार वापरायचे असेल ते वापरता येईल. पण Call Of Duty मध्ये वेगवेगळे मोड अनलॉक झाल्यावर नवनवीन शस्त्रे मिळतात.

मोठा प्लेयर बेस: पबजी मोबाईलचा प्लेयर बेस Call Of Duty च्या तुलनेत खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांसोबत खेळता येते आणि हे खूप मजेदार आहे.

मॅप्स अपडेट: पबजी मोबाईल गेम मध्ये मॅप्स खूप लवकर अपडेट होतो. त्यामुळे यात तुम्हाला नावीन्य मिळते. या बाबतीती Call Of Duty खूप मागे आहे.

हे देखील वाचा: फक्त PUBG नाही तर हे 5 मोबाईल गेम पण आहेत खूप दमदार

वैविध्य: PUBG ची अजून एक खासियत आहे कि वेळोवेळी यात नवीन मोडस मिळतात आणि ते मजेदार असतात. जसे कि एखादी हॉलीवुड मूवी लॉन्च होत असेल, किंवा मोठा कॅरेक्टर किंवा एखादा मोठा इवेंट असेल तर त्यासंबंधी गोष्टी तुम्हाला गेम मध्ये मिळतात.

ग्राफिक्स: जरी दोन्ही गेम्सचे ग्राफिक्स एक सारखे असले तरी काही बाबतीत PUBG, Call Of Duty पेक्षा चांगला आहे.

The post जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-vs-call-of-duty/feed/ 0
काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/ https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/#respond Mon, 07 Oct 2019 13:25:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5477 रिपोर्ट नुसार Call of Duty मोबाईल ऍप इतर ऍपच्या तुलनेत सर्वात कमी काळात इतके डाउनलोड करण्यात आले आहेत.

The post काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंगच्या चाहत्यांसाठी नुकताच टेंसेंट गेम्स ने Call of Duty मोबाईल गेम 1 ऑक्टोबरला अधिकृतपणे रिलीज केला होता. पबजी प्रमाणे या गेम ने खूप कमी दिवसांत रेकॉर्ड केला आहे. गेम कमी वेळात 3.5 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाला आहे. हा गेम Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म साठी उपलब्ध आहे.

भारतात पण हा मोबाईल गेम कमी काळात खूप प्रसिद्ध झाला आहे. हा गेम 100 पेक्षा जास्त देशात उपलब्ध केला आहे. Activision च्या रिपोर्टने याचा खुलासा केला आहे. रिपोर्ट नुसार Call of Duty मोबाईल ऍप इतर ऍपच्या तुलनेत सर्वात कमी काळात इतके डाउनलोड करण्यात आले आहेत.

अनेक दिवस हा गेम Beta वर्जन वर चालू होता आणि निवडक प्लेयर्सना हा खेकता येत होता. आता हा गेम सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. Call of Duty: Mobile एक फ्री टू प्ले गेम आहे ज्यात तुम्हाला पॅक्स मॅप्स, मोड्स, हत्यारे मिळतात. या गेमची टक्कर भारतात सर्वात पॉप्यूलर मोबाईल गेम पबजीशी आहे.

विशेष म्हणजे प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे पबजी गेमची लोकप्रियता आज शिखरावर आहे. अलीकडेच गूगल ने पण PUBG मोबाईलला बेस्ट गेम ऑफ द ईयरचा अवॉर्ड दिला होता, जो गूगल प्ले वर आता पर्यंत 200 मिलियन पेक्षा जास्त वेळा (20 कोटीपेक्षा जास्त) डाउनलोड झाला आहे.

The post काही दिवसांतच Call of Duty Mobile गेमचे डाउनलोड्स पोचले 3.5 कोटीच्या पार, PUBG पडेल का मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/call-of-duty-mobile-game-downloaded-more-than-30-million/feed/ 0